आपण व्हिलन म्हणून ओळखतो पण याच निजामानं एकदा भारताला सोनं देऊन मदत केली होती

मीर उस्मान अली खान. हैद्राबादचा संस्थानचा शेवटचा निजाम. ज्याने जवळपास ३७ वर्षे शासन चालवलं. ८२,६९८ चौरस किलोमीटर क्षेत्राचे हैद्राबाद संस्थान भारतातील प्रमुख राजघराण्यांमध्ये गणले गेले.

या संस्थानाची खासियत म्हणजे इथली श्रीमंती. आजच्या अंबानी – टाटा घराण्यासारखं त्याकाळी हैद्राबादच्या निजामाचं नाव सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत टॉपला असायचं. कदाचित याच त्याच्या विशेष दर्जामुळेच या संस्थानाला भारत – पाकिस्तान फाळणीच्या वेळी भारतात सामील होण्यासाठी स्वातंत्र्यानंतर अतिरिक्त तीन महिने देण्यात आली. 

निजामाला ‘हिज एक्सलटेड हायनेस’ असे संबोधले गेले आणि हा निजाम जिथे जिथे जायचा तिथे त्यांना २१ तोफांची सलामी दिली जायची.

एका मासिकाने त्यांना १९३७ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केले, पण तरीही हा शेवटचा निजाम कंजूस होता. एवढा खजिना असूनही तो फाटलेली शेरवानी आणि पायजमा घालायचा.

या मीर उस्मान अली खानला भारताचा खलनायक म्हंटले जायचे.

भारत- पाकिस्तान फाळणीच्या वेळी हैद्राबादचा या नावाबाला भारत नाही तर पाकिस्तानात विलीन व्हायचं होत. सोबतच त्याने स्वतंत्र संस्थान राहण्याचा प्रस्ताव देखील मांडला होता. तो पाकिस्तानला छुप्या पद्धतीनं फंडिंगही करायचा असं म्हणतात.

दरम्यान, हैद्राबादमध्ये जरी निजाम होते. तरी तिथं ८५ हिंदू लोकसंख्या होती. त्यामुळे तत्कालीन राजकीय मंडळींनी हैद्राबादनं  भारतात विलीन व्हावं यासाठी कित्येक महिने त्याची मनधरणी केली होती. पण निजाम काय ऐकायला तयार नव्हता. 

अखेर भारताच्या तत्कालीन राजकीय मंडळींनी त्याच्यावर दबाव टाकला आणि या  दबावासमोर त्याने गुढगा टेकले आणि हैद्राबादचा निजाम आपलं संस्थान भारतात विलीन करायला तयार झाला.

दरम्यान, हा निजाम जरी भारताच्या विरोधात होता तरी यानं भारताला ५ हजार किलो सोन दान करून मदत केली होती.

तर झालं असं होत कि, १९६५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं. भारतानं  ते युद्ध जिंकलं पण या युद्धामुळे भारताची अर्थव्यवस्था हादरली. डळमळीत झालेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी मदत निधीचे आवाहन केले. या दरम्यान त्यांनी हैदराबादच्या निजामाचीही भेट घेतली.

असे म्हटले जाते की,  मीर उस्मान अली खान यांनी बेगमपेट विमानतळावर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे स्वागत केले. दोघांमध्ये बरीच चर्चा झाली आणि त्यानंतर उस्मान अलीने मदत निधीच्या नावावर पाच हजार किलो सोने दिलं होत.

दरम्यान, उस्मान अली खानने दान केलेल्या ५००० किलो सोन्याशी संबंधित कोणतीही माहिती भारत सरकारकडे नाही. त्याचवेळी, यासंदर्भातील माहिती अधिकारात असं समजलंय की, उस्मान अली खानने सोने दान केले नव्हते परंतु राष्ट्रीय संरक्षण सुवर्ण योजनेमध्ये त्याने ४२५ किलो सोने गुंतवले होते, ज्यासाठी त्याला ६.५ टक्के दराने व्याज मिळणार होते.

एवढंच काय, असे म्हटले जाते की,  हैदराबादहून लोखंडी पेट्यांमध्ये जेव्हा सोने भरून दिल्लीला पाठ्वले जात होते , त्यावेळी सुद्धा उस्मान अली म्हणाला होता की, ‘आपण सरकारला फक्त सोन दान करतोय, या लोखंडी पेट्या नाही, त्यामुळे त्या परत केल्या पाहिजेत. ज्यानंतर, या लोखंडी पेट्या हैदराबादला परत आणल्या गेल्या.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.