स्वराज्यावर चालून आलेल्या खानानं सर्वात आधी आपल्या ६४ बायकांना डुबवुन मारलं

छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेला हरवून त्याचा जावळी प्रांत काबीज केला. शिवाजी महाराज आता एक एक किल्ला जिंकून आपले राज्य वाढवत होते. पुढे शिवरायांनी कर्नाटकात आपल्या राज्याचा विस्तार सुरु केला. हळू हळू ही वार्ता विजापूरच्या दरबारात पोहोचली.

बादशाहने शहाजी राजांना पत्र लिहून शिवाजीला थांबवा असा सांगावा धाडला. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. तेव्हा शिवाजी राजांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विजापूरच्या इभ्रतीस काळिमा फासणे असं समीकरण होतं.

प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढणारे स्वराज्य रोखण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी अली आदिलशहा दुसरा आणि त्याची आई बडी बेगम उलिया जनावा ताज सुलताना यांनी दरबारातील सरदारांना आव्हान दिलं. आणि आपल्या सर्व सरदारांना विचारलं की,

कोण रोखेल त्या शिवाजीला ?

कोणीच तयार होत नव्हतं. तेवढ्यात एक सरदार उठला आणि म्हणाला,

मै लावूंगा शिवाजी को… ! जिंदा या मुर्दा !

आदिलशहाचा मातब्बर सरदार अफजल खान याने हसत हसत आणि मोठ्या आत्मविश्वासानं ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतली होती. अफजल खान म्हणजे स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठे संकट होतं.

कारण ज्या अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ बंधूंना संभाजीराजांना कपटाने मारलं त्याच खुनशी राजकारणाचा भाग म्हणून शहाजीराजे यांना अटक झाली.

तो अफजलखान स्वराज्यावर चालून आला होता. एका मोठ्या फौजेचा तो अधिकारी होता. राजकीय बुद्धिमत्तेचा वापर करून त्याने शहाजीराजांना अटक घडवली आणि शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांची हत्या केली यात तो किती क्रूर होता हे दिसून येतं. शाही फर्माने आणि मोठी फौज घेऊन अफजलखान विजापुरहून निघाला.

मोहिमेवर निघण्याची तयारी सुरू असताना खान त्याच्या गुरूकडे कौल मागण्यासाठी गेला. त्याच्या गुरूनं मात्र या स्वारीत तुला फार मोठे यश येणार नाही तुझा जीविताला धोका पोहोचेल असं भाकित वर्तवलं. 

पण खानाला आपल्या कर्तबगारीवर जास्तच विश्वास होता म्हणून खानानं आपला बेत रद्द न करता मोहिमेवर जाण्याचं निश्चित केलं.

त्यात भरीस भर म्हणून विजापूरहून स्वराज्यात येताना त्याच्या सैन्यदलातील निशाणीचा हत्ती म्हणजे ढालगज फत्ते लष्कर हा अचानकपणे मरण पावला. केलेले भाकीत आणि प्रकरणामुळे खानाच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकायला लागली.

जर गुरूच भाकित खरं ठरलं तर आपल्या माघारी आपल्या ६० बायकांचं काय होईल हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला.

हा गुंता त्यानं क्रूर खुनशी वृत्तीने संपवून टाकला. असं सांगण्यात येतं की,

विजापूर जवळच्या बावडीमध्ये म्हणजेच विहीरीत बुडवून मारलं आणि त्याच्या जवळच असलेल्या कबरींमध्ये दफन केलं. त्या बायकांच्या एकूण ६० कबरी असल्यानं विजापूर मधला हा भाग आजही ‘साठ कबरीया’ या नावानं ओळखला जातो.

यातल्या ऐतिहासिक तथ्याबाबत आजही मत-दुमत आहेत. पण १० नोव्हेंबर हा दिवस मराठा साम्राज्यासाठी प्रचंड महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला आणि मराठेशाहीच्या ताकदीनं सारं विजापूर हादरलं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.