जगभरातल्या ‘या’ देशांत ‘न्यूड बीच’ फेमस आहेत जिथे तुम्ही….

परवा आमचा भिडू गोव्यात फिरून आलाय. गोव्यातल्या बीचवर याची नुसती धांदल उडाली होती. का कारण हे पोरगं साधं बिचारं, बीचवर पोरी छोट्या छोट्या कपड्यात फिरत होत्या ते बघून हे  लाजून लाजून चुर्रर्र..त्याचा पुण्यातला मित्र म्हणाला गोव्यातल्या बीचवर तुला एवढी लाज वाटतेय तर ‘त्या’ बीचवर तुझी काय हालत होईल भावा…

आता पुण्यातल्या भिडूने ‘त्या’ बीचचा उल्लेख केला म्हणजे नेमके कोणते बीच ? तर ‘न्यूड बीच’

जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे लोक बेफिकीर जगण्याचा आनंद लुटण्यासाठी जातात. ना कसली लाज ना शरम ना भीती.  कोण कुणाला कसं बघतंय, कोण काय म्हणतंय याने त्या लोकांना काही फरक पडत नाही. असं ठिकाण म्हणजे ‘न्यूड बीच’...

एका संशोधनानुसार, कोरोनाच्या काळात लावलेल्या निर्बंधांदरम्यान लोकांनी गुगलवर काय सर्च केलं असेल तर न्यूड सी बीच’, ‘न्यूड रिसॉर्ट्स’ आणि ‘न्यूड सनबाथ’ सारख्या गोष्टी शोधण्यात एक वर्ग व्यस्त होता.

अशी न्यूड बीचेस जगातील अनेक देशांमध्ये आहेत. पण नेमकी ही कन्सेप्ट काय आहे ? तेच बघुयात..

यासाठी आपण ब्राझील देशातला न्यूड बीचचं उदाहरण बघू शकता 

ब्राझील न्यूड बीच हे प्रसिद्ध ब्राझिलियन शहर रिओ डी जानेरोपासून हाकेच्या अंतरावर आहे. पेड्रो रिबेरो कोपाकाबाना बीचपासून अगदीच जवळ आहे. याचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे जगातील जेवढे प्रसिद्ध सोनेरी वाळूंचे समुद्रकिनारे फेमस आहेत त्यातला एक म्हणजे हा ब्राझीलचा बीच.

पण ब्राझीलच्या या न्यूड बीच या कन्सेप्टच्या विरोधात अनेक निदर्शने देखील झालीत. कारण, इथे लोकं नागडेच फिरतात.  

इथे प्रत्येक वीकेंडला कार्निवल फेस्टिव्हल्स, पार्टीज् केल्या जातात, परेड होतात. महत्वाचं म्हणजे लोकं इथे नागडेच फिरतात अगदी बेफिकीर. न्यूड बीचवरच्या पार्टीचे नियमच असतात की, नग्न फिरा. इथे आलेला प्रत्येक जण त्यांची लाज, शरम, संकोच सोडून टाकतो. आणि जर एखाद्याला ते सोयीस्कर वाटत नसेल तर त्याला स्पॅनडेक्स वापरण्याचा पर्याय दिला जातो. स्पॅनडेक्स म्हणजे पातळ आणि शरीराला चिटकून असलेला एक प्रकारचा स्विम सूट असतो. 

न्यूड बीचवर कसलीही औपचारिकता नसते, कोणत्याही प्री-बुकिंग शिवाय पर्यटक इथे येऊ शकतात.असे न्यूड बीचेस अधिकृत म्हणजेच लीगलही असतात किंव्हा काही ठिकाणी ते बेकायदेशीर चालवले जातात.

बरं हे झालं फक्त ब्राझीलच्या समुद्रकिनाऱ्याचं…जगात इतर देशांमध्ये देखील असे बीचेस आहेत. ज्याबाबत आम्ही माहिती देणार आहोत मात्र तेथील फोटो दाखवू शकत नाही. त्या बिचेसचे फोटो इंटरनेटवर सर्च करण्याचं कष्ट तुम्हालाच घ्यावं लागेल.

