पाकिस्तान मधला एकुलता एक हिंदू बहुसंख्य असणारा जिल्हा पण तरी परिस्थती जैसे थे…..

१९४७ साली फाळणी होऊन भारतापासून वेगळ्या अशा पाकिस्तान देशाची निर्मिती झाली. एक स्वतंत्र मुस्लिम देश म्हणून त्याची ओळख आहे. पण आजही अनेक हिंदू आणि शीख समुदायाचे लोक इथं राहतात. कारण फाळणी झाली तेव्हा कोणाला कोणत्या देशात जायचं याचा निर्णय घेण्याची परवानगी देण्यात आली होती. यावेळी असंख्य मुस्लिम समुदायाने पाकिस्तानकडे कूच केली, तर पाकिस्तान भागात राहणाऱ्या अनेक हिंदू आणि इतर धर्मियांनी भारतात येण्याचं ठरवलं.

पण काही लोक असेही होते, ज्यांनी आपलं पाकिस्तानमधलं घरं- दार न सोडण्याचा निर्णय घेतला आणि तिथंच स्थायिक व्हायचं ठरवलं. त्यामुळे आजही पाकिस्तानात हिंदूंची संख्या पाहायला मिळते. पण एकून लोकसंख्येच्या ही संख्या फक्त २.१५ % टक्केच आहे. पण पाकिस्तानातला एक जिल्हा असाही आहे जिथे मुस्लिम नाही तर हिंदूंची संख्या सगळ्यात आहे.

हा जिल्हा म्हणजे उमरकोट. पाकिस्तानातल्या सगळ्यात मोठं शहर असणाऱ्या कराचीपासून ३२५ किमीवर असणारा जिल्हा. जिथं हिंदूची लोकसंख्या तर जास्त आहेच पण व्यापारावर नियंत्रणाच्या बाबतीत या समाजाचं वर्चस्व आहे. पण तरीसुद्धा पाकिस्तानात जशी बाकीच्या ठिकाणी किंवा क्षेत्रात हिंदूंची परिस्थिती खराब आहे, तशीचं इथेही पाहायला मिळते.

बहुसंख्य मुस्लिम असणाऱ्या पाकिस्तानात हिंदू समाजाच्या लोकांना सगळ्या सुविधांपासून नेहमीच लांब ठेवलं जातं. यामागचं कारणही तसचं आहे म्हणा कारण जर एकट्या उमरकोट जिल्ह्याविषयी जरी बोलायचं झालं तर हिंदू समाजाची लोकसंख्या जास्त असून सुद्धा त्यांना आपल्या समाजाचा प्रतिनिधी मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत कुठल्याच सुविधा पोहोचत नाहीत.

एका अहवालानुसार, उमरकोट जिल्ह्याची ऐकून लोकसंख्या १० लाख ७३ हजार एवढी आहे. आणि तिथे हिंदूंची संख्या म्हणाल तर ५२ टक्के एवढी आहे.

लोककथांमध्ये या जिल्ह्याचा महत्त्वाचा उल्लेख आढळतो. या उमरकोट नावाचा संबंध तिथल्या किल्ल्याशी आहे, जिथे राजपूत ठाकूर वंश आणि समुरो राज्य करत होते. उमरकोट नंतर थार हा हिंदू लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा जिल्हा आहे, जिथे हिंदू लोकसंख्या सुमारे ४० टक्के आहे.

जिल्ह्याचा आर्थिक कणा म्हणाल तर शेती. पण इथेही बहुतेक जमीनदार मुस्लिमचं आहेत, तर शेतकरी हे हिंदू दलित समाजाचे आहेत. आणि थोड्याफार प्रमाणात व्यापारी आहेत तिथे उच्च जातीच्या लोकांचा बोलबाला आहे. म्हणजे खत, बियाणे आणि सराफा बाजारात त्यांचेच वर्चस्व आहे.

आता इथल्या राजकीय परिस्थितीविषयी बोलायचे झाले तर गेल्या २८ वर्षांपासून येथे पाकिस्तान पीपल्स पार्टीचं जिंकत आलीये. ५ लाख ३४ हजार मतदार असणाऱ्या या जिल्ह्यात एक राष्ट्रीय असेंब्ली आणि चार प्रांतीय विधानसभेच्या जागा आहेत. पण बहुतांश राजकीय पक्ष सर्वसाधारण जागांवर अल्पसंख्याक उमेदवारांना संधी देत ​​नाहीत.

असं म्हंटल जात कि, इथल्या राजकीय पक्षांनी एका प्रकारची परंपरा तयार केलीये कि, भिल्ल, कोळी, मेंघवार, मल्ही बारदरी अशा विविध समाजातील उमेदवारांमध्ये राखीव जागा वाटून घ्यायच्या आणि असं करून ते सगळ्या समाजाची मते हिरावून घेतात. हिंदू बहुसंख्य असूनही बहुतांश राजकीय पक्ष अल्पसंख्याकांना सर्वसाधारण जागांवर तिकीट देत नाहीत.

बरं राजकीय परिस्थती तर सोडाच नोकरीत सुद्धा हिंदूंना ग्राह्य धरली जातं नाही. जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, पोलीस आणि पालिका हेच विभाग आहेत जिथे सरकारी नोकऱ्या मोठ्या प्रमाणात आहेत. पण तरीसुद्धा परिस्थती जैसे थे.

म्हणजे इथल्या सरकारी नोकऱ्यांवर सुद्धा राजकीय वर्चस्व आहे.  उदाहरण म्ह्णून द्यायचं झालं तर २०९ कर्मचारी असलेल्या पालिकेतील ६० टक्के मुस्लिमचं आहेत. म्हणजे तुमचं प्रतिनिधीत्व नसेल तर कोटा आणि पक्ष तर सोडाच तुम्हाला गुणवत्तेवरही नोकरी मिळणार नाही. या कारणामुळे अल्पसंख्याक समाजातील लोकांना अनेकदा चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत.

इथं हिंदू समुदाय नेहमीच या गोष्टीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतो कि, हिंदू समाजाला लोकसंख्या जास्त असुन सुद्धा आमचे प्रतिनिधी नसून अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आहेत. नोकऱ्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याने अल्पसंख्याकांना या परिस्थितीत वंचित ठेवले जातं.

पण इम्रान सरकार डोळ्यावर पट्टी बांधल्याचं सोंग करून मुद्दाम हा सगळा दिखावा बघत असतो.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.