राज कुंद्राने आपलं बिझनेस मॉडेल एका खास दोस्ताच्या मदतीने उभं केलंय..

पॉर्न मुव्हीज तयार करुन अ‍ॅप्सवर अपलोड करण्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अटक केलीय. दरम्यान अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनी पोलिसांना दिलेलं जबाब सध्या तुफान चर्चेत येत आहे.

या सगळ्या गोष्टी समोर येत असताना राज कुंद्राचे जुने ट्विट्स, व्हिडिओज पण व्हायरल होत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि बहीण शमिता आले आहेत. यात कपिल शर्मा राज कुंद्राला म्हणतो,

“तुम्ही कधी सेलिब्रिटींसोबत फूटबॉल मॅच खेळताना दिसता, कधी फ्लाईटमध्ये, कधी शिल्पासोबत शॉपिंग करताना दिसतात. पण जरा आम्हाला देखील सांगा काही न करता तुम्ही पैसै कसे कमवता.”

कपीलच्या या प्रश्नानंतर शोमध्ये एकच हशा पिकला होता. पण खरंच एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे कुठून आणतो राज कुंद्रा एवढे पैसे? आणि तो या पॉर्न इंडस्ट्री मधला खूप जुना माणूस असल्याचं म्हंटल जातंय.

त्याच एक जुनं ट्विट व्हायरल होतंय, त्यात तो म्हणतोय

“Ok so here go’s Porn Vs Prostitution. Why is it legal to pay someone for sex on camera? How is one different to the other??”

त्याच्या दुसऱ्या ट्विटमध्ये तो म्हणतोय

“India: Actors are playing cricket, Cricketers are playing politics, Politicians are watching porn and Porn stars are becoming actors….!”

आणि हाच बिच्चारा पॉर्न चित्रित करण्याच्या उद्योगात घावलाय. आता हे कस चित्रित कसं केलं जातं, कसं पसरवलं जातं, आणि यात कोण कोण घावलंय?

सॉफ़्ट पॉर्नोग्राफ़ीचा हा सगळा गेम बाहेर आला, जेव्हा मुंबई क्राइम ब्रांचने अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक केली होती. गहना वशिष्ठच्या अटकेनंतर सगळे पत्ते हळूहळू उघडायला लागले. पोलिसांनी जेव्हा तपासाला सुरुवात केली तेव्हा, काही माहिती समोर आली.

यात पोर्नोग्राफी रॅकेट चालवण्यासाठी, शूटिंगसाठी मुंबईमधल्या मालाड वेस्टच्या मढगांव येथील बंगल्याचा वापर करण्यात येत होता. पोलिसांनी एकदा सापळा रचून या बंगल्यावर धाड टाकली त्यावेळी या बंगल्यात पॉर्न शूट सुरु होत. पण हे पॉर्न कशावर अपलोड होतं ही माहिती काढणं आवश्यक होत.

तपासात समोर आलं की, या सगळ्या फिल्म्स भारतात शूट होतात, त्यानंतर हॉटस्पॉट द्वारे डाऊनलोड करुन मेलवर पाठवल्या जातात. त्यानंतर या फिल्म्स लंडन मधून पॉर्न साईट्सवर अपलोड केल्या जात.  या कामाला उमेश कामत नावाचा व्यक्ती पूर्णत्वास न्यायचा. पोलिसांच्या मते उमेशने बॉलिवूड मध्ये येणाऱ्या नवीन नट नट्यांचे व्हिडिओसुद्धा केले. आजपर्यंत एकूण ९० पेक्षा पॉर्न फिल्म्स बनवण्यात आल्यात. आणि या अप्लिकेशन बेस साईटवर अपलोड पण झाल्यात.

आता राज कुंद्राच नावं यात कस आलं? 

प्रदीप बक्षी नावाचा एक व्यावसायिक आहे. ज्याची केनरिन प्रोडक्शन हाउस नावाची कंपनी आहे. हा व्यावसायिक राज कुंद्राचा पाहुणापण आहे आणि या केनरिन कंपनीत भागीदारपण आहे. भारतात या कंपनीचा रिप्रेजेंटेटिव उमेश कामत आहे. हा उमेश कामत याआधी राज कुंद्राचा पीए होता.

या कंपनीमार्फत पॉर्न फिल्म्ससाठी फंडिंग करण्यात यायचं, पण परदेशात. गहना वशिष्ठने सांगितलं होत कि, या केनरिन प्रोडक्शन हाउस मार्फतच तिला काम मिळायचं. हे प्रॉडक्शन हाऊस सॉफ्ट पॉर्नपासून हार्ड कोअर पॉर्न तयार करत होती असं तर उघड झालय. आणि ही कंपनी खरं तर राज कुंद्राच्या मालकीची आहे असं म्हंटल जातंय.

या कंपनीची उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे, त्यामुळे आता राज कुंद्राकडं कुठून पैसे येतात हे पुन्यांदा सांगायला नको.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.