तब्बल ७३ वर्षांनी अमेरिकेने खुलासा केला कि, जपानी पंतप्रधानांच्या मृतदेहासोबत काय घडले होते.

आज आपण एका अशा पंतप्रधानांविषयी बोलणार आहोत ज्यांनी स्वतःच्याच देशाला उद्धस्त केले होते.

त्याचं नाव आहे हिदेकी तोजो. तोजोचे करियर सुरु झाले ते इम्पीरियल जपानी लष्करात एक सामान्य सैनिक म्हणून, तर तो थेट त्याच देशाचा पंतप्रधान झाला. त्याने १९४१ ते १९४४ या काळात जपानचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले.

तोजो जेंव्हा जपानाचा ४०वा पंतप्रधान बनला तेंव्हा तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा.

पंतप्रधान पदावर आल्यावर त्याने जपानी सैन्याचा विस्तार तर केलाच तसेच  ७ डिसेंबर १९४१ रोजी त्याने पर्ल हार्बरवर हल्ला करीत त्याने अमेरिका आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींविरोधी युद्धाची घोषणा केली.

परंतु त्याच्या हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी अमिरीकेने ही युद्धात उडी घेतली, इतके दिवस अमेरिका मित्रराष्ट्रांना युद्धात मदत पाठवत असत परंतु प्रत्यक्ष युद्धात या आधी ती उतरली नव्हती. अमेरिकेने मारियाना द्वीपसमूहावर एक जबरदस्त हल्ला केला आणि या आक्रमणामुळे जपानी सैन्य निर्बल झाले.

प्रशांत महासागरच्या काही भागांमध्ये जपानी सैन्याची हार झाली त्यामुळे तोजोने लष्कराचे संपूर्ण अधिकार स्वतःकडे घेतली आणि युद्धमंत्री बनून युद्धाची सर्व रणनीती तो स्वतः ठरवायचा, तसेच युद्धातल्या सैनिक वर्गाचे व्यवस्थापनहि तो स्वतः पहायचा.

सैन्य संपत आले शेवटी तोजो ला सगळी रणनीती बाजूला ठेवून तेजो ला सैन्य प्रमुखाचे पद त्यागावे लागले, आणि युद्धात आपण हरलो असे मान्य करत जपानने एक औपचारिक शरणागती पत्करली.

युद्धाच्या दरम्यान तेजोने ४० लाख चीनी लोकांची हत्या केल्याचा तसेच कैद्यांवर रासायनिक प्रयोग केल्याचे आरोप होता.

त्यामुळे अमेरिकन सैनिक त्याला पकडण्यासाठी आले तेंव्हा त्याने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले. तो कुणाशीही बोलत नसे, सैनिक आले तेंव्हा त्याने त्या बंद खोलीत स्वतःवर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता, परंतु त्याचा हा १९४५ मधला आत्महत्येच्या प्रयत्नात अयशस्वी झाला.

प्रश्न हा येतो कि काही काळ जपानचा सर्वेसर्वा असणारा तेजो इतका असहाय्य का झाला असावा ?

पुढे त्याला महायुद्ध संपल्यावर युद्धगुन्हेगार म्हणून घोषित केले फाशीची शिक्षा दिली गेली. मृत्यूपूर्वी तोजोने महायुद्धातील आपल्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारली व फाशीला सामोरे गेला.

आता तुम्ही म्हणाल ७० वर्षांपूर्वी घडलेल्या या गोष्टी मी आत्ता का सांगत आहे ?

तर विषय असा आहे कि, तेजो ला फाशी देण्यात आल्यानंतर त्याच्या मृतदेहाचं पुढे काय झालं हे एक रहस्य बनून राहिलं ज्याचा खुलासा आत्ता म्हणजे तेजोच्या फाशीनंतर तब्बल ७३ वर्षांनी झाला.

हे रहस्य समोर आणण्यामागे टोकियोच्या एका प्रध्यापकाचा हात आहे, त्याचं नाव आहे हिरवोकी ताकाजाबा. झालं असं कि प्राध्यापक स्वतःच्या विषयावर अभ्यास करण्यसाठी ते वाशिंग्टन च्या एका लायब्ररीत काही पुस्तके वाचत होते तेवढ्यात त्यांना तिथे एक दस्ताऐवज मिळाला.

त्यात लिहील होतं कि, तेजो ला फाशी दिल्यानंतर तेजोच्या आणि त्याच्या ६ सहकाऱ्यांच्या मृतदेहासोबत काय झालं.

त्यात युएस आर्मीचे मेजर ल्युथर फेअर्सन यांनी लिहिले कि, “मी स्वतः तेजोच्या फाशीचा साक्षीदार होतो. मी स्वतः त्या ७ व्यक्तींचे मृतदेह जाळले आणि त्याची राख वेगवेगळ्या भांड्यात भरून फार लांब जावून प्रशांत महासागरात फेकून दिली. ती राख नेतांना याची पुरेपूर काळजी घेतली कि, त्या राखेचा एकही कण जपानच्या हद्दित पडला नाही पाहिजे किंवा त्याच्या समर्थकाना मिळाला नाही पाहिजे. जर त्याच्या समर्थकांच्या हाती हि राख पडली तर ते त्याचं स्मारक बांधतील, त्याला शहीद म्हणून घोषित करतील, त्याची पूजा करतील, त्याला हिरो म्हणून घोषित करतील.

तब्बल ७३ वर्षानंतर हा खुलासा झाला आणि जिकडे तिकडे ह्याच चर्चा चालू आहेत कि, एका व्यक्तीच्या मृत्युनंतरही त्याच्या मृतदेहाला असे का वागवण्यात आले? अमेरिकेने असे का केले असावे ?

दुसर्‍या महायुद्धात अमेरिका मित्र राष्ट्रांच्या बाजूने उतरण्यासाठी निमित्त ठरलेल्या पर्ल हार्बरावरील हल्ल्यांसाठी काहीजण तोजोस जबाबदार धरतात म्हणून कदाचित अमेरिका तेजो सोबत असं वागली असावी, परंतु …

यावर काही इतिहासकरांचे म्हणणे आहे कि, अमेरिकेने जपानला अपमानित करण्यासाठी हे सर्व काही केले जेणेकरून तेजो ने अमेरिकेला जे ७५ वर्षांपूर्वी नुकसान पोहचवले होते त्याचा राग अमेरिकेने  तेजोच्या मृतदेहावर काढला होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.