आंदोलकांशी कसं बोलायचं हे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलंय

गेल्या दोन दिवसांपासून भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पंजाबमध्ये घडलेल्या घटनेची मोठी चर्चा सुरु आहे.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पंजाबच्या दौऱ्यासाठी जेव्हा आले. तेव्हा काही शेतकऱ्यांनी रस्त्यावरचं त्यांच्या गाडीचा ताफा अडवला. पंतप्रधान १५ – २० मिनिट तिथं थांबून पुन्हा विमानतळाकडे मागे फिरले.

आपल्या सुरक्षा व्यवस्थेत चूक झाल्यामुळं नाराज असलेल्या पंप्रधान मोदींनी भटिंडा विमानतळावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना टोमणा मारत सुनावलं कि, “तुमच्या मुख्यमंत्र्यांना मी जिवंत परत आलो यासाठी आभार माना.”

आता पंतप्रधानांच्या या वाक्यानंतर वाद पेटणं साहजिकच होत. गृहमंत्रालय तसेच भाजपच्या मंडळींनी सुरक्षेत मोठी चूक केली म्हणून पंजाब सरकारवर निशाणा साधला. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी हे मुद्दाम हे घडवून आणलंय असा आरोप भाजपच्या मंडळींनी केला. एवढचं नाही तर पंजाब सरकारवर कारवाई करण्याची सुद्धा मागणी केली आहे.

पण या सगळ्या आरोपांवर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी सडेतोड उत्तर दिलंय. खरं तर घडतेच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ जानेवारीला त्यांनी पत्रकारांसमोर म्हंटल कि, 

“पंतप्रधानांच्या सुरक्षेची सगळी व्यवस्था झालेली. पण त्यांनी येणं टायमाला प्लॅन बदलला. त्याला मी तरी काय करू. आणि राहिला प्रश्न शेतकरी आंदोलकांचा ते शांततेत आंदोलन करत होते. त्यामुळे पंतप्रधानांसाठी मी शेतकऱ्यांवर गोळी नाही चालवू शकत.”

आता एवढं बोलून सुद्धा चन्नी गप्प बसले नाहीत. तर त्यांनी एका हिंदी चॅनेलच्या मुलाखतीत सगळ्या नेत्यांना आणि खासकरून भाजपच्या मंडळींना चांगलाच उत्तर दिलंय. 

म्हणजे झालं काय, एक हिंदी न्यूज चॅनेलच्या मुलाखतीत चन्नी मीडियाला सगळ्या प्रश्नांची चोख उत्तर देत होती. आता अर्थतच मुलाखत पंतप्रधानांसोबत घडलेल्या घटनेवर होती.  त्यांची उत्तरं अशी रोखठोक होती कि, मुलाखत घेणाराचं कंफ्युझ झाला. 

याच दरम्यान काही २०-२५ आंदोलन मुख्यमंत्र्याच्या गाडीच्या बाजूला जमा झाले. चन्नी यांनी लगेच कॅमेरामॅनला कॅमेरा बाहेर फिरवायला लावला. आणि आपण गाडीच्या खाली उतरून त्या आंदोलकांशी बोलणार असं म्हंटल. आंदोलन चरणजित सिंह चन्नी मुर्दाबादच्या घोषणा देत होते. तरी सुद्धा त्यांनी गाडीतून खाली उतरायचचं ठरवलं होत.  या दरम्यान छाननी त्यांनी कॅमेऱ्यात बघून म्हटलं कि

“इकडे बघा, या आंदोलकांना मला थांबवायचे आहे. हे आंदोलक मला रोखायला आलेत, मग म्हणून मी काय त्यांना मारू का? माझी गाडी थांबवायला २०-२५ लोक आले. पोलिसांनी ताफा घेतलाय. पंतप्रधानांची गाडी तर कुणी थांबवली सुद्धा नव्हती. त्यांची गाडी आंदोलकांपासून एक किलोमीटर मागे होती.”

यांनतर चन्नी गाडीतून उतरायला लागले.  मुलखात घेणारा त्यांना खाली उतरण्यास मनाई करत होता. पण चन्नी आपण जनतेने निवडून दिलेले नेते आहोत,  त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवणं माझं काम आहे,निषेध करणे हा लोकशाही अधिकार आहे.  हे आंदोलक कोणत्या ना कोणत्या विभागाचे कर्मचारी असतील. ज्यांना आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी इच्छा आहे. म्हणूनच ते आंदोलन करत आहे. त्यामुळे मला खाली उतरून त्यांच्याशी बोलायचं आहे. असं म्हणत पंजाबचे मुख्यमंत्री गाडीतून खाली उतरले. 

यानंतर चन्नी आंदोलकांजवळ गेले आणि त्यांना विचारलं कि, ‘तुमच्या मागण्या काय आहेत? त्यातल्या एकाच उत्तर दिल कि, उद्या चंदीगडमध्ये आमची तुमच्यासोबत बैठक आहे. यानंतर सीएम चरणजीत सिंह यांनी आंदोलकांना विचारले की, उद्या मी तुमच्या मागण्या ऐकण्यास तयार झालो आहे, तर तुम्ही माझ्या ताफ्याला का अडवताय? 

यावेळी एका आंदोलकाने मुख्यमंत्र्यांना सांगितले की, दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झालाय पण त्यांच्या अजून पूर्ण झाल्या नाहीत. त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी आंदोलकांना आश्वासन दिले की,  शुक्रवारी चंदीगड येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्यांनंतर ते त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठा व्हायरल होतोय. बरीच युजर्स मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत. जननेता कसा असतो. याच उदाहरण भाजपला घ्यायला सांगत आहेत. तर काही जण हा मुख्यमंत्री चन्नी यांचा फक्त स्टंट आहे असं म्हणतायेत.

आता ते काहीका असेना पण या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतुन एवढं तर स्पष्ट होतंय कि, चन्नी यांना भाजपच्या मंडळींना आणि मीडियाला दाखवून द्यायचे होते. एखाद्या जनतेने निवडून दिलेल्या नेत्याने आंदोलनासोबत कसे वागायला पाहिजे. जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे कि त्यांना बघून माघारी फिरलं पाहिजे.  

 

हे ही वाच भिडू :

 

1 Comment
  1. abhay says

    आणखी किती चाटणार कांग्रेसची.. पाकिट पोहचल वाटते चन्नी कडून.. “चन्नीपुराण”

Leave A Reply

Your email address will not be published.