मुंबई महापालिकेच्या आधी ३० वर्षांपूर्वी या बाईंनी स्कुल ऑन व्हील्स सुरु केली होती.

गेले अनेक महिने शाळा बंद असल्याने विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांकडं या ऑनलाईन शिक्षणासाठी ना मोबाईल ना  इंटरनेटचं. म्हणूनच ‘डोअर स्टेप स्कूल’ आणि महापालिका एकत्रितरित्या ‘स्कूल ऑन व्हील’ हा उपक्रम राबवत आहेत. यामध्ये मुंबई व परिसरातील काही भागात ही फिरती बस जाते आणि मुलांचा अभ्यास घेते.

पण तुम्हाला माहिती आहे का ही ‘स्कूल ऑन व्हील’ कन्सेप्ट जुनीच म्हणजे ३० वर्षांपूर्वीची आहे ते ? 

होय, मुलांना अभ्यासाचे धडे देणारी ही बस तशी जुनीच आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वीची. आणि हि बससेवा सुरु करण्याची कल्पना एका बाईच्या सुपीक डोक्यातून आली होती, तीच नाव आहे बिना सेठ लष्करी..ही गोष्ट आहे तिने सुरु केलेल्या चालत्या फिरत्या शाळेची.

जेमतेम तीन दशकांपूर्वी, मुंबईच्या कफ परेड म्हणजेच कुलाब्या जवळच्या झोपडपट्टीतील अनवाणी मुलं शाळेच्या बसचा पाठलाग करताना दिसायचीत. चांगला छानसा युनिफॉर्म सोडा, शाळेत जाणे, वर्गात बसून अभ्यास करणे हे सर्व त्यांच्यासाठी दिवा स्वप्न होते. त्यांचे बहुतेक दिवस हे भुकेले, कामगार म्हणून, मासेमारी डॉक्स किंवा बूटांच्या दुकानात जायचे.

आता ही त्या रस्त्यावर तुम्हाला हेच चित्र दिसेल. पण थांबा हे चित्र थोडं वेगळं आहे. आधी  झोपड्पट्टीतली मुलं ज्या बस मागे धावायचीत ती बस आता दुसरी आहे. ती शाळेला घेऊन जाणारी  बस नसून ती बसच त्यांची शाळा आहे. त्या बसच नाव आहे “मुंबईची आयकॉनिक स्कूल ऑन व्हील्स” बस. 

हा उपक्रम सुरु झाला तो बीना सेठ लष्करी या सामाजिक कार्यकर्तीमुळे. जिच्यामुळे शहरातील प्राथमिक शिक्षण क्षेत्रात क्रांती घडली, एक लाख वंचित मुलांना शिक्षण मिळाले. जिने डोर स्टेप स्कूलची स्थापना केली. आणि आज जी मुंबई आणि पुण्यातील जवळपास शंभर केंद्रांमध्ये चालवली जाते, ती चालती फिरती शाळा.

लष्करींनी १९८८ मध्ये कुलाबा येथील कफ परेडमध्ये स्थलांतरित बंजारा समाजातील २५ मुलांसह प्रथमच डोअर स्टेप स्कूल सुरू केले. त्यापैकी बहुतेक तरी स्थानिक मासेमारी कारखान्यांमध्ये बालकामगार होते. म्हणजे आतडे, साफसफाई आणि मासे वाळवत टाकण्यासाठी, पॅकिंगसाठी होते. एवढी काम करूनही त्या मुलांचे हात चार शेंगदाण्याच्या डाळींसाठी पसरलेले असायचे!

चालती फिरती शाळा सुरु का झाली ? म्हणजे आयडिया कशी आली. 

