एका ज्युसवाल्याच्या मुलाने मार्केटमधल्या 5 मोठ्ठ्या कंपन्या बाजूला सारून “किंग” होवून दाखवलं..

टी- सिरीज कंपनीने आज चित्रपट निर्मितीत मोठं नाव कमावलं असलं तरीही टी- सिरीज म्युजिक कंपनी म्हणूनचं ओळखली जाते. आता इंटरनेटमुळे गाणं डाऊनलोड करणं ते ऐकणं सोपं झालं आहे. 

८० च्या काळात गाणं ऐकण्यासाठी रेडिओ नाही तर टेप रेकॉर्डर याचाच पर्याय होता. तेव्हा टी सिरीज कंपनीकडून गाण्याचे रेकॉर्ड करण्यात येत होते. टी सीरिजच्या प्रत्येक कॅसेटवर मालक गुलशन कुमार यांचे चित्र यायचे. गुलशन कुमारांनी रेकॉर्डिंग क्षेत्रात केवळ १४ ते १५ वर्ष काम केलं. त्यांनी केलेली ही क्रांती सगळयांची डोळे दिपवणारी होती. संपूर्ण देशात त्यांची ओळख कॅसेट किंग म्हणून झाली होती. 

ज्यूस विक्रेत्याचा मुलगा ते कॅसेट किंग झालेल्या गुलशन कुमार यांची ही कहाणी 

गुलशन कुमार यांचा जन्म दिल्लीतील एक पंजाबी परिवारात ५ मे १९५६ रोजी झाला. गुलशन कुमार दुआ त्यांचे पूर्ण नाव

गुलशन कुमार म्युझिक मार्केट मध्ये येण्यापूर्वी वडिलांना ज्यूस विक्रीच्या व्यवसायात मदत करत होते. त्यांच्या वडिलांनी  ज्यूस विक्री बरोबर कॅसेट रेकॉर्डिंगचा व्यवसाय सुरु केला. एका लहानशा जागेत सुरु केला रेकॉर्डिंग व्यवसाय पुढे गुलशन कुमार यांनी आपल्या आपल्या हातात घेतला. 

१९८० मध्ये बाजारात म्युजिक मार्केट भक्ती गीतांचा बोलबाला. गुलशन कुमारांनी भक्ती गीतांच्या कॅसेट बाजारात आणल्या. कॉपी राईट कायद्यातील त्रुटींचा फायदा घेत गुलशन कुमार जुने गाणे रेकॉर्ड करत. त्या गाण्याचे कॅसेट तयार करून ते बाजारात विकायचे. भक्ती गीतांच्या या कॅसेटला लोकांकडून पसंती मिळू लागली होती. 

११ जुलै १९८३ ला गुलशन कुमार यांनी टी सिरीज कंपनीची सुरुवात केली.  

१९८८ मध्ये आलेल्या कयामत से कयामत तक का पिक्चरने गुलशन कुमारांना खरी ओळख मिळवून दिली. या पिक्चरचा म्युजिक टी सिरीजने तयार केले होते. या पिक्चरचे गाणे खूप गाजले. टी सिरीजच हे पहिले यश होत. यामुळे कंपनीचा मार्ग बदलला.

पुढे ९० च्या दशकात टी सिरीज कडून काही पिक्चरची निर्मिती करण्यात आली.

त्यात महत्वाचा ठरला आशिकी. टी- सिरीज कंपनीला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यात आशिकीचा मोठा वाटा आहे. 

गुलशन कुमार आशिकी पिक्चर काढण्याऐवजी म्युजिक अल्बम बनवावा याचा विचार करत होते. त्यांनी गीतकाराला फोन करून सांगितले होते की, आशिकी मधील म्युजिक खूप मस्त आहे. यात पिक्चर सारखं मटेरियकल आहे असं वाटतं नाही.

आशिकी हा केवळ एक अल्बम होऊ शकतो. मात्र, गुलशन कुमार यांना गीतकार आणि महेश भट यांनी हा पिक्चर गाजेल असा विश्वास दाखवला. यामुळे गुलशन कुमार यांचे मत परिवर्तन झाले आणि आशिकी पिक्चर आला. त्यावेळी आशिकीने बॉलिवूड मध्ये धुमाकूळ घातला. 

आशिकी मध्ये एकूण १२ गाणी होती. यातील ‘बस एक सनम चाहिये’, तू मेरी जिंदगी है, मै दुनिया भूला दूंगा सारखी ही गाणे अजूनही गुणगुणले जाते. यानंतर दिल है की मानता नहीं पिक्चर आला आणि टी सिरीज पिक्चर निर्मिती कंपनी म्हणून पुढे झाली. 

१९९७ मधील एका अहवालानुसार त्यावेळी टी सिरीज कंपनीचा टर्न ओव्हर २.५ बिलियनचा झाला होता. गुलशन कुमार यांनी यावेळी दावा केला होता की, ऑडिओ कॅसेट मार्केट मध्ये ६५ टक्के हिस्सा एकट्या टी सिरीजचा आहे. 

यावेळी अनेकांचा दावा केला होता की, संगीत क्षेत्रात असणाऱ्या पायरसीचा फायदा घेऊन गुलशन कुमार यांनी हे यश मिळविलं आहे. यावेळी एक कॅसेट १६ रुपयांना विकली जात होती. ऑडियो कॅसेट मध्ये विकण्यात जे यश मिळविले ते व्हिडिओ कॅसेट मध्ये रिप्लिकेट करायचे होते.   

गुलशन कुमार यांनी केवळ रेकॉर्डिंगच्या क्षेत्राबरोबर त्यांनी साबण आणि डिटर्जन पावडर व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर क्षेत्रात गुंतवणूक केली होती. धार्मिक गोष्टीतही आवड होती. वैष्णोदेवी मंदिरात त्यांनी अन्नछत्र सुरु केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर आजही ते सुरु आहे. आता हे अन्नछत्र त्यांच्या मुलगा भूषण चालवितो. 

टी सिरीज ने दहा वर्षा पेक्षाही कमी वेळेत इतर मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढली. या सगळ्या कंपन्या महाग कॅसेट विकत. रेकॉर्डिंग क्षेत्रात काही ठराविक गायक, संगीतकार हे ठाण मांडून बसले होते. इतर कोणाला लवकर संधी मिळत नव्हती. ही परंपरा मोडीत काढली टी सिरीजने.

९० च्या दशकात टी सिरीज कंपनीने एक वादळ तयार केले होते. त्यामुळे आजही या कंपनीला म्युजिक कंपनी म्हणून अधिक ओळखले जाते.   

गुलशन कुमार यांनी उदित नारायण, सोनू निगम, अनुराधा पौडवाल, अल्का याज्ञिक, कुमार सानू यासारख्या गायकांना संधी दिली आणि आज ते कुठं आहे आपण पाह्तोयच. तर नदीम श्रवण, जतीन ललित सारख्या संगीतकारांना चित्रपटसृष्टीत काम मिळवून दिल्याचे सांगितले. 

त्यांची हत्या होऊन इतकी वर्ष झाली तरी बॉलिवूड मध्ये गुलशन कुमार यांचे नाव अजूनही घेतले जाते. यातच त्याचे यश आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.