१. एकट्या फ्रांसमध्ये एकूण ९ न्यूड बीच आहेत. 

जगातील सर्वोत्तम न्यूड बीचच्या लिस्ट मध्ये फ्रान्सचं नाव येतंच. यातलं पहिलं बघूया ताहिती बीच

ताहिती बीच फ्रान्समधल्या न्यूड बीचेस मधला सर्वात फेमस बीच आहे. फेमस होण्यामागे कारण म्हणजे, ब्रिजेट बार्डॉट या अभिनेत्रीचा ‘गॉड क्रिएटेड वुमन’ १९६६ मध्ये हा चित्रपट आला होता त्यात हा बीच दाखवण्यात आलेला. या बीच वरील न्यूडिटी चित्रपटात देखील दाखवली गेली आणि न्यूड बीच ची कन्सेप्ट जगभरात पॉप्युलर झाली. 

ताहिती बीच, ल्यूकेट बीच, कॅप डी’एग्डे बीच, इले दे लेव्हंट बीच, प्लेग लिंगुइझेटा, पालोमा बीच, प्लेग लिंगुइझेटा सेंट-सलून, मॉंटयालिव्हेट बीच इत्यादी. 

केप डी’एग्डे बीच बद्दल बोलायचं तर, या बीचची सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे येथे तुम्हाला नग्न अवतारात आंघोळ करणे कंपलसरी आहे. 

मॉंटयालिव्हेट बीच १९५० मध्ये सुरु करण्यात आलेला आहे. हा बीच जगातील टॉप १० न्यूड बीचपैकी एक आहे. यादरम्यान, सर्वात खास गोष्ट म्हणजे या बीचची एक बाजू फॅमिलीसाठी आहे आणि दुसरी बाजू इतरांसाठी आहे.

ल्यूकेट बीचबद्दल. भूमध्य समुद्राजवळ असलेला हा समुद्रकिनारा मोठ्या परिसरात पसरलेला आहे. न्यूड बीच म्हणून फेमस असलेला हा बीच पाहण्यासाठी इथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येतात. येथे या बीचवर तुम्ही कोणत्याही सिझनमध्ये जाऊ शकता.

फ्रान्सचं आणखी एक न्यूड बीच म्हणजे कॅप डी’एग्डे बीच. फ्रान्समधील हा बीच जगातील न्यूड बीचपैकी एक मानला जातो. हे नॅचरलिस्ट बीच आणि नेकेड व्हिलेज म्हणूनही या ठिकाणाला ओळखले जाते. फ्रांसमध्ये हायरेस बेटे म्हणून ओळखल्या जाणार्‍या भूमध्यसागरीय बेटांच्या मध्ये इले दे लेव्हंट बीच आहे.

तर कोर्सिका बेटावर, प्लेज लिंगुइझेटा हा एक मोठा न्यूड बीच आहे.

Ile de Levant By Valenti Renzo

या बीचवर तुम्ही कपडे घाला किंव्हा नका घालू पण इथे येताना तुम्हाला शूज मात्र घालून यावेच लागतात. कारण हा समुद्रकिनारा फार प्राचीन असून इथे पोहोचण्यासाठी खडकाळ पायऱ्यांसह अर्धा तासाचा ट्रेक करावा लागतो. 

पालोमा बीच, या बीच ला पाब्लो पिकासोच्या मुलीचं नाव दिल्यामुळे देखील हे बीच फेमस आहे.

Paloma Beach By lukaszimilena

पण प्लोमा बीचवर इतर समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे, तुम्ही टॉपलेस फिरू शकता मात्र त्या पलीकडे कुठलीही नग्नता इथे स्वीकारली जात नाही.

