IMF ने थेट एक तृतीयांश जगच मंदीच्या छायेत जाईल असा इशारा दिला आहे

गेल्या काही दिवसांपासून एक नोकऱ्या चालल्या आहेत, महागाई वाढलेय, रुपाया ढासळलाय या बातम्या येतंच होत्या.  मंदी येण्याचे निरनिराळे दावेही करण्यात येत आहेत. त्यातच  आता भर पडली आहे imf म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी पॉलिसीच्या अध्यक्षांची.2023 हे वर्ष गेल्या वर्षीपेक्षा “कठीण” असेल असं  इंटरनॅशनल मॉनिटरी पॉलिसीच्या अध्यक्षा क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी म्हटलं आहे.

या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग मंदीच्या सावटाखाली असेल असं देखील भाकीत IMF कडून करण्यात आलं आहे. 

यासाठी जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थेला जबाबदार धरण्यात आलं आहे. चीन, अमेरिका आणि युरिपियन युनियन या तीन प्रमुख अर्थव्यस्थेत मंदी येणार असल्याने त्याचा फटका एकूणच जगाच्या अर्थव्यस्थेला बसेल असं सांगण्यात येत आहे.

अमेरिकेत फेड रिझर्व सातत्याने त्यांचे इंटरेस्ट रेट वाढवत आहे. यामुळे अमेरिकेत मंदीची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्याचा फार संपूर्ण जगावर पडणार आहे.तर युरोपियन युनियनमध्ये रशिया- युक्रेन युद्धाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. त्यातच रशियाने यूरोपियन राष्ट्रांना होणार गॅस पुरवठा आखडता घेण्याची घोषणा केल्याने ही परिस्थिती अजूनच गडद होणार आहे.

तर चीनमध्ये करोना संकटामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्सनुसार चीन मधील कारखान्यात सलग तिसऱ्या महिन्यात उत्पादन कमी झाल्याचं दिसत आहे. याच महिन्यात चीनमधील १00 शहरांमधील घरांच्या किमती सलग सहाव्या महिन्यात घसरल्या आहेत.

त्याचबरोबर अमेरिकेतील मंदीचा अर्थ असा आहे की चीन आणि थायलंड आणि व्हिएतनामसह इतर आशियाई देशांमध्ये बनवलेल्या उत्पादनांना कमी मागणी होत आहे.

तसेच उच्च व्याजदरांमुळे कर्ज घेणे अधिक महाग होते – त्यामुळे या दोन्ही कारणांमुळे कंपन्या त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूक न करणे निवडू शकतात. आणि यामुळे मग चीन आणि भारता सारख्या अर्थव्यस्थानमध्ये गुंतवणूक येत नाही.अशा प्रकारच्या मंदीमध्ये चलन अधिक समृद्ध अर्थव्यवस्थांच्या तुलनेत मूल्य गमावू शकते, ज्यामुळे समस्या आणखी वाढू शकते.

अशी आयातील इतर मोठ्या अर्थव्यवस्था देखील चीनवर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे  चीनच्या रोडवणाऱ्या ग्रोथ रेटचा परिणाम या अर्थव्यवस्थांवर देखील होणार आहे. आयएमएफने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चिनी जीडीपी वाढीचा अंदाज 3.2 टक्के ठेवला होता, जो फंडाच्या 2022 च्या जागतिक दृष्टिकोनाशी सुसंगत होता. 2023 मध्ये चीनमधील वार्षिक वाढीचा वेग 4.4 टक्क्यांपर्यंत जाईल असं सांगण्यात येत आहे.

आता महत्वाचा प्रश्न म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेवर या मंदीचा काय परिणाम होणार आहे.

तर imf च्या अध्यक्षांनी असं स्पेसिफिकली भारताबद्दल काही वेगळं भाष्य केलेलं नाहीये. मात्र जेव्हा अमेरिका, चीन आणि युरोपियन युनियन यांच्या अर्थव्यवस्था डाऊन होतील तर या देशांशी मोठ्या प्रमाणात व्यापार असलेल्या भारतालाही याचा फटका बसेल. यामुळे भारतात होणारी परकीय गुंतवणूक रोडावू शकते. त्याचबरोबर भारताचा रुपया जगातल्या प्रमुख चलनांच्या तुलनेत ढासळू शकतो असं जाणकार सांगतात.

त्यामुळे येणाऱ्या काळातील मंडी जरी imf सांगते तशी जगातल्या एक तृतीयांश भागात असणारा असली तरी त्याचा परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला आपल्याला पाहायला मिळेल.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.