यांनी “रिसोर्ट पॉलिटिक्स” चा योग्य वापर करुन अंडरवेअरचा “डॉलर” ब्रॅण्ड उभारला..
आज डॉलरची चर्चा करणार आहोत पण अमेरिकन डॉलरची नाही तर भारतीय डॉलर इनरवेअरची. फिट है बॉस म्हणणारा अक्षय कुमार तुम्ही पहिलाच असेल.
नुकतेच डॉलर कंपनीला ५० वर्ष पूर्ण झालीत.
७० च्या दशकात भारतीय कापड उद्योग नवीन नवीन निर्याती बाबत वेगवेगळे प्रयोग करण्यात येत होते. त्याच वेळी दिनदयाला गुप्ता यांनी भवानी वस्त्रोउद्योग सुरु केला होता. पुढे जाऊन २००७ मध्ये भवानी वस्त्रोद्योगचे नाव बदलून डॉलर असे केले.
गुप्ता मूळचे हरियाणाचे. त्यांची भवानी येथील कापडाची फॅक्टरी घाट्यात चालली होती. त्यामुळे १९६२ मध्ये हरियाणावरून कलकत्ता येथे शिफ्ट झाले. त्यांनी एक दशक कलकत्त्यातील वस्त्रोद्योग कंपन्या सोबत काम केले. त्यानंतर १९७२ मध्ये भवानी टेक्स्टाईल्स इंडस्ट्री सुरु केली.
दिनदयाळ गुप्ता यांचे वय ८० वर्ष असून ते डॉलर इंडस्ट्री लिमिटेडचे अध्यक्ष आहेत.
त्यानंतर १९८६ मध्ये त्यांचा मुलगा बिनय आणि मुलगी पल्लवी गुप्ता यांनी वडिलांच्या मदतीसाठी कंपनी जॉईन केली. त्यावेळी डॉलर कंपनीतून वार्षिक उत्पन्न फक्त ३० लाख रुपये मिळत होते. त्यावेळी पल्लवी यांचे वय फक्त १८ वर्ष होते.
बिनयने डॉलरचे स्पर्धक असणाऱ्या रूपा, लक्स डोरा यांच्या बिझनेस मॉडेलचा अभ्यास केला. पुढच्या ५ वर्षात या कंपन्यांना मागे टाकायचे ध्येय ठरविले होते. व्यवसाय वाढविण्यासाठी काय करता येईल याचा सगळा रोड मॅप ठरविला होता.
दिनदयाल गुप्ता यांना कंपनीतील मरगळ दूर करण्यासाठी प्लॅन हवा होता. दिनदयाल गुप्ता यांचा मोठा मुलगा विनोद कुमारने सीएचे शिक्षण पूर्ण केले आणि वडिलांच्या कंपनी ऐवजी सोनी ओरिसन मध्ये मोठ्या पदावर काम करू लागले होते.
तुझ्याकडे असणारे व्यावसायिक कौशल्य घराच्या कंपनीसाठी का वापरत नाहीस असं वडिलांनी विनोद कुमारला विचारले. वडिलांनी सांगितल्या प्रमाणे विनोद कुमार यांनी १९९१ मध्ये सोनी ओरिसन मधली आपली नोकरी सोडून डॉलर कंपनी जॉईन केली.
विनोद हे मूळचे टेक्सनोसेव्ही होते. त्यांनी जेव्हा डॉलर कंपनी जॉईन केली होती तेव्हा भारतात कॉम्प्युटरचा जमाना सुरु झाला होता. त्यांनी संपूर्ण कामकाज संगणीकृत केले आणि नवीन सिस्टीम बसवली. वडिलांच्या काळातील काम करण्याची पद्धत बदलून टाकली होती.
विनोद कुमार यांनी कामकाज हाती घेताच सगळ्या किरकोळ विक्रेते आणि मोठ्या वितरकांना एक लिफाफा पाठवून आणि कंपनीतर्फे काही सुविधा देऊ केल्या आणि क्रेडिटची व्यवस्था सुरु करावी अशी इच्छा व्यक्त केली.