तर स्कूल ऑफ व्हील्स हा कार्यक्रम सुरू केल्यावर १९९८ पर्यंत डोअर स्टेप स्कूल हा लष्करीचा एकमेव उपक्रम होता. ही सुपीक कल्पना तिला सुचली ती म्हणजे ज्यूस शॉप्स आणि लायब्ररीच्या मोबाईल आवृत्त्यांमुळे. म्हणजे कित्ती सोप्प असतं पुस्तक मोबाईलवर मिळवणं. अगदी तसंच सोप्प प्राथमिक शिक्षण मिळायला हवं ना. म्हणजे आपण शाळेकडे जाण्याऐवजी शाळाच आपल्याकडे आली तर. हीच ती साधी कल्पना जिने मुंबईच्या बालकामगारांचं आयुष्यच बदलून ठेवलं.

सात पिवळ्या बसेसचा ताफा आता संपूर्ण मुंबईत फिरतो. त्यांच्या अंतर्निर्मित वर्गखोल्या आणि आरोग्यदायी शिकण्याच्या अनुभवासाठी सर्व आवश्यक उपकरणांसह ही बस सज्ज असते. मुले त्यांची शाळा पाहताच धावत येतात.

प्रत्येक बस स्थानकावर एका दिवसात चार पूर्व-नियुक्त ठिकाणी, वर्ग होतात. प्रत्येक वर्ग अडीच तास चालतो, जिथे विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, इंग्रजी, हिंदी, मराठी आणि अगदी कम्प्युटर देखील शिकवले जाते. एका बसमधील प्रत्येक वर्गामध्ये ८ ते १४ वर्षे वयोगटातील सुमारे शंभर विद्यार्थी उपस्थित असतात.

अजून एक विशेष आहे या बसचं

मुंबईच्या बोरीवलीतील आदिवासी मुलांना समर्पित एक विशेष स्कुल ऑन व्हील आहे. ज्यांचे कुटुंब संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील छोट्या वस्त्यांमध्ये राहतात, जे शहराच्या पायाभूत सुविधांपासून दूर आहे अशांसाठी ही शाळा सुरूय. स्कूल ऑन व्हील्स त्यांच्या दारात येण्यापूर्वी, त्यांच्यापैकी बहुतेक मुलं तरी शैक्षणिक संधींपासून वंचितच होते.

डोर स्टेप स्कूल आणि स्कूल ऑन व्हील्स या दोघांच्या पुण्यातही अनेक शाखा आहेत. जिथे स्थलांतरित बांधकाम कामगारांच्या मुलांना त्यांच्या तात्पुरत्या तंबूजवळ जाऊन शिकवले जाते.

बिना लष्करींना हि शाळा का सुरु करावीशी वाटली याबद्दल त्या सांगतात,

मी बाल मानसशास्त्रात पदवीधर होते आणि त्यावेळी मी सोशल वर्किंग मध्ये मास्टर्स करत होते. प्रकल्पाचा एक भाग म्हणून, कफ परेडमधील एका नगरपालिकेच्या शाळेला भेट द्यावी लागायची. तिथं पाहिलं तर बरेच विद्यार्थी हे तिसऱ्या चौथ्या इयत्तेनंतर शाळा सोडून द्यायचे.

यासाठी मी झोपडपट्टीतील त्यांच्या कुटुंबांना भेट देण्याचे ठरवले. मुलांना आणि त्यांच्या पालकांना शालेय शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. पण, जेव्हा त्यांच्या घरी भेट दिली, तेव्हा समजलं की, पाच ते सहा वयोगटातील मुलं सुद्धा बालकामगार म्हणून काम करत आहेत.

त्या मुलांचे पालक म्हंटले,

आम्हाला आमच्या कुटुंबाच पोट भरण्यासाठी कमाईची गरज आहे.

आणि या अडचणीमुळे जर मुले शाळेत जाऊ शकत नाहीत, तर आम्ही शाळा त्यांच्या दारात का आणत नाही? या विचारानेच कफ परेड झोपडपट्टीने पहिली डोअर स्टेप स्कूल पाहिली. २०१६ ला तर या शाळेला केम्ब्रिजच्या ड्यूक आणि डचेस म्हणजे इंग्लडच्या राजपुत्र आणि त्याच्या राणीनं ही भेट दिली होती.

अशी होती गोष्ट चालत्या फिरत्या शाळेची. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.