भारतात ख्रिस्तीधर्माचा प्रोजेक्ट फेल होत चाललंय म्हणूनच व्हॅटिकननं भारताकडे लक्ष वळवलंय?

गोवा आणि दमणच्या आर्कडायोसीससाठी एका ऐतिहासिक क्षण , पोप फ्रान्सिस यांनी शनिवारी संध्याकाळी आर्कबिशप फिलिप नेरी फेराओ (६९) यांची कार्डिनल्स म्ह्णून नियुक्ती झाली आहे. गोवा आणि दमणच्या आर्कडायोसीसच्या ४६५ वर्षाच्या इतिहासात कार्डिनल पद मिळवणारे फिलिप नेरी फेराओ हे पहिलेच आर्कबिशप ठरले आहेत. अशी बातमी शनिवारी आली.

पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना यातील अनेक शब्दांचा अर्थ कळला नसेल. तर सुरवात तिथूनच करू.

 तर पहिला बघू आर्कडायोसीस म्हणजे काय? 

आर्कडियोसीस म्हणजे आर्कबिशप यांच्या नेतृत्वाखाली असलेला एक मोठा भूभाग. भारताची अशाप्रकारे १७६ आर्कडायोसीसमध्ये विभागनी करण्यात आली आहे. त्यापैकीच एक गोवा आणि दमण हा आर्कडायोसीस आणि त्याचे प्रमुख आता कार्डिनल झालेत.

कार्डिनल म्हणजे व्हॅटिकनसाठी काम करणारे सर्वोच्च धार्मिक अधिकारी असतात. ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप यांची जागा रिकामा झाल्यानंतर  कार्डिनल्सच्या मार्फतच नवीन पोप यांची निवड होते. 

पोपची निवडणूक मात्र त्यांच्या अनेक जबाबदाऱ्यांपैकी एक आहे. 

कार्डिनल प्रामुख्याने पोपचे समुपदेशक म्हणून काम करतात आणि बरेच लोक त्यांच्या देशांतील बिशपच्या अधिकारातील प्रदेश  आर्कडायोसीसचे प्रमुख असतात. रोमन क्युरिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्हॅटिकन नोकरशाहीतही ते महत्त्वाच्या पदांवर काम करतात. कॅनन कायद्यानुसार, कार्डिनलला पोपद्वारे विशिष्ट कामांसाठी  बोलावले जाऊ शकते आणि त्यांना पोपचा डायरेक्ट ऍक्सेस असतो. जेव्हा जेव्हा पोपची जागा रिकामी होते तेव्हा कार्डिनल चर्चचं  दैनंदिन कामकाज देखील सांभाळता.

फेराओ हे ह्या वर्षी कार्डिनल पदापर्यंत पोहोचणारे दुसरे आर्कबिशप ठरले आहेत. 

हैदराबाद अँथनी पूला यांच्याही कार्डिनलपदी निवड करण्यात आली आहे. ज्यामुळे एकूण भारतीय कार्डिनलची संख्या सहा झाली आहे. मात्र यातून अजून एक गोष्ट पुढे येत आहे ती म्हणजे व्हॅटिकननं भारताकडे अलीकडच्या काही वर्षात दिलेलं लक्ष.

ऑक्टोबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निमंत्रण स्वीकारत पोप फ्रांसिस यांनी स्वीकारलं आहे. १९९९ नंतर भारताला भेट देणारे पोप फ्रांसिस हे पहिलेच पोप असणार आहे. १६ मे २०२२ तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यात हिंदू जन्मलेले आणि १८व्या शतकात ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले देवसहायम पिल्लई यांना व्हॅटिकनने संत म्हणून घोषित केलं होतं. संतपदाचा सन्मान मिळवणारे ते  पहिले भारतीय सामान्य व्यक्ती होते. याआधी सप्टेंबर २०१६ मध्ये मदर टेरेसा यांना पोप यांच्याकडून संतपद बहाल करण्यात आलं होतं. त्याआधी २०१५ मध्ये जोसेफ वाझ , २०१४ मध्ये मदर युफ्रेसिया यांना देखील व्हॅटिकनंन संतपदाच्या यादीत स्थान दिलं होतं.

अलीकडच्या काही काळात व्हॅटिकननं भारताकडे लक्ष देणं वाढवलं असल्याचं बोललं जातंय.

विशेषतः भारतातल्या ख्रिस्ती धर्माचा वाढीचा वेग रोडवला असल्याने व्हॅटिकनने आपलं लक्ष भारताकडे वळवले आहे का असे प्रश्न विचारले  आहेत. जनगणनेची आकडेवारी दर्शवते की भारतातील ख्रिश्चन लोकसंख्या 1951 पासून एकतर स्थिर आहे किंवा कमी होत आहे. 2001 च्या जनगणनेत भारतीय लोकसंख्येमध्ये ख्रिश्चनांचा वाटा 2.34 टक्के होता ते  2011 मध्ये ते 2.30 टक्क्यांवर घसरले. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या पैशांच्या जीवावर भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार राजरोसपणे या आरोपावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतात.

विशेषतः केंद्र सरकारने केलेल्या ख्रिश्चन एनजीओंच्या कारवाईनंतर अशी टीका केली जात होती. 