दिनदयाळ यांना ही स्कीम आवडली नाही. जर वितरकांनी पैसे बुडविले तर आपले मोठे नुकसान होईल अशी भीती व्यक्त केली. मात्र, विनोद आपल्या निर्णयावर ठाम होता. जर विक्रेत्यांना जास्त फायदा झाला नाही तर आपल्या कंपनीचे प्रोडक्ट कशाला विकतील असा प्रश्न उपस्थित करत आपली मागणी मान्य करून घेतली.
यामुळे देशभर डॉलरचे प्रोडक्ट मध्ये वाढ झाली. डॉलरसाठी हा पहिला टर्निंग पाईंट ठरला. विनोद यांच्या लक्षात एक गोष्ट आली वितरकांना खुश ठेवल्यास आपले अर्धे काम होते.
त्यामुळे १९९८ मध्ये विनोद कुमारांनी वितरकांसाठी अजून एक नवीन स्कीम काढली. डॉलरचे प्रोडक्ट सार्वधिक विक्री करणाऱ्या वितरकांसाठी मनालीच्या रीसॉर्ट मध्ये बिझनेस कार्यक्रम आयोजन केले होते. त्यासाठी डॉलरचे देशभरातील १४० मोठ्या वितरकांना बोलावलं होत. या कार्यक्रमाची चर्चा देशभरातील डॉलरच्या इतर वितकारांमध्ये झाली होती.
तर त्याच्या पुढच्या वर्षी डॉलर कंपनीचा बिझनेस कार्यक्रम गोवा येथील रिसॉर्ट मध्ये घेतला आणि त्यासाठी २०० वितरकांना बोलाविण्यात आले होते. कुठल्या तरी कंपनीकडून आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळत आहे म्हणून खूष झाले होते. याचा फायदा डॉलर कंपनीला झाला. इनरवेअरच्या खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना हे वितरक डॉलरचे प्रोडक्ट देऊ लागले होते.
२००५-०६ मध्ये अभिनेता सलमान खानने डॉलरची जाहिरात करू लागला. सलमान खानने डॉलरच्या अनेक जाहिरातीत केल्या आहे. यामुळे डॉलर कंपनी देशभरात अजून वेगाने पोहचली. तर २०१० मध्ये सलमान खान नंतर अभिनेता अक्षय कुमार डॉलर कंपनीची जाहिरात करतो. गेली १४ वर्ष अक्षय कुमार डॉलर ब्रँडशी निगडित आहे. याच बरोबर आता अभिनेत्री यामी गौतमी ब्रँड अँबेसिटर म्हणून जॉईन झाली आहे.
तसेच नुकतेच झालेल्या आयपीएल मध्ये डॉलर कंपनी राजस्थान रॉयल प्रमुख प्रॉन्सर पैकी एक होती.
ही कंपनी बीएसई आणि एनएसइ मध्ये लिस्टटेड आहेत. तिरूपूर जवळील सिपकोट येथे डॉलरच प्रोडक्ट मॅन्युफॅक्चअरिंग युनिट आहे. देशभरात एकूण ८५० पेक्षा जास्त डिस्टिब्युटर आहेत. आणि डॉलर इनरवेअर देशभरातील ८० हजार दुकानांमधून विकली जाते.
डॉलर कंपनी दिंडुगुल मध्ये आणखी एक मिल तयार केली आहे. तसेच पश्चिम बंगाल मधील जगदीशपूर येथे जागतिक दर्जाचे वेअरहाईस बरोबर होजियरी पार्क उभे करणार आहे. येथूनच देशभर डॉलरचे प्रोडक्ट पाठविण्यात येणार आहे.
डॉलरचा इनरवेअर बाजारातील हिस्सा १५ टक्के आहे. तर एकूण उत्पादनाच्या ९ टक्के डॉलरचे प्रोडक्ट निर्यात करण्यात येतात.
हे ही वाच भिडू
- अजय, शाहरूख, अक्षयच्या आधी विमलचे पहिले ब्रँड अँबॅसिडर मिलिंद गुणाजी होते…
- भावकीच्या भांडणातून ‘आदिदास’ आणि ‘प्युमा’ ब्रँडचा जन्म झाला.
- लग्नाच्या बोलणीपासून ते जुही चावलाचं करियर सावरण्यात कुरकुरे ब्रँडचा सिंहाचा वाटा होता…..