२६/११ : यांच्या एका घोषणेमुळे वाचले होते शे-पाचशे जणांचे प्राण.

रेल्वेची घोषणा तशी सर्वसामान्य गोष्ट. पण त्या रात्री हि गोष्ट रोजच्या सारखी साधी सुधी नव्हती. २६ नोव्हेंबरची ती काळरात्र. या रात्री मुंबईवर भ्याड हल्ला करण्यात आला. कित्येक जणांचे प्राण गेले. पण त्याहून कित्येक प्राण, शुरवीर अधिकाऱ्यामुळे वाचले. आपला जीव धोक्यात घालून सामान्य मुंबईकरांना या हल्यापासून त्यांनी वाचवलं.

अधिकारी, प्रशासन आणि सर्वसामान्य लोकं या आतंकवादी हल्याविरोधात लढले होते. याच हल्यावेळी शे-पाचशेहून अधिक लोकांचा जीव वाचला होता तो एका घोषणेमुळे.

कसाब आणि त्याचा साथीदार इस्मायल हे जेव्हा छत्रपती शिवाजी टर्मिनल्समध्ये अंधाधूंद फायरिंग करत होते,

तेव्हाची ही गोष्ट.

छत्रपती शिवाजी टर्मिनल्स मुंबई. स्टेशन मास्तरांच्या वरील भाग म्हणजे अनाउन्सर यांची रुम. रेल्वेच्या घोषणा या ठिकाणावरून केल्या जातात. अनाऊन्सर विष्णु झेंडे हे त्यावेळी ड्युटीवर होते. अचानक त्यांना खालील कोपऱ्यावरुन जोरदार आवाज आला. आवाजाच्या दिशेने पाहताच विष्णु झेंडे यांना दोघेजण हातात बंदुक घेवून फायरिंग करत असल्याचं दिसलं.

तात्काळ त्यांनी पोलिसांना त्या दिशेने गडबड होतं असल्याच सांगितलं. त्यांनी मराठी आणि हिंदीमधून घोषणा देण्यास सुरवात केली. लोकांना तात्काळ प्लॅटफार्म सोडून क्रमाकं एक वरुन बाहेर पडण्याचे आदेश ते देवू लागले.

याच वेळी कसाबच लक्ष देखील अनाऊंसमेंट कडे गेलं. त्यांने स्टेशन मास्तर व उनाऊन्सर रुमच्या दिशेने फायरिंग करण्यास सुरवात केली. तात्काळ विष्णु झेंडे खाली बसले. रुमच्या काचा फुटल्या होत्या पण त्यांनी घोषणा देणं चालू ठेवलं.

ते फक्त मराठी आणि हिंदीत एकामागून एक घोषणा देत राहिले की पुढे जावू नका मागच्या रस्त्याने बाहेर पडा.

या घोषणेमुळे लोकांना समजलं की,

कोणत्या दिशेने हल्ला होतोय व कोणत्या दिशेला पळून जायचं आहे.

शे-पाचशेच्या वरती असणारे लोक त्यांच्या घोषणेमुळे एकाच दिशेने पळून गेले. पुर्ण प्लॅटफार्म रिकामा होत नाही तोपर्यन्त ते घोषणा देतच राहिले. रात्री साडेबाराच्या सुमारास ते खाली आले. परिसरातील परस्थितीचा अंदाज घेवून ते पुन्हा आपल्या ड्युटीवर आले. सकाळी साडेसात वाजता जेव्हा त्यांची ड्युटी संपली तेव्हा ते घरी गेले. आज त्यांना विचारलं तर ते इतकच म्हणतात की मी फक्त माझी ड्युटी करत होतो.

२६/११ च्या हल्यात एकूण १६६ लोक मारले गेले होते,

त्यातले ५२ लोकं एकट्या प्लॅटफार्मवर मारले गेले. जर झेंडे यांनी परिस्थितीचं भान ओळखून लोकांना योग्य दिशेने जाण्यासाठी घोषणा केली नसती तर हा आकडा कितीतरी मोठ्ठा असता.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.