शॅम्पू पुर्वी श्रीमंतांचा होता, पण या पठ्याने एका दणक्यात तो गरिबांपर्यन्त पोहचवला

१९८० पर्यंत शॅम्पू हा लग्झरियस प्रॉडक्ट समजला जायचा. फक्त बॉटलमध्येच मिळायचा. तेव्हा १०० एमएल शॅम्पूची बॉटल किंमत होती ४० रुपये. दुसरीकडे बघायला गेलं तर मध्यमवर्गीय लोकांचा पगार १ ते ३ हजार रुपये होता. यामुळे या काळी ४० रुपये खर्च करणे हे जास्त समजले जायचे. त्यामुळे सर्वसामान्य लोकं शॅम्पू वर इतके पैसे खर्च करू शकत नव्हते.

आर्थिक स्थिती चांगला असणारा एक ठराविक वर्गच शॅम्पू, परफ्युम विकत घेत. यामुळे शॅम्पू मागणी घटली होती. कंपन्या टेन्शन मध्ये होत्या. त्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत होते. मध्यमवर्गीयांना कशा प्रकारे आपल्याकडे वळवायचे याबद्दल सगळ्याच कंपन्या चिंतेत होत्या. 

एक व्यक्ती होती तिने यावर एक आयडिया काढली होती ज्यामुळे श्रीमंतीचं लक्षण समजला जाणारा शॅम्पू गरिबांपर्यंत पोहचला होता. ती व्यक्ती म्हणजे चिन्नी कृष्णन.   

जी गोष्ट श्रीमंत व्यक्ती ना परवडते ती सर्वसामान्यांना सुद्धा मिळायला हवी असे चिन्नी कृष्णन यांचे मत होते. मूळचे शिक्षक असणाऱ्या चिन्नी कृष्णन यांना रिक्षाचाकांपासून ते सर्वसामान्य व्यक्तींना परवडणाऱ्या वस्तू बनवायच्या होत्या. त्यामुळे कृष्णन यांनी शिक्षकी पेक्षा सोडून फार्मास्युटिकल पॅकेजिंगचा व्यवसायात आले.  

सगळ्यात अगोदर चिन्नी कृष्णन यांनी पावडर आणि मीठ लहान पाउच मध्ये भरून ते विकण्याचा  प्रयत्न केला. पण त्यांना यात यश आले नाही. ते आपल्या मुलांना नेहमी सांगायचे की, भविष्यात पाउच मधून विकल्या जाणाऱ्या वस्तुंना महत्व येईल. 

चिन्नी कृष्णन हे व्यवसायात हात पाय मारू लागले होते. तेवढ्यात अवघ्या ४८ वर्षी त्यांचा मृत्यू झाला. 

चिन्नी कृष्णन यांच्या मुलाने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे ठरवले होते. त्यांच्या दोन्ही मुलांनी मिळून शॅम्पू उत्पादन करणारी कंपनी स्थापन केली तिचे नाव वेलवेट. काही दिवसानंतर चन्नी यांचा लहान मुलगा सी. के रंगनाथ या कंपनीतून बाहेर पडला.

१९८२ मध्ये सी. के रंगनाथ यांनी शॅम्पूचे उत्पादन करण्यासाठी १५ हजार खर्च करून एक मशीन विकत घेतली. वडिलांच्या नावावरून त्याला नाव दिले चीक. नंतर कंपनी स्थापन करून त्याला केविन केअर असे नाव दिले. 

१९८० च्या दशकात केवळ बॉटल मधूनच शॅम्पू विकला जात होता. सी. के रंगनाथ यांना वडिलांना दिलेल्या सल्ल्याची आठवण झाली. त्यांनी चीक शॅम्पू पाउच मधून विकायला सुरु केले. पहिल्या महिन्यातच २० हजार चीक शॅम्पूची पाउच विकल्या गेले. हे बिझनेस मॉडेल सक्सेसफुल होईल अशी गॅरंटी सी. के रंगनाथ यांना वाटू लागली होती.   

५० पैशांमध्ये शॅम्पू ही संकल्पना सुद्धा चीकची 

सी. के रंगनाथ यांनी आपला सगळा मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला. ग्रामीण भागातील मार्केट मध्ये सर्वे केला. त्यावेळी त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की, ग्रामीण भागातले लोकं केस धुण्यासाठी २ रुपये सुद्धा खर्च करू शकत नाही. त्यावेळी त्यांनी ५० पैशात मिळणार चीक शॅम्पूच पाऊच बाजारात आणल. 

१९८३ मध्ये तामिळनाडूत ही संकल्पना राबविली. ५० पैशांना मिळणारे १० लाख चीक शॅम्पूचे पाउच एकाच महिन्यात विकले गेले. यानंतर केविन केअर ही कंपनी यशाचे एक- एक शिखर सर करत गेली. आता या कंपनी ११०० कोटीची झाली आहे. 

भविष्यात पाउच मधून वस्तू विकून चांगला नफा मिळवता येऊ शकतो ये सगळ्यात आधी चिन्नी क्रिष्णन यांच्या लक्षात आले होते. क्रिष्णन यांची ही संकल्पना तर शॅम्पू कंपन्यांनी तर वापरलीच कोका कोला सारख्या कंपन्यांनी सुद्धा यावर काम केलं.

आर्थिक अडचणीत असणाऱ्या कंपन्यांना एक छोट्या आयडिया नंतर बिलियनेयर बनल्या. त्यामुळे आजही याचं सगळं श्रेय कृष्णन यांनाच दिलं जात.   

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.