छोटी काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगनाच्या गावाला ११ हजार कोटी रुपये मिळणारेत
निवडणूका आल्या कि त्या भागात किंवा राज्यात मोठं मोठ्या नेतेमंडळींचे दौरे वाढतात, नवनवीन आश्वासनांचा आवाज माईकवर घुमायला लागतो, मोठं- मोठे प्रोजेक्ट उभे राहतात. हे निवडणुका असलेलं राज्य सगळ्याच दृष्टीनं महत्वाचं असतं आणि निवडणूका होईपर्यंत माध्यमांमध्ये सुद्धा त्या भागातलीच चर्चा असते.
म्हणजेच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भव्य अशा काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उदघाटन केलं. थोडं-थोडकं नाही तर तब्बल ७०० कोटी रुपयांचा खर्च या सगळ्या कॉरिडॉरसाठी लागला. पण माध्यमांमध्ये पंतप्रधानांचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला होता.
काशी विश्वनाथ मंदिरातल्या लाईव्ह पूजे-अर्चे सोबतचं, मोदींच्या गंगा नदीतल्या डुबकीपासून रात्री १ वाजताची भटकंती सगळंच मीडियाने कव्हर केलं. पंतप्रधानांचा हा दौरा उत्तर प्रदेशातल्या जनतेसाठी खूपच फायदेशीर होता, ज्यात केंद्रानं आणि राज्य सरकारने अनेक मोठमोठ्या प्रोजेक्टची लिस्ट सुद्धा वाचून दाखवली.
आता आपल्या सगळ्यांनाच माहितेय कि, युपीचा हा चेहरा – मोहरा येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलण्यात आलाय. निवडणुकीच्या ऐन तोंडावर मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी केंद्र सुद्धा राज्यांच्या मदतीसाठी उतरलंय.
पंतप्रधानांचा हा काशीचादौरा सक्सेसफुल झाल्यांनतर आता मोदींनी हिमाचल प्रदेशातल्या कंगना रानौतच्या गावाकडे कूच केलीये. कंगना ताईंची मूळ गाव म्हणजे मंडी. या आठवड्याच्या सोमवारी पंतप्रधानांनी या शहराला भेट दिली.
मंडी शहराला भेट दिल्यांनतर पंतप्रधानांनी सांगितले की,
‘छोटी काशी’ला भेट देण्याचं सौभाग्य मला मिळालं.
आता पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर मंडी शहर तर मीडिया मध्ये झळकतंय, पण महत्वाच म्हणजे सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती या शहरातल्या आगामी प्रोजेक्टबद्दल, ज्यासाठी स्पेशली पंतप्रधान तिथं गेलेत. ते म्हणजे मंडीमधल्या ११,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या जलविद्युत प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी.
पंतप्रधान जसं दरवेळीप्रमाणं कुठं गेले कि त्या भाषेतून जनतेला संबोधित करत असतात. आताही त्यांनी मंडीतील स्थानिक बोली भाषा असलेल्या मांडयाली मधून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी शहरातील भूतनाथ मंदिर आणि पंचवक्त्र मंदिराला दिलेल्या भेटी आणि शिवधाम प्रकल्पासाठी सुरू असलेल्या कामाचा उल्लेख केला, ज्याची पायाभरणी त्यांनी गेल्या फेब्रुवारीमध्येचं केली होती.
आता थेट पंतप्रधानांनीचं मंडीचा ‘छोटी काशी’ असा उल्लेख केलाय म्हंटल्यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याचाच पुरत्याला दुजोरा दिला. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले.
“मंडीला ‘छोटी काशी’ हे टोपणनाव देण्यामागे सुद्धा एक स्टोरी आहे कि, मंडीमध्ये ३०० च्या आसपास पुरातन मंदिरे आहेत आणि राज्य सरकार काशीच्या धर्तीवर त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहे.”
या शहराला पुरातन वारसा असल्याने या भागातली बरीचशी मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने ‘संरक्षित’ स्मारकांच्या श्रेणीत ठेवलीत. ज्यात पंचवक्त्र मंदिर, त्रिलोकीनाथ मंदिर, अर्धनारीश्वर मंदिर आणि बारसेला मंदिर यांचा समावेश आहे. जी पार १५ च्या १६ व्या दशकात बांधली गेलीत. या आपल्या प्राचीन वारशामुळंच मंडी शहराला छोटी काशी असं म्हंटल गेलंय.
त्यात आता केंद्राकडून आणि राज्य सरकारकडून त्याच्या विकासावर भर देण्यात येणारे म्हंटल्यावर शहरातल्या पर्यटन वाढीला सुद्धा तितकचं प्रोत्साहन मिळणार आहे.
हे ही वाचं भिडू :