सुप्रिया सुळेंना मिळालेला संसदरत्न अवॉर्ड एपीजे अब्दुल कलाम यांच्या डोक्यातली संकल्पना आहे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. चेन्नईच्या प्राईम पॉईंट फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. यावेळी देशातल्या ११ खासदारांना हा अवॉर्ड जाहीर झाला आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या चार खासदारांचा यात समावेश आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे , राष्ट्रवादीच्या फौजिया खान, भाजपच्या हीना गावित यांना देखील संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.

कामगिरीतल्या सातत्याबद्दल सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांना “संसद विशिष्ट रत्न’ पुरस्कारही देण्यात येणार आहे.

संस्थेच्या ज्युरी समितीने तामिळनाडूतील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एच.व्ही. हांडे आणि कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम वीरप्पा मोईली यांची ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. यासोबतच संसदेच्या कृषी, वित्त, शिक्षण आणि कामगारांशी संबंधित चार समित्यांना त्यांच्या योगदानासाठी पुरस्कृत केले जाईल.

प्राइम पॉइंट फाऊंडेशनचे संस्थापक प्रमुख के. श्रीनिवास म्हणाले की, गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून चालू लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात केलेल्या कामगिरीच्या आधारे या पुरस्कारासाठी खासदारांची निवड करण्यात आली आहे.

या पुरस्कारासाठी निवड कशी केली जाते?

दिल्लीस्थित एनजीओ पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च सर्व संसद सदस्यांच्या “कार्यक्षमतेवर” बारकाईने लक्ष ठेवते. आणि त्यांच्या सभागृहातील  कामगिरीवर डेटा जारी करते. पुरस्कार विजेत्यांची निवड प्रत्येक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटीकेली जाते. 

संसदेतील डिबेटमध्ये सहभाग, सभागृहात प्रश्न उपस्थित करणे, संसदेत खाजगी विधेयके मांडणे, सभागृह आणि समितीच्या बैठकींमध्ये असलेली सदस्यांची उपस्थिती, MPLADS च्या फंडाचा वापर इत्यादींवर आधारित आहे. त्यानंतर दरवर्षी जून/जुलैमध्ये होणाऱ्या समारंभात संसद सदस्यांना पुरस्कार प्रदान केले जातात. 

संसद रत्न पुरस्कार हा APJ अब्दुल कलाम यांनी दिलेल्या सूचनांवर आधारित आहेअसं . भारतीय लोकसभेतील “उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या” सदस्यांचा सन्मान करण्यासाठी प्राइम पॉइंट फाऊंडेशनद्वारे २०१० मध्ये स्थापित केलेला हा एक खाजगी पुरस्कार आहे.

सलग ७ वेळा पुरस्कार मिळवलेल्या सुप्रिया सुळे यांचा संसदेतील कामाचं एक आढावा घेऊ. 

prs legislative नुसार २०२२ च्या बजेट सेशनमध्ये सुप्रिया सुळे यांची १०० टक्के उपास्तिथी होती तर १७ व्या लोकसभेत बारातमातीच्या खासदारांची उपस्तिथी ९२% एवढी आहे. त्याच वेळेस इतर खासदारांची सरासरी उपस्तिथी ७९% टक्यांच्या आसपास आहे. संसदेतील खासदारांची डिबेटमध्ये सहभागाची सरासरी ३०च्या आसपास असताना सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत १६३ डिबेटमध्ये सहभाग घेतला आहे. राष्ट्रवादीच्या या खासदारांनी १७व्या लोकसभेत ४०२ प्रश्न विचारले आहेत तर संसदेतील इतर सदस्यांची सरासरी ११६ एवढी आहे. तर ८ प्रायव्हेट मेंबर बिल संसदेत मांडले आहेत. सुप्रिया सुळे यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना संसदरत्न जाहीर झाला आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.