काश्मिर फाईल्सला २०० कोटींसाठी २ आठवडे लागले, RRR ने ४ दिवसात कसं गणित जमवलं..

भल्याभल्यांना बॉक्स ऑफिसवर दम तोडायला लावणारा ‘द काश्मिर फाईल्स’ अजूनही धुमाकूळ घालतोय. त्याच्याबाबत झालेल्या राजकारणामुळे पिक्चरला निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अशी सगळी पब्लिसिटी मिळाली. त्यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं पिक्चरचं प्रमोशन.. इतकं सगळं होऊनही काश्मीर फाईल्सने घासून २०० कोटी कमावले…

पण तितक्यात एस.एस राजामौली यांचा RRR हा पिक्चर रिलीज झाला अन सगळा गेमच चेंज झाला…

RRR ने गेल्या ४-५ दिवसात तब्बल ५०० कोटी कमावलेत…पण कसे ? एवढ्या स्पीडने RRR कमाई तर करतोय पण त्यामागे RRR चं नेमकं गणित काय आहे ? 

एस.एस राजामौली यांच्या ‘RRR’ ने गेल्या ४ दिवसात जगभरात ५०० कोटी रुपयांचा गल्ला केलाय…पण यामागे मोठी मेहनत आहे….

तर यात मोस्ट इम्पॉर्टन्ट फॅक्टर आहे आणि तो म्हणजे राजामौली…

लेखक-दिग्दर्शक S.S. राजामौली हे भारतातल्या हिटमेकर्सपैकी एक आहेत. आता हिटमेकर्स म्हणजे ज्यांचे पिक्चर गॅरिन्टेड हिट असतात. 

त्यांनी जो बाहुबली नावाचा जो प्रयोग केला जो गेमचेंजर ठरला होता. लार्जर-दॅन-लाइफ कॅरेक्टर्स, लार्जर-दॅन-लाइफ इमोशन्स, लार्जर-दॅन-लाइफ एनवायरमेंट्स थोडक्यात सगळं काही भव्य-दिव्य दाखवायचं हे सूत्र राजामौली यांना बरोब्बर कळलंय. 

मगधीरा असो बाहुबली असो किंव्हा मग RRR असोत या प्रत्येक पिक्चरमध्ये राजामौली भारतीय संस्कृतीचा जो टच देतात जो लोकांना अपील होतो..पिक्चरची स्टोरी, व्हिज्युअल्स, फ्रेम्स शिवाय त्यात दाखवलेले इमोशन्स देखील तितकेच डीप असतात.

एक महत्वाचा पॉईंट म्हणजे क्रॉसओवर पिक्चर्स… –

क्रॉसओवर पिक्चर्स म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले हिरो हेरॉईन एकत्र काम करतात. म्हणजे जसे आता बॉलिवूडचे ऍक्टर्स तेलगू पिक्चर्समध्ये काम करतायेत. त्याचंच उदाहरण हा RRR पिक्चर. 

यात तेलगू स्टार्स ज्युनियर एनटीआर आणि राम चरण आहेत तर बॉलिवूड स्टार आलिया भट्ट आणि अजय देवगण आहेत. क्रॉसओवर पिक्चर्सचं आणखी एक उदाहरण म्हणजे, आगामी काळात पुरी जगन्नाथचा लायगर नावाचा पिक्चर येतोय ज्यात विजय देवरकोंडा आहे आणि बॉलिवूड ऍक्टरेस अनन्या पांडे देखील आहे.

यामुळे होत असं कि, वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे स्टार मंडळी एकाच पिक्चरमध्ये दिसले कि आयता फॅन बेस वाढतो आणि त्याचबरोबर चित्रपट लोकांना परका पण वाटत नाही तर ओळखीचा वाटतो..

आणखी एक म्हणजे पिक्चरच्या प्रमोशनवर घेतलेली मेहनत 

तेलुगू पिक्चर्सला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे दोन मार्केट आहेत. पण त्याच्या बियॉन्ड जाऊन इतर राज्यात प्रमोशन करणं फायद्याचं ठरतं आणि तेच RRR च्या मार्केटिंग टीमने केलं. RRR च्या प्रोमोशनसाठी राम चरण, ज्युनियर NTR, आलिया भट्ट आणि राजामौली या सम्पूर्ण टीमने चेन्नई, कोचीन आणि मुंबई अशा सगळ्या मेन शहरात प्रमोशन केलं. नॅशनल लेव्हलवर केलेल्या प्रमोशनमुळे चित्रपटाबद्दल देशभर चर्चा होते. आणि तेच RRR च्या बाबतीत झालं…

BollywoodHungama.com मधील एका अहवालानुसार, राजामौलीच्या बहुप्रतिक्षित मॅग्नम ओपसच्या जाहिरातींसाठी जवळपास रु. १८ ते २० कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती.

