काँग्रेसच्या काळात ईडी इन्कमटॅक्स मागे लागली होती, आता त्याच संस्थेला टॅक्समध्ये सूट मिळालीय

योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्टला आता ५ वर्षांसाठी करात सूट देण्यात आली आहे. म्हणजे आता या संस्थेला देणगी देणाऱ्याला करात सूट मिळू शकते. ही सूट वैज्ञानिक संशोधनात गुंतलेल्या कोणत्याही विद्यापीठ, महाविद्यालय किंवा संस्थेला मिळू शकते.

म्हणजे आता कोणतीही व्यक्ती किंवा संस्था, पतंजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्टला काहीतरी देणगी देईल, तर मग त्या दिलेल्या पैशांच्या रकमेएवढी रक्कम त्याला टॅक्स बेनिफिट म्हणून कमी होईल. एकूणच त्याला कमी टॅक्स भरावा लागेल.

आता यामुळे पतंजलीला जास्तीच्या देणग्या मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

पण रामदेव बाबांच्या ज्या ट्रस्टला सूट मिळाली त्याच ट्रस्टवर एकेकाळी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट छापा मारण्याच्या आणि त्यांचं चॅरिटेबल ट्रस्ट रद्द करण्याच्या तयारीत होत. 

खरं तर २०११ सालात अण्णा हजारेंचं जनलोकपाल बिलासंबंधी आंदोलन चालू होत. त्यात काळा पैसा भारतात आणावा या मोहिमेत योग्य गुरु रामदेव बाबा सक्रिय होते. आणि अशातच एक बातमी आली.  ती म्हणजे रामदेव बाबांच्या ट्रस्टवर आयकर विभाग छापा मारण्याच्या तयारीत होत.

याची सुरुवात झाली होती रामलीला मैदानावर जे कांड घडलं त्यानंतर. पाहल्यांदा तर बाबांचे अत्यंत जवळचे शिष्य बाळकृष्णला पासपोर्टच्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं. त्यानंतर बाबांचा नंबर लागला.  

इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या मते, रामदेव बाबाचं, पतंजलि योगपीठ हे ट्रस्टच्या नावाखाली आपला व्यवसाय वाढवतंय. यावर इनकम टॅक्स डिपार्टमेंटने रामदेव बाबांना शंभर प्रश्न असलेली एक लिस्ट पाठवली.

आरोप करताना डिपार्टमेंटच म्हणणं होतं की,

पतंजलि योगपीठ ट्रस्ट चॅरिटीच्या नावावर सूट घेऊन आपल्या कमाईच साधन बनवते आहे. IT ऍक्टच्या सेक्शन १२ अ नुसार पतंजली योगपीठाला टॅक्समधून सूट मिळत होती. ज्यावेळी डिपार्टमेंटने ट्रस्टला त्यांच्या जमाखर्चाविषयी नोटीस पाठवली तेव्हा ट्रस्टने आपली कमाई शून्याच्या घरात असल्याचं सांगितलं. पण जेव्हा डिपार्टमेंटने ट्रस्टच्या अनोफिशियल खात्यांचा ऑडिट रिपोर्ट बघितला तेव्हा त्यात त्यांना ७२.३७ करोडच्या नोंदी सापडल्या.

या नोंदींमध्ये आयटी डिपार्टमेंटला पतंजली योगपीठाने  ७४.७४ करोड जमा आणि ८.७१ करोड खर्च दाखवला होता. म्हणजे याचा अर्थ ट्रस्टने एकूण पैशातले फक्त १२ टक्केच खर्च केले होते. आणि ६६.०३ करोड सरप्लस होते.

आयटी नियमांनुसार ट्रस्टला मिळालेल्या पैशांच्या ८५ टक्के पैसे चॅरिटीमध्ये खर्च केल्यावरच त्यांना टॅक्समधून सूट मिळते.

पण विषय इथंच संपला नाही. तर तो अजून वाढला 

बाबांच्या ‘हरिद्वार स्थिति पतंजलि योग पीठ ट्रस्ट, दिव्य योग मंदिर ट्रस्ट तथा भारत स्वाभिमान ट्रस्ट चे उत्पन्न १२० करोड रुपए असल्याचा दावा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने केला. आणि आपल्या ट्रस्टच्या माध्यमातनं रामदेव बाबा आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट विकतो असं ही म्हंटल.

खरं तर, त्यावेळी तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधात वातावरण खूपच तापलं होत. सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप  लावले जात होते. यात बाबा रामदेव अगदी पुढं पुढं होते. आणि त्यांच्या या पुढं पुढं करण्यामुळंच त्यांच्या मागं काँग्रेसनं ईडी, इन्कम टॅक्स लावलं होत असं म्हंटल जात होत. 

खुद्द रामदेव बाबांनी त्यांच्या मागं लावलेल्या ईडी, इन्कम टॅक्स विषयी बोलताना म्हंटल होत,

‘‘हमारी सीधी लड़ाई व्यवस्था से है और व्यवस्था जिनके हाथ है वो ताकतवर हैं, क्योंकि वो अपने अधिकार का दुरुपयोग कर रहे हैं।’’

त्यापुढं जाऊन बाबांच्या आयुर्वेदिक औषधांच्या कारखान्यांवर छापेमारी झाली. ही छापेमारी खाद्यविभागानं केली होती. या औषधांचं परीक्षण करण्यासाठी खाद्यविभागानं जवळजवळ ट्र्क भरून नेला होता.

या नंतर बऱ्याच कोर्टकचेऱ्या झाल्या. आणि २०१७ ला रामदेव बाबा यातून सुखरूप बाहेर पडले. पुढं जाऊन बाबांनी पतंजली रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टने पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मे २०१७ मध्ये त्याचे उद्घाटन झाले. लवकरच त्यांची ही संस्था देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी बनेल असा दावाही त्यांनी सोशल मीडियावर केला आहे.

एकवेळ अशी होती जेव्हा त्यांच्या या ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्याच संस्थेला आता टॅक्समधून सूट मिळाली आहे. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.