गृह मंत्रालयाने विदेशी योगदान नियमन कायदा किंवा FCRA अंतर्गत चार ख्रिश्चन गटांचे परवाने निलंबित केले होते. तसेच या संस्थांना पुढील सहा महिन्यांसाठी परदेशी निधीसाठी पात्र नसतील असे निर्बंधही घालण्यात आले होते . 2017 मध्ये अमेरिकेच्या कंपॅशन इंटरनॅशनलला भारतात त्यांचे काम थांबवण्यास सांगितले गेले. 

या वर्षाच्या सुरुवातीला चेन्नईस्थित एनजीओ करुणा बाल विकासवर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. एफआयआरमध्ये दावा करण्यात आला आहे की एनजीओला लोकांना ख्रिश्चन धर्मात रुपांतरित करण्यासाठी परदेशातून प्रचंड आर्थिक मदत मिळत होती. अशाप्रकारे एनडीएच्या राजवटीत FCRA परवाना गमावलेल्या ख्रिश्चन एनजीओंची एक मोठी यादी आहे. 

मात्र एवढं सगळं करूनही ख्रिश्चन धर्म मानणाऱ्यांची संख्या वाढलेली नाहीये. 

अजून एक गोष्ट म्हणजे ख्रिश्चन धर्माने भारतीय समाजात  सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे आश्वासन दिलं होतं तेही पूर्णपणे पाळल्याचं दिसत नाही.  भारतात ख्रिश्चन धर्माने वंचितांना जाती व्यवस्थेसारख्या बंधनातून मुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं.  मात्र त्यासाठी शिक्षणप्रसारसारखी सामाजिक कार्ये करण्यात आली. गरजुंना मदतही करण्यात आली. मात्र त्याचवेळी धर्मप्रसारची अटही अनेकदा घालण्यात आल्याने बंधनातून मुक्त करण्यासारखी मोठ्या आश्वासनांवर कोणी विश्वास ठेवला नाही. 

दुसरं म्हणजे जातीव्यवस्था संपवायला निघालेल्या ख्रिश्चन समाज स्वतःच जातिव्यवस्थेच्या चक्रात  अडकला. 

दक्षिण आशियातील सर्व धर्मांच्या बाबतीत हे खरे आहे की धर्म बदलता येतो पण जातीची अस्मिता कायम राहते.  ख्रिश्चन बनणे हे खालच्या जातीतील हिंदूंसाठी कधीही प्रोत्साहन देणारे नव्हते. ज्याप्रमाणे उच्चवर्णीय हिंदू जातीच्या उतरंडीतील ‘खालच्या’ लोकांशी वागतात, त्याचप्रमाणे उच्चवर्णीय ख्रिश्चनांमध्येही खालच्या जातीतील ख्रिश्चनांसाठी उदासीनता आणि द्वेष असतो असं मत जाणकार व्यक्त करतात.

त्याचबरोबर आदिवासी समाजाच मोठ्या प्रमाणात कन्व्हर्जन केलं जातं हा ही मुद्दा अनेकदा आकडेवारीत टिकत नाही. 

झारखंडमध्ये ख्रिश्चन लोकसंख्या ४.३% आहे तर छत्तीसगडमध्ये १.९२% आणि ओडिशामध्ये २.१७% आहे. त्यामुळे आदिवासीबहुल राज्यात ख्रिश्चन लोकसंख्या जेवढा आरोप केला जातो तितकी नाहीये. सुरवातीला इसवी सणाच्या अगदी ५० व्या शतकात फादर थॉमस यांच्या येण्याने भारताला ख्रिश्चन धर्माची ओळख झाली होती मात्र तिथंही ख्रिश्चनांचे प्रमाण १८% आहे.

त्यामुळे भारतातला ख्रिश्चन धर्माचा प्रोजेक्ट गंडल्याचा आरोप केला जातो अशावेळी. पोप फ्रान्सिस यांनी या प्रोजेक्टला पुन्हा बळ देण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत का अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतातली जातीव्यवस्था लक्षात घेऊनच  दलित समाजातून येणाऱ्या हैद्राबादच्या अँथनी पुला यांना कार्डीन केल्याचं बोललं जातं.  याद्वारे ख्रिश्चन धर्माला पुन्हा सर्वसमावेशात्मक रूप देण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातं.

तसेच भारतातून ६ कार्डिनल्स व्हॅटिकननं निवडणं हे देखील भारताकडे पोप यांचं विशेष लक्ष असल्याची गोष्ट अधोरेखित करतं असं जाणकार सांगतात.

मात्र त्याचवेळी पोप फ्रान्सिस यांच्या काळात त्यांनी युरोपबाहेरील कार्डिनल्स निवडण्याला प्रधान्य दिलं आहे. त्यांच्या कार्यकाळात आफ्रो -अमेरिकन ते अगदी पाकिस्तानातूनही कार्डिनल्स निवडले आहेत. त्यामुळे भारतातून कार्डिनल्स निवडण्याला वेगळ्या अर्थाने नं पाहता केवळ पोप यांच्या जगभरातून  प्रतिनिधित्व वाढण्याच्या नजरेतून पाहण्यात यावं असं सांगण्यात येतं.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.