पाकिस्तानातलं एकूलतं एक हिंदू संस्थान ज्यांची सुरक्षा तिथला मुस्लिम समुदाय करतो

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला  इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं, पण यासोबतच फाळणीला सुद्धा सामोरं जावं लागलं. भारत-पाकिस्तानच्या या फाळणीत दोन  देशांच्या विभाजनाबरोबर लाखो लोकांचंसुद्धा विभाजन झालं. बऱ्याच लोकांनी आपल्या धर्माला प्राधान्य देत, देश निवडले परंतु यातली काही मंडळी अशी सुद्धा होती त्यांनी धर्मापेक्षा आपली माती महत्त्वाची मानली. 

त्यामुळे  पाकिस्तानात जरी मुस्लिम संख्या सर्वाधिक असते तरी हिंदू लोकसंख्या सुद्धा पाहायला मिळते. पण 

पाकिस्तानातील हिंदू समाजाबरोबर होत असलेल्या चूकीच्या वागणुकीच्या बातम्या  रोजच माध्यमांमध्ये येत असतात. कुठल्याही क्षेत्रात तिथे हिंदूंना म्हणावा तसा दर्जा आणि संधी दिली जात  नाही.

पण भिडू  पाकिस्तानातल्या अशा परिस्थितीत सुद्धा एका हिंदू घराण्याचा तिथं मोठा दबदबा आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तिथल्या मुस्लिम समुदायावर आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवणं जरा अवघड आहे, पण भिडू खोट्या गोष्टी कधीच सांगत नाही. 

 खरं तर देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानच्या भागात आलेल्या अनेक संस्थानांपैकी एक संस्थान म्हणजे अमरकोट जे आता उमरकोट म्हणून ओळखलं जात. हे पाकिस्तानातलं एकमेव हिंदू संस्थान आहे.  राजा करणीसिंग सोढा यांच्या या संस्थानाचा पाकिस्तानात खूप दबदबा आहे.

राणा चंद्र सिंग अमरकोटच्या सत्ताधारी घराण्यातील होते.  विशेष म्हणजे राणा चंद्र सिंह हे सात वेळा खासदार राहण्यासोबतच केंद्रीय मंत्री सुद्धा राहिलेत.  माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्या जवळच्या आणि खास व्यक्तींमध्ये राणा चंद्र सिंह यांची गिनती होते. 

पाकिस्तान पिपल्स पार्टी (PPP) शी संबंध तोडल्यानंतर राणा चंद्र सिंह यांनी पाकिस्तान हिंदू पक्ष सुरू केला. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या झेंड्याचा रंग भगवा ठेवला होता.  सोबतच या ध्वजात ओम आणि त्रिशूल देखील कोरले होते. दरम्यान राणा चंद्र सिंह यांनी 2009 मध्ये या जगाचा निरोप घेतला. 

राणा चंद्र सिंह यांच्यानंतर या उमरकोट संस्थानाची कमान आपला मुलगा हमीरसिंग सोढायांच्या हातात आली. हमीर सिंग यांच्या कुटुंबाने पाकिस्तानच्या राजकारणात नेहमीच विशेष स्थान राखले. हमीरसिंग यांच्यानंतर सध्या करणीसिंग सोढा हा अमरकोट संस्थानाचा राजा आहे.

करणी सिंह सोढा यांची पाकिस्तानातल्या राजकारणावर चांगली पकड आहे. ते  बऱ्याचदा पाकिस्तानच्या राजकीय कार्यक्रमांमध्ये सुद्धा दिसतात. ते सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.  फोटो शेअर करण्यासोबतच तते आपले म्हणणेही लोकांपर्यंत पोहोचवत असतात. 

करणी सिंग इतके प्रभावशाली आणि खास नागरिक आहे  की तो बंदूकधारी बॉडीगार्डशिवाय ते कुठेचं जात नाही. महत्त्वाचं म्हणजे त्याच्या सुरक्षेत तैनात असलेले बहुतेक बॉडीगार्ड हे मुस्लिम समुदायातले आहेत. या बॉडीगार्डकडे नेहमी एके ४७ रायफल आणि शॉटगन असते. 

 पाकिस्तानातील मुस्लिम समुदाय या संस्थानाला आणि राजाला मान देतात कारण त्यांचा असा विश्वास आहे की हमीर सिंगचे कुटुंब हे राजा पुरू म्हणजे पोरसचे वंशज आहे.  त्यामुळेच या हिंदू राजाच्या रक्षणासाठी मुस्लीम लोक सुद्धा नेहमी हजर असतात.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.