मुघल आणि इंग्रज दोघांची खरी फाडलेली ती दिल्लीच्या डासांनी…!!

मुघल आणि इंग्रज. दोघांच्या ही सत्ता म्हणजे खूप काळाच्या. अखंड भारतभर पसरलेल्या सत्ता. इंग्रज तर जगाचे मालक होते. मुघल पण काय कमी नव्हते. दोघांच पण मुळ बाहेरचं. पण भारतात येवून ते काही काळ भारताचे सम्राट झाले.. 

पण…. 

या दोन सत्ताधाऱ्यांनी कोणत्या शत्रूबद्दल लिहून ठेवलय माहिताय का? त्यांनी लिहून ठेवलय ते दिल्लीच्या डासांबद्दल. मग काय या दोन्ही सत्ता दिल्लीच्या डासांना घाबरायच्या. अक्षरश: त्यांची या डासांमुळे चांगलीच फाटली देखील होती. इतिहासकार डॉ. फैजान अहमद दिल्लीच्या डासांच्या या डॉनगिरीबद्दल सांगताना लिहतात की, 

लालकिल्याच्या मागून यमुना नदी वाहते. त्याच्या पलीकडचा संपूर्ण भाग दलदलीचा होता. अशा वेळी डास असणं स्वाभाविक होतं. मुघलांना तर यांचा खूप त्रास होत असे. आईने अकबरी, अकबरनामा मध्ये या गोष्टींबद्दल लिहण्यात आलय. 

आईने अकबरी आणि अकबरनामामध्ये डासांना कसं पळवून लावलं जायचं ते लिहण्यात आलय.

औषध, अर्क यांच्या सडा टाकला जायचा. त्यावेळच्या पर्शियन पुस्तकात तर डासांना पळवून लावण्याचे उपाय देखील लिहण्यात आले आहेत. फुलांपासून जर्द तयार करायचा व तो शिंपडून डास पळवून लावायचा विधी लिखित स्वरूपात आहे. सोबतच महालात रात्रीच्या वेळी धूर करायच्या देखील सुचना आहेत. 

आत्ता हे झालं मुघलांच.

पुढे १८५७ मध्ये लाल किल्यावर सत्ता आली ती इंग्रजांची.

लाल किल्ल्यात पाऊल टाकल्यानंतर इंग्रजांच आतले डास पाहून धाबे दणाणले होते. त्यांनी सर्वात पहिला काय केलं असेल तर डासांना पळवून लावण्यासाठी उपाय करण्यास सुरवात केली. 

इंग्रज हुशार होते. त्यांना डासांची अडी व त्यांच्या निर्मीतीची कारण माहिती असायची. त्यांनी काय केलं तर लाल किल्ल्यातून पाण्यासाठी निर्माण केलेले पाट पहिल्या ठोक्यात मुजवून टाकले. डास कोणत्याही परिस्थिती इथे जन्म घेणार नाहीत याची तरतूद करून त्यांनी लाल किल्ल्यात बदल केले. 

त्यांनतर म्हणजे १२ डिसेंबर १९११ साली दिल्ली दरबार आयोजित करण्यात आला. इथे इंग्लडचे राजे पंचम जॉर्ज आले होते. त्यांनी डासांची पूर्वकल्पना न घेता एक अचाट घोषणा केली ती म्हणजे दिल्लीला राजधानी करायची.. 

त्यांच्या या निर्णयानंतर सर्वाधिक फाटली असेल ती दिल्लीत राहणाऱ्या व राहायला येणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांची. 

अगदी तेव्हाच्या द इंग्लिशमॅन या वर्तमानपत्रात थेट पंचम जॉर्ज यांच्यावर टिका करण्यात आली. ते म्हणाले इथे खूप मच्छर आहेत आणि इथे राजधानी एकदम चूकीचा निर्णय. 

बघा एका इंग्लीश वर्तमानपत्राने आपल्या राजावर टिका केलेली ती पण कशासाठी तर दिल्लीतल्या मच्छरांसाठी.. 

दिल्ली पास्ट एन्ड प्रेजेंट नावाचं एक हर्बट चार्ल्स यांच पुस्तक आहे यात लिहलय की यमुनेच्या काठी लोक रात्रभर झोपायचे. एकवेळ अंथरायला काही नसले तरी चालेल पण कशीतरी मच्छरदाणी तयार करून ते लावायचे.. 

आत्ता याच्या पुढची एक गोष्ट दिल्लीत राजधानी करायची म्हणून पंचम जॉर्ज यांनी किंग्सवे कॅम्प येथे पाया रोवला. त्यासाठी संसद भवन, व्हाईसरॉय निवास, साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक, त्रिमुर्ती भवन अशा वेगवेगळ्या वास्तूंच डिझाईन करण्यासाठी हेनरी लैकस्टर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी १९१३ साली एक कमिटी देखील नेमली गेली.

या कमिटीचं नाव होतं दिल्ली टाऊन प्लॅनिंग कमेंटी. 

या कमिटीचे प्रभारी होते एडविट लुटियन. लुटियन यांनी कोरेनेशन पार्क च्या स्वरूपात असणाऱ्या भव्य राजधानीचा प्रकल्प रिजेक्ट केला आणि याला कारण सांगितलं ते दिल्लीतल्या डासांच. इथल्या भागात त्याने सचिवालय तेवढं बनवलं जिथे आज दिल्ली विधानसभा आहे त्यानंतर त्याने रायसिना हिल्सकडे मोर्चा वळवला आणि कारभार उरकला. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.