स्टार्टअप इकोसिस्टिमचा ‘बॅड बॉय’ म्हणून आजही या स्टार्ट-अप फाउंडरचं नाव घेतलं जातं.

‘भारत पे’चा सह-संस्थापक आणि शार्क टॅंकचा फेमस जज अशनीर ग्रोवर सध्या चांगलाच गोत्यात सापडल्याचं सांगितलं जातंय. त्याच्या तापट स्वभामुळे त्याने कोटक मॅनेजमेंटच्या कर्मचाऱ्याला शिव्या घातल्या आणि त्याच्यावर चौकशी बसली. त्यात अशनीर भाऊंचे सगळेच कारनामे बाहेर येत असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं अशनीर ग्रोव्हरला त्यानेच स्थापन केलेल्या भारत पे मधून बाहेरचा मार्ग दाखवला जाऊ शकतोय अश्याही चर्चा आहेत.

या कारणामुळं त्याची स्टार्टअप इकोसिस्टिम मधला अजून एक बॅड बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या को-फाउंडरशी त्याची तुलना होतेय.

त्या बॅड बॉयनं पण असंच रागाच्या भरात नुकसान घेतलं होतं. त्याआधी त्याची स्टोरी पाहू.

राहुल यादव असं या बॅड बॉयचं नाव.

राजस्थानमधील अलवार येथे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला.  त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली जेव्हा त्याने बॉम्बे IIT मध्ये प्रवेश घेतला. अशनीर ग्रोव्हर पण IIT पासआऊट आहे. IIT बॉम्बे मध्येच यादव ने आपली पहिली वेबसाइट काढली. त्याची EXAMBABA.COM ह्या वेबसाइटवर इंजिनीरिंगच्या पोरांचा सगळ्यात आवडतं स्टडी मटेरियल म्हणजेच मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका मिळायच्या. त्याची ही युनिक आयडिया चांगली चालू असताना कॉलेजने त्याला त्याची ही वेबसाईट बंद करण्यास सांगितली. झालं!

यादव भाऊंचा पारा चढला आणि त्यानं कोर्स  संपायला अगदी काही महिने बाकी असतानाच त्यानं IIT  सोडलं.

त्यांनंतर आता कॉलेज हॉस्टेल मधून बाहेर पडल्यानंतर त्याला मुंबईत घर शोधणं भाग होतं. पण त्याला  लवकर घर भेटेना. अनेक दिवस त्याला मुंबईच्या रस्त्यांवर फिरावं लागलं. ह्यातूनच त्याला आपल्या पुढच्या स्टार्ट-अपची आयडिया भेटली. स्वतःला घर मिळाल्यानंतर तो कॅम्पस मधल्या इतर पोरांना घर मिळवून देऊ लागला. म्हणजे थोडक्यात ब्रोकेरजचा धंदा त्यानं चालू केला.

त्याच्या या धंद्याचा ठीक ठाक जम बसल्यानंतर त्यांनं या धंद्याला मोठं रूप द्यायचं ठरवलं आणि जन्म झालं HOUSING.COM चा.

IITच्या मुलांबरोबरच मिळून त्यानं हि कंपनी चालू केली. २०१३च्या काळात ही आयडिया युनिक होती. त्यामुळं लवकरच इन्व्हेस्टरपण राहुलच्या या आयडियामध्ये गुंतवणूक करण्यास तयार झाले. त्याला जवळपास २ करोडचं सीड कॅपिटल लवकरच मिळालं आणि HOUSING.COMचं एक प्रॉपर स्टार्ट अप झालं. पुढच्या इन्वेस्टींग राऊंडमध्ये राहुल यादवच्या या स्टार्टअपमध्ये मिलिअन्सची गुंतवणूक होत होती.

डिसेंबर २०१४ मध्ये HOUSING.COMमध्ये सगळ्यात मोठी गुंतवणूक आली सॉफ्ट बँकेककढुन ज्यामध्ये या जपानच्या इन्वेस्टींग कंपनीनें  HOUSING.COMमध्ये जवळपास $९० मिलिअनची गुंतवणूक केली होती.

मात्र या सगळ्या गुंतवणुकीबरोबर इन्वेस्टर्सचा कंपनीमधला हस्तक्षेप पण वाढत होता. आणि राहुल यादवला मात्र ते सहन होत नव्हतं. दिवसेंदिवस यामुळं तो अजूनच फ्रस्ट्रेट होत गेला. एकदा SEQUIOA कॅपिटल या कंपनीच्या मालकाने HOUSING.COM मधले काही कर्मचारी आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला आणि यामुळंच राहुल भडकला. त्याने त्या मालकाला पब्लिकली अर्वाच्य भाषेत पत्र लिहलं. त्यांनतर पुनः टाइम्स ग्रुप जे त्यावेळी त्यांची मॅजिकब्रिक्स ही रिअल इस्टेट मधली  कंपनी लाँच करण्याचा तयारीत होते तेव्हाही त्यानं कंपनीच्या कर्मचाऱ्यांना टाइम्स ग्रुप कसं आपली कॉपी करत आहे असा ई-मेल लिहला होता.

हा मेल जेव्हा लेक झाला तेव्हा टाईम्स ग्रुपनं राहुल यादव वर १००करोडचा अब्रुनुकसानीचा दावा टाकला.

आपल्या तापट स्वभावानं राहुल यादव रोज एक नवीन वाद ओढवून घेत होता. शेवटी मग Housing.com ने, जागतिक गुंतवणूकदारांच्या दबावापुढं यादवला कंपनीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. यादव याची हकालपट्टी करताना, बोर्डाच्या एका निवेदनात म्हटले की त्याचे वर्तन सीईओला शोभणारे नाही आणि कंपनीसाठी हानिकारक आहे.

त्यावर यादवने गुंतवणूकदार “कोणत्याही चर्चेसाठी बौद्धिकदृष्ट्या अक्षम” असल्याचं म्हणत स्वतःच राजीनामा दिला.

नंतर त्याने आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत राजीनामा मागे घेतला. मात्र त्याच्या या वागण्याने त्याचं जेवढा व्हायचं तेवढं डॅमेज झालं होतं.

शेवटी मग यादवने आपले मिशन आपल्या पैशांपेक्षा महत्वाचा आहे म्हणत कंपनीतून बाहेर पढण्याचा निर्णय घेतला.

त्याचवेळी व्हायच्या अवघ्या २६व्या वर्षी त्याने २२५१ कर्मचार्‍यांना भेट म्हणून २०० कोटी रुपयांचे सर्व शेअर्स सोडून दिले.

त्याने एका Reddit चॅटमध्ये, Zomato आणि OlaCabs सारख्या स्टार्टअप्सच्या सीईओंना त्यांचे शेअर्स सोडून देण्यास सांगितले होते, ज्यामुळे केवळ पुन्हा वाद निर्माण झाला. Housing.com नंतर त्याने दुसरे स्टार्ट-अप्स काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला तेवढे यश आले नाही.

त्यामुळं आता जेव्हा केव्हा एक यशस्वी स्टार्ट-अप गंडतं या बॅडबॉयचं नाव चर्चेत येतं.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.