२. कॅनडामधला क्रेक बीच 

क्रेक बीच हा कॅनडामधील फेमस न्यूड बीच आहे, जिथे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे पर्यटकांना पायी जाण्याशिवाय मार्ग नाही अशी माहिती मिळते. येथे तुम्हाला टॉप लेस पर्यटक तर दिसतीलच शिवाय सेल्समन, दुकानदार देखील न्यूड अवस्थेतच असतात. इथे तुम्हाला ड्रिंक्स आणि जेवणाची व्यवस्था दिसून येईल. कॅनडाचा हा बीच येथील आश्चर्यांपैकी एक म्हणून गणला जातो. 

३. युरोपमधला वलाल्ता बीच 

युरोपमधील क्रोएशियाचा हा बीच रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. जवळपास ३ किलोमीटर परिसरात पसरलेला बीच असून युरोपमधील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. येथील वाळूचा दर्जा खूप चांगला असल्याचं देखील सांगितलं जातं. या बीचवर तुम्ही लोकांना मजा करताना, अंघोळ करताना आणि कपड्यांशिवाय फिरताना पाहू शकता.

४. डेन्मार्क मधला बेलेबू बीच डेन्मार्क

डेन्मार्कचा बेलेब्यू बीच हा जगातील टॉप १० टॉप लेस बीचपैकी एक आहे. या बीचची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा बीच थोडा धोकादायक असल्यामुळे येथे पोहणाऱ्या लोकांना सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट दिले जाते आणि याशिवाय येथे मोठ्या प्रमाणात यार्डही असतात. या बीच ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे उन्हाळा.

५. इटलीचा कॉर्निश बीच 

कॉर्निग्लिया बीच हा इटलीतील प्रसिद्ध न्यूड बीच आहे. या बीचवर जाण्यासाठी तुम्हाला बोगद्यातून पायी चालत जावं लागतं. बीचवर टॉप लेस असणे खूप नॉर्मल असलं तरीही इथून नॉन-न्यूड बीच म्हणजेच साधारण बीच हे काहीच किलोमीटर अंतरावर आहेत.

६. ग्रीसमधला पॅराडाईज बीच

ग्रीसमधील पॅराडाईज बीचला भेट दिल्यानंतर पर्यटकांना जणू स्वर्गीय वातावरणाचा च अनुभव येतो. हा बीच जगातील सर्वात प्रसिद्ध टॉपलेस समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. 

७. मूरिया बीच लास वेगास

मूरिया बीच हा जगातील इतर न्यूड बीचपेक्षा थोडसा वेगळा आहे. हा बीच एका हॉटेलचा भाग आहे, जिथे कॅसिनो आणि इतर रिसॉर्ट्स आहेत. इथे येणारे लोकं टॉपलेस होऊन बीचवर फिरू शकतात.

 हे झालं फॉरेन मधलं…भारतात देखील असे बीचेस असल्याचं सांगितलं जातं. 

भारतात न्यूडिटी कायद्याने गुन्हा आहे, परंतु तरीही असे अनेक समुद्रकिनारे आहेत जिथे न्यूडिटी प्रकार चालतो. 

देशातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे लक्षद्वीप. येथे समुद्राने वेढलेले एक आगती बेट आहे जिथे लोकं नग्न फिरतात असं सांगितलं जातं. तसाच गोव्यातल्या ओझरन बीच वर देखील असा प्रकार चालतो म्हणे.

तसेच कर्नाटकात गोकर्णमधील ओम बीचवर न्यूड पार्टीज् पाहायला मिळतात. तसेच  शिवाय येथील आणखी एक म्हणजे पॅराडाईज बीच नग्नतेसाठीच ओळखला जातो. तेच केरळमधील मरारी बीचवर देखील अनेक जण न्यूड आढळतात.

भारतातील या सर्व बीचेसबद्दल आम्ही दाव्यानिशी सांगू शकत नाही पण जे बोललं जातं ते आम्ही तुम्हाला सांगितलं.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.