लोकसभेत शिवसेना हायजॅक करण्यासाठी लोकजनशक्ती पार्टीची स्क्रिप्ट रिपिट होतेय

1990-85 बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचं सरकार होतं. जिथं सत्ता तिथं आम्ही या युक्तीप्रमाणे रामविलास पासवान यांचा पक्षसुद्धा सत्तेत होता. सरकार पगारवाढीची  मागणीसाठी आंदोलन करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांशी बोलणी करण्यासाठी एक मंत्रीगट स्थापन करण्याचा विचार करत होते. तेव्हा तिथं उपस्तिथ असलेल्या कोणीतरी पशुपतीनाथ पारस यांचा या मंत्रिगटात समावेश करावा अशी सूचना लालू प्रसाद यादव यांना केली. पशुपतीनाथ पारस हे त्यावेळी समाजकल्याण मंत्री होते.

हे ऐकून लालूंना एकंच हसू फुटलं. 

” भक! पारस को मंत्रिगट मी शामिल करे. पगला गये हो क्या?” 

असा लालूंनी कुत्सित हसून रिप्लाय दिला होता. 

पशुपतीनाथ पारस याची इमेजच तशी होती. 

केवळ रामविलास पासवान यांचा भाऊ हीच त्यांची ओळख. 

मंत्री झाल्यानंतरसुद्धा कुठल्याच बैठकीत पशुपतीनाथ पारस तोंडातून एक शब्द काढत नसत. रामविलास पासवान तेव्हा केंद्रात मंत्री असल्याने केवळ बिहारमधल्या मंत्रिपदाच्या खुर्चीवर कोणी जवळचा असावा म्हणून पारस यांना मंत्री करण्यात आलं होतं.

मात्र पशुपतीनाथ पारस यांनी २०२१ मध्ये जो धक्का दिला त्यावर मात्र सुरवातीला कोणाचा विश्वास बसला नव्हता. 

रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्याकडे पक्षाची धुरा होती. मात्र पशुपतीनाथ पारस यांनी रात्रीत बंड करत पक्षाचे सहापैकी पाच खासदार फोडत पूर्ण पक्षावरच आपला दावा सांगितला.

हा किस्सा इथं सांगायचं कारण म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत केंद्रात अगदी डिक्टो रिपिट होत आहे.

काल शिवसेनेच्या शिंदे गटाच्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि राहुल शेवाळे यांना गटनेता करण्यात यावा असं पत्र लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आणि लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांचे शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते म्ह्णून नेमणूक देखील केली आहे.

त्यामुळे राहुल शेवाळे आता टेक्निकली शिवसेनेच्या लोकसभेतील सर्व १९ खासदारांचे गटनेते असणार आहेत. 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तत्परता दाखवत दुपारी खासदार भेटल्यानंतर संध्याकाळी राहुल शेवाळे यांची उमेदवारी जाहीर देखील केली. रात्रीपर्यंत लोकसभेच्या यादीतही नव्या गटनेत्यांचे नाव झळकलं.

यासाठी लोकसभेच्या सचिवालयाने नियमांचा दाखला देखील दिला आहे. 

गटनेता निवडण्यासाठी  १९८८ मध्ये सुप्रीम कोर्टाने ऍटर्नी जनरल यांना दिलेल्या सूचनांचा आधार घेण्यात आला आहे. 

ज्यावेळेस पक्षनेता आणि गटनेता यांच्यात मतभेद असतात तेव्हा जो कोणी अध्यक्ष्यांकडे पक्षाच्या बहुसंख्य सदस्यांचा पाठिंबा घेऊन येइल त्याची गटनेते पदी निवड होते.

पक्षांतराबंदीत असणारा २/३ सदस्यांचा निकष इथं लागत नाही. त्यामुले १९ पैकी १२ खासदार असतानाही राहुल शेवाळे यांची शिवसेनेचे नवीन गटनेते म्हणून निवड करण्यात आली  आहे.

याआधी उद्धव ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी गटनेता बदलण्याआधी आमची मागणी मान्य करण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र ओम बिर्ला यांनी त्याआधीच राहुल शेवाळे यांची गटनेतपदी नेमणूक केली आहे.

अशीच सेम प्रक्रिया लोकजनशक्ती पक्षामध्ये पडलेल्या फुटीच्या वेळी झाली होती. 

लोकजनशक्ती पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष चिराग पासवान यांनी पशुपतीनाथ पारस यांना गटनेते पद देण्यात येऊ नये अशी विनंती केली होती. मात्र ५ खासदारांसह गटनेते पदावर दावा करणाऱ्या पशुपतिनाथ पारस यांची विनंती ओम बिर्ला यांनी मान्य केली आणि त्यांना गटनेता केलं. भाजपने देखील पशुपतीनाथ पारस यांना बाळ देत त्यांना केंद्रात मंत्री देखील केलं. हायकोर्टाने देखील पशुपतीनाथ पारस यांची 

खेळ इथंच संपला नाही. पशुपतीनाथ पारस यांनी पुढे जी स्टेप घेतली तीच स्टेप शिंदे गटाने रिपीट केली आहे. 

 खासदारांच्या बहुमताच्या जीवावर पशुपतीनाथ पारस यांनी लोकजनशक्ती पक्षावरच आपला क्लेम सांगितला आणि मग प्रकरण निवडणूक आयोगाकडे नेलं. मग पक्ष कोणाचा फुटीनंतर पक्ष कोणाचा यावर  निर्णय येइपर्यंत आयोगाने लोकजनशक्ती पक्षाचं बंगला हे चिन्ह गोठवलं होतं आणि लोकजनशक्ती पक्ष हे पार्टीचं  नाव वापरण्यासही मनाई घातली.

मग जवळ आलेल्या पोटनिवूडणुकीसाठी चिराग पासवान यांच्या गटाला लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) आणि हेलिकॉप्टर हे चिन्ह  मिळाले. तर त्यांच्या काकांच्या पशुपतीनाथ पारस यांच्या  गटाला राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष असे नाव आणि शिलाई मशीन हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं.

आता एकनाथ शिंदे गटानेही शिवसेना पक्ष आमचाच असा दावा करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. 

त्यातच सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्याच्या आत  राज्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. जर तोपर्यंत शिवसेना कोणाची हे जर सिद्ध झालं नाही तर निवडणूक आयोगाकडून शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह गोठवण्याचा धोका असणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.