पुलवामा हल्ल्यामागच्या मास्टरमाईंड लव्हर बॉयमुळं पाकिस्तानचा चेहरा उघडा पडला

१४ फेब्रुवारी २०१९ पूर्ण जग वॅलेन्टाईनच्या जल्लोषात बुडालेलं असताना भारतीयांचं मात्र काळीज एका वेगळाच कारणानं तुटत होतं. जम्मू काश्मीर मधल्या पुलवामा येते सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर अतिरेक्याने केलेल्या भ्याड आत्मघातकी हल्यात ४० जवान शहीद झाले होते. आदिल अहमद दार या जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने केलेल्या स्फोटकांनी भरलेलं वाहन जवानांच्या ताफ्यात घुसवून हा हल्ला घडवून आणला होता.

नेहमीच्या सवयीप्रमाणे काश्मीरच्या युवकांनी हा हल्ला घडवून आणला हे दाखवण्यासाठी एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला ज्यामध्ये आदिल अहमद दार जो पुलवामाचाच रहिवाशी होता त्याला हल्ल्याची जबाबदारी घेताना दाखवण्यात आलं होतं.

मात्र शस्त्रास्त्रांचा झालेला वापर, त्यानंतर मिळालेली इंटेलिजन्स यावरनं या हल्ल्याचे मास्टरमाईंड सीमेपलीकडले असल्याचं स्पष्ट होत होतं .

मात्र भारतीय तपास यंत्रणांना याचे पुरावे मिळत नव्हते.भारतीय तपासयंत्रणा त्यासाठी जंग जंग पछाडत होत्या मात्र लिंक काय भेटत नव्हती. तपासासाठी आता NIA  ला पाचारण करण्यात आलं होतं.आणि त्यातच या हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अझहरचा भाचा उमर फारूख हा काश्मीरमध्ये घुसला होता आणि हल्ल्याच्या महिनाभरानंतर चकमकीत मारला गेला होता हेही गुप्तचर यंत्रणांना माहीत नव्हते.

मग काश्मिरी प्रेमिका, आदिदासचे बूट आणि मोबाइल फोन अशी लिंक लागली आणि पोलिसांना मोठा क्लू मिळाला. 

राहुल पंडिता यांच्या  ‘द लव्हर बॉय ऑफ बहावलपूर: हाऊ द पुलवामा केस क्रॅक्ड’ या पुस्तकातून NIA, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी पुलवामा केसचा कसा उलगडा केला याची माहिती मिळते.

जम्मू काश्मीर NIA चे प्रमुख राकेश बलवाल यांना जिथे उमर फारुक (अजून उमर फारुकची खरी ओळख व्हायची होती ) याचा खात्मा झाला होता तिथे काही महत्व्वाचे क्लू मिळाले. मारले गेलेल्या अतिरकेच्या अंगावरील आदिदासचे कपडे बघून बलवाल यांनी ओळखले हा अतिरेकी कोणी साधासुधा नाहीये. त्याचबरोबर त्या अतिरेक्यांकडे मिळालेले मोबाइल फोन्स त्यांनी तपासणीसाठी पाठवले आणि त्यामधूनच केस जवळपास सॉल्व्ह होण्याच्या जवळ पोहचली.

तज्ज्ञाने बलवाल यांना सांगितले, ‘सर, आम्हाला जॅकपॉट मिळाला आहे’. फोनमधून 100 जीबी डेटा सापडला ज्यामध्ये ३ पुरुषांचा सेल्फी होता आणि त्यापैकी एक तोच इद्रीस भाई(उमर फारूकने घेतलेलं टोपण नाव) होता ज्यांच्याबद्दल बलवाल यांना सांगण्यात आले होते. 

त्या सेल्फीतील दुसरा माणूस पुलवामाचा बॉम्बर आदिल दार होता. 

राकेश बलवाल यांच्या म्हणण्यानुसार उमरला मसूद अझहरचा भाऊ रऊफ असगर (जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल हेड) याने पुलवामा हल्ल्यानंतर फोन नष्ट करण्यास सांगितले होते. उमरने तसे न करता आणखी एका तुटलेल्या फोनचा फोटो काकांना पाठवला. आणि तो फोन तसाच ठेवला. 

काश्मीरच्या २२ वर्षीय इंशा जान या गर्लफ्रेंडमुळे उमर फारुकने फोन नष्ट केला नाही. 

उमर त्या फोनद्वारे इंशाशी बोलायचा आणि इंशाच्या घरी राहायचा, इंशाचे वडीलही जैश-ए-मोहम्मदचे समर्थक होते. फोनमध्ये बंदूक, पिस्तूल, असॉल्ट रायफलसह इन्शाचा फोटोही होता.

फारुखचे अनेक महिलांसोबत संबंध होते आणि त्यातील एक इंशाची बहीण देखील होती हे इंशाला माहीत नव्हते.फोन डेटा मिळूनही, बलवाल इद्रिस भाई आणि फारूक यांच्यात संबंध जोडू शकले नव्हते आणि तेव्हाच प्रेम प्रकरणाने सर्व न सुटलेले कोडे सुटले. फेब्रुवारीमध्ये एनआयएने शाकीर बशीरला पकडले, ज्याने दहशतवाद्यांना आश्रय दिला होता, ज्यांनी आदिल दारला हल्ल्याच्या ठिकाणी नेले होते.

एनआयए मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने राहुल पंडिता यांना सांगितले. ‘आमच्या एका अधिकाऱ्याने बशिरला इद्रिस भाई आणि इंशा जानचा फोटो दाखवला. उमरसारखा हा पुरुष आपल्या पत्नीशिवाय इतर स्त्रीशी संबंध ठेवू शकतो यावर बशीरचा विश्वास बसत नव्हता. या फसवणुकीचा बशीरला धक्का बसला आणि त्याने बलवाल यांना कोड्यात शेवटची लिंक जोडण्यास मदत केली. 

बशीर NIA चे अधीकारी बलवाल यांना म्हणाला , ‘तुम्हला काही सांगायचे आहे. इद्रिस भाई उमर फारुख असून तो मसूद अझहरचा पुतण्या आहे आणि त्याचे वडीलही IC-814 हायजॅकर्समध्ये होते.’ 

बशीरच्या खुलाशानंतर, एनआयएला कळले की इद्रिस भाई हा उमर फारूक, जैश-ए-मोहम्मदचा कमांडर होता ज्याने पुलवामा हल्ल्याची योजना आखली होती. त्यामुळं पाकिस्तान मधून ऑपरेट होणाऱ्या जैश-ए-मोहम्मद अतिरेकी संघटनेचा आणि पर्यायाने पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं होतं.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.