देशविरोधी लोकांची साथ देण्याचा आरोप टाटा समुहावर झाला होता.. 

पाच ऑक्टोंबर १९९७ साली इंडियन एक्सप्रेसच्या पहिल्या पानावर एक बातमी छापण्यात आली आणि भारतभरातल्या लोकांच्या बत्या गुल झाल्या. यामध्ये टाटा संन्सचे चेअरमन रतन टाटा, बॉम्बे डाईंगचे नुस्ली वाडिया, फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ आणि खासदार जयंत मल्होत्रा यांच्यात झालेल्या चर्चेचा अहवाल छापण्यात आला होता.. 

या बातमीच्या मागची पत्रकार होती ती रीता सरीन.. 

एकमेकांसोबत बोलत असताना हे लोकं आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रफुल्ल महंत यांच्या आसाम गण परिषदद्वारे टाटा समूहाच्या टाटा चाय लिमिटेडला निर्माण होत असणाऱ्या अडथळ्यांबाबत बोलत होती. या समस्येविरोधात कशा प्रकारे डिल करावी याची चर्चा करत असताना ते केंद्रातील काही सचिव पदावरील व्यक्तींचे नावे घेत होते.. 

नक्की प्रकार काय होता… 

२३ ऑगस्ट १९९७ साली आसमच्या फुटिरतावादी संघटनेच्या ULFA अर्थात युनायटेड लिबरेशन फ्रॅन्ट ऑफ आसामच्या प्रनेती डेका आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या दोघांना मुंबईच्या सांताक्रुझ विमानतळावरून अटक करण्यात आली. त्यांच्याकडे टाटा संन्स मधल्या एका उच्चाधिकाऱ्यांचे व्हिजिटिंग कार्ड मिळाल्याने खळबळ माजली होती. 

चौकशीत माहिती मिळाली की प्रनेती या आपल्या वैद्यकिय उपचारासाठी मुंबईत आल्या होत्या व त्याचा संपुर्ण खर्च टाटा समूह करत होता. याच घटनेचा फायदा घेवून मुख्यमंत्री असणाऱ्या प्रफुल्ल कुमार महंत यांनी टाटा समूह फुटिरतावाद्यांची मदत करतात असा आरोप केला. यामुळे देशभर हा विषय चर्चेत आला. दिल्लीच्या सत्ताकेंद्रात यामुळे खळबळ माजली. चहा लॉबी आणि ULFA च्या एकमेकांच्या पूरक धोरणांची चर्चा होवू लागली..

चहा लॉबी आणि ULFA यांचे संबध नेमके कसे होते.. 

ULFA ही फुटीरतावादी आणि दहशतवादी संघटना होती. त्यांनी भारतातून फुटून जाण्याचे प्रयत्न चालवले होते. यासाठी ते आसाममध्ये दहशतवादी कृत्य घडवून आणत. यातलाच एक प्रकार म्हणजे चहाच्या मळ्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच ते अपहरण करत व खंडणी वसूल करत. १९८९ मध्ये अशा प्रकरणात एकूण १० अधिकारी मारले गेले होते तर १२ अधिकाऱ्यांची खंडणी देवून सुटका करण्यात आली होती.. 

पण ULFA आणि टाटा मध्ये काही संबध होते का ? 

टाटाने डिक्लेरेशन देण्यापूर्वीच ULFA ने आमचे टाटा सन्स सोबत संबंध नसल्याचे स्पष्टिकरण दिले.

ULFA चा कमांडर परेश बरुआ यांने एक मुलाखत दिली त्यामध्ये त्याने सांगितले की,

आमच्या संघटनेने टाटांसमोर आम्हाला सहाय्य करण्याची ऑफर ठेवली होती पण टाटाने या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला होता. त्यांनी त्या ऐवजी आसामच्या स्थानिक लोकांची मदत करण्याचा निर्णय घेतला होता व त्या अंतर्गत इथल्या लोकांना मेडिकल सेवा मिळण्यासाठी एका ट्रस्टची स्थापना देखील केली होती. याचाच फायदा घेवून आमच्या प्रनेती डेका वैद्यकिय उपचारासाठी गेल्या होत्या. 

अस असताना मुख्यमंत्र्यांनी टाटा ला आरोपी का केलं होतं..? 

प्रफुल्ल कुमार महंत दोन वेळा आसामचे मुख्यमंत्री राहिले होते. १९८५ साली त्यांनी कलकत्ता येथे चहा लॉबीची भेट घेवून त्यांनी निवडणूकीसाठी फंडीग मागितले होते. मात्र टि लॉबिने आणि खासकरुन टाटाने याला स्पष्ट नकार दिला होता.

टाटाने आम्ही कोणत्याही राजकीय पार्टीला फंडिंग करणार नाही असे स्पष्टपणे महंत यांना सुनावले होते. यानंतर महंत निवडणूक जिंकले व पुन्हा मुख्यमंत्री झाले व त्यांनी टाटांसमोर अडचणी वाढवण्यास सुरवात केली. 

१९९० साली आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यातील एका चहाच्या मळ्यामध्ये चहा लॉबी आणि ULFA ची बैठक झाली होती. या बैठकीत ULFA ने प्रतिकिलो एक रुपयांची मागणी केली होती. त्या काळात ३.५ कोटी पर्यन्तची ही वार्षिक खंडणी असणार होती.

हा चहा लॉबीसाठी फायद्याचा व्यवहार होता पण हिंदूस्थान युनिलिव्हर या कंपनीने स्पष्ट शब्दान ULFA ला नकार दिला. यामुळे आतंकवादी कारवाया वाढल्या. हिंदुस्थान युनिलिव्हरने आपल्या माणसांना तिथून एका रात्रीच हलवलं आणि प्रफुल्ल कुमारांच सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. 

१९९७ साली महंत पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ULFA ची ताकद वाढली होती. ULFA ने त्यांच्यावर हल्ला केला त्यातून ते वाचले. तेव्हाच ULFA पुर्णपणे नेस्तनाबुत करण्याची त्यांनी शपथ घेतली. 

प्रनेती डेका पकडल्यानंतर नेमक काय झालं.. 

डेका यांच्याकडून व्हिजिटींग कार्ड सापडल्यानंतर टाटा टी लिमिटेडच्या जनरल मॅनेंजर असणाऱ्या एसएस डोगरा यांना अटक करण्यात आली. सोबतच मॅनेंजिग डायरेक्टर आर के कृष्ण कुमार आणि रीजनल मॅनेंजर बोलिन बोर्डोली यांच्या विरोधात अटक वॉरंट जाहीर करण्यात आलं.

रतन टाटांनी आपल्या कंपनीच्या डोगरा यांच्या सुटकेसाठी तर कृष्ण कुमार आणि बार्डोली यांच्या अटकपुर्व जामीनासाठी राम जेठमलानी आणि अरुण जेटली यांच्याकडे वकिलपत्र दिले.

याच दरम्यान टाटांनी नुस्ली वाडिया आणि सॅम मॉनेकशॉ यांच्या कानावर सर्व प्रकार घालून आपल्या बाजून लॉबिंग करण्याची विनंती केली होती व तीच टेप वर्तमानपत्रातून जाहीर करण्यात आली. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.