आता मुद्दा येतो साऊथचं पब्लिक ज्यामुळे तिथले पिक्चर बक्कळ पैसे कमवतात…

आता पब्लिकला काय आवडतं हेही राजामौली जाणून आहेत…बाकी कितीही बदल तेलगू सिनेमाने स्वीकारले असले तरी त्यांचा मूळ बाज काय सोडलेला नाहीये..म्हणजे कसं अगदी टोकाचे इमोशन मग ते हिरोचं प्रेम करणं असू दे की व्हिलनकडून बदला घेणं असुदे यात हिरोचं कुठेच मुळमुळीत वागणं नसतंय. सोबतच गुरुत्वाकर्षणाच्या आणि फिजिक्सच्या सगळ्या सिद्धांतांना फाट्यावर मारत केलेली ऍक्शन. त्याचबरोबर काही अपवाद सोडले तर तेलगू पिक्चरवाले जास्तीचे ज्ञान देत बसत नाहीत. आणि हे सगळे घटक एकत्र आणले की बनतो एक परफेक्ट मसाला पिक्चर. साऊथच नाही तर एंटायर पब्लिकला हेच हवंय..रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून ज्याला फक्त एंटरटेन्मेन्ट म्हणून पिक्चर पाहायचा असेल तर ते RRR सारखे परफेक्ट मसाला पिक्चरच निवडतात.

आता मुद्दा येतो मल्टिलॅग्वेजचा…

आता मल्टीलँग्वेज म्हणजे, पिक्चर जरी तेलगू इंडस्ट्रीमधला असला तरी तो इतर भाषेतून देखील आणला पाहिजे..राजामौली यांनी बाहुबलीच्या वेळेसच मल्टीलँग्वेजची स्ट्रॅटेजी वापरलेली.  मल्टीलँग्वेज शिवाय बाहुबली किंव्हा RRR सारख्या पिक्चरचं बजेट पाहता पिक्चर एकाच भाषेत रिलीज करून चालणार नाही. त्याचा खर्च वसूल करायचा असेल तर इतरही भाषेत तो पिक्चर डब केला पाहिजे.. 

दुसरं म्हणजे हे तेलगू पिक्चर लँग्वेज बॅरियर तोडून प्रादेशिक भाषांमध्ये आणले जातात त्यामुळे प्रत्येक राज्यात पिक्चर कमाई करतो. रिलीज झाल्यापासून तेलगू स्टेट्समध्ये RRR ने १५६ पेक्षा जास्त कोटी कामावलेत. हिंदी भाषिक राज्यांमध्ये १०० कोटींचा गल्ला केलाय.. थोडक्यात पिक्चरचं अर्थशास्त्र या मल्टीलँग्वेजवर चालत असतं. 

आता RRR च्या जागतिक मार्केटचं बोलायचं तर…

आता हा RRR पिक्चर भारतातच नाही तर परदेशातही हवा करतोय. RRR इंग्रजी, पोर्तुगीज, कोरियन, तुर्की, स्पॅनिश, जपानी आणि चीनी भाषेत रिलीज झाला आहे. नेमका रशिया युक्रेन वादात भारताने तटस्थतेचे धोरण स्वीकारले त्याचा फायदा थेट RRR ला रशियामध्ये झाला म्हणायला लागेल..कारण @indianfilmsrussia_students, या इंस्टाग्राम पेजनुसार हा RRR पिक्चर रशियामध्ये जवळपास ५६ शहरांमध्ये रिलीज झाला. 

इंटरेस्टिंग म्हणजे रशियात RRR चे डिस्ट्रुब्युटर्स यशराज फिल्म्स आहे. यात खास म्हणजे ज्युनियर एनटीआर हा जपानमध्ये खूप फेमस आहे..त्याचे पिक्चर आले रे आले कि त्याचे जपानी फॅन्स नक्कीच बघत असतात. याशिवाय यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि मिडल ईस्टमधील मोठ्या स्क्रीनवर देखील हा पिक्चर रिलीज झाला आहे. या सर्व देशांमध्ये, RRR ने एकूण ७५ कोटींची कमाई केलीये..

याच्याशीच संबंधित असलेला पॉईंट म्हणजे पिक्चर हिट होत असल्यानं फंडींगचा प्रश्न मिटतो..

रिजनल सिनेमा म्हटलं की पहिला अडथळा असायचा फंडींगचा…पण जसं जसं पिक्चर हिट होत गेले कि तस तसे फंडिंगचे प्रश्न मिटत जातात. जसं कि, बाहुबलीसारख्या बिग बजेट पिक्चर्सनी त्यांच्यावर लावलेल्या पैशांचे रिटर्न्स दिल्यानं..गुंतवणूकदार पण आता बिग बजेट पिक्चरसाठी पुढे येतायेत. बॉलिवूडमधील अनेक नामांकित प्रॉडक्शन हाऊस आता तेलगू पिक्चरमध्ये पैसे लावतायेत..जसं कि जयंतीलाल गढा यांच्या पेन स्टुडिओने RRR चे हिंदी राईट्स घेतलेत. त्यामुळेच RRR चं ४०० कोटींचं बजेट जमावं शक्य झालं. 

आता तुम्हाला हे क्लिअर झालं असेलच कि, पिक्चर आला अन हिट असं होत नसतंय तर त्यामागचं हे सगळं गणित आहे..आणि हेच गणित राजामौली यांनी सोडवलं अन RRR एवढा हिट होतोय…

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.