गोऱ्यांनी मतदान नाही केलं की ऋषी सुनकवर दगाबाजी उलटली असं आहे ब्रिटनचं संपूर्ण राजकारण

सीझरच्या नेतृत्वाखाली रोमन जवळपास सगळ्याच राज्यांचा प्रभाव केला होता. तो स्वतःला रोमच्या सम्राट म्हणून गोष्टी करण्याच्या तयारीत असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र रोमचं कामकाज लोकशाही पद्धतीने हाकलं जात होतं.

त्यामुळं तिथल्या सरदारांनी सीझरच्या मृत्यूचा कट आखला. त्यांनी सिझरला फसवून राजधानीत बोलावलं आणि त्याला घेरून त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. या सरदारांमध्ये एक नाव होतं ते म्हणजे ब्रुटस. ब्रुटस सिझरचा जिवाभावाचा  मित्र आणि साथीदार होता आणि तो देखील सिझरच्या हत्येमध्ये सामील झाला होता. जेव्हा ब्रुटसने सिझरवर हत्यार चालवलं तेव्हा हताश झालेल्या सिझरच्या तोंडातून आपसूकच निघालं.

ब्रुटस तू सुद्धा !

शेक्सपियरच्या ज्युलियस सीझर या सुप्रसिद्ध नाटकातला हा प्रसंग. आजही जवळचा व्यक्ती जेव्हा विश्वासघात करतो तेव्हा हा वाक्यप्रचार वापरला जातो. इंग्लंडच्या पंतप्रधानपदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही एक उमेदवाराला ब्रुटसची उपमा देण्यात आली आहे आणि त्या उमेदवाराचं नाव आहे ऋषी सुनाक.

ब्रिटनमधली दशकातील सर्वाधिक महागाई, कोविडचा विनाशकारी रेकॉर्ड, भ्रष्टाचार आणि ढोंगीपणाचे अनेक आरोप, आयर्लंडमधील राजकीय गोंधळ आणि स्कॉटलंडमधील अलिप्ततावादी सरकार या सगळ्यांमुळे बोरिस जॉन्सन यांचं सरकार वादग्रस्त ठरत होतं.

विरोधी पक्षाने सरकारविरोधात रान उठवायला सुरवात केली होती. जॉन्सन यांच्यावर पक्षातूनही दिवसेंदिवस राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत होता मात्र जॉन्सन काय खुर्ची सोडण्यास तयार नव्हते. मात्र त्याचवेळी जॉन्सन यांना सर्वात मोठा धक्का बसला.

बोरिस जॉन्सनच्या सर्वात जवळचे म्हणून ओळखले जाणारे आणि त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या ऋषी सुनाक यांनी राजीनामा दिला.

काही मिनिटातच आरोग्यमंत्री साजिद जावेद यांनी राजीनामा दिला आणि मग राजीनाम्याची रांगच लागली.  बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून जवळपास ५० लोकांनी राजीनामे दिले आणि बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक राहिला नाही.

आपल्यासारखी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांचं नेतृत्व मान्य नाही म्हणून पक्ष सोडण्याच्या किंवा फोडण्याचे प्रकार इंग्लंडमध्ये घडत नाहीत. जर पक्षनेतृत्व मान्य नसेल तर पक्षाचे सदस्य, आमदार आणि खासदार उघडपणे त्यांच्यावर टीका करू शकतात. जे आता कॉन्झरवेटिव्ह पक्षाच्या बाबतीतही घडले आहे.

पक्षाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आणि पंतप्रधानांवर दबाव आणला आणि तोही सरळ सरळ. इथं काही लपवून मग पाठिंबा देणारे आमदार रिसॉर्टमध्ये नेण्याचे धंदे चालत नाहीत.

त्यामुळे बोरिस जॉन्सन यांची लोकप्रियता ढासळत चालली आहे आणि त्यांचं नेतृत्व हे काय भरवश्याचं नाहीये हे लक्षात आल्यानंतर मंत्र्यांनी सरळ साथ सोडली आणि आपला दुसरा नेता निवडायचा निर्णय घेतला. त्यामुळे कॉन्झरवेटिव्ह पक्षाचे खासदार आणि सदस्य असे दोन्ही मिळून पक्षाचा नवीन उमेदवार निवडणार होते.

आता या प्रोसेसमध्ये जाण्याआधी ब्रिटनमधले पक्ष नेमके कोणते आहेत हे पाहू. 

तर शेकडो वर्षांपासून ब्रिटनमध्ये द्विपक्ष व्यवस्था आहे. अगदी १९२० पासून कॉन्झरवेटिव्ह पार्टी आणि लेबर पार्टी हे दोनच प्रमुख पक्ष ब्रिटनमध्ये आहेत.  बाकी स्कॉटिश नॅशनल पार्टी, लिबरल डेमोक्रॅट्स अशा अनेक ब्रिटनमध्ये आहेत पण त्यांची साइझ आणि व्याप्ती डोंगरी या दोन प्रमुख पक्षांच्या जवळपास जाणारीही नाही.

त्यामुळे ब्रिटनचा पंतप्रधान या दोन पक्षांमधूनच होत आला आहे. कॉन्झरवेटिव्ह पक्ष हा परंपरावादी,  आर्थिकदृष्ट्या कॅपिटॅलिस्ट विचारांचा ओळखला जातो. विन्स्टन चर्चिल, मार्गारेट थॅचर हे ब्रिटनचे पंतप्रधान कॉन्झरवेटिव्ह पक्षाकडूनच पंतप्रधान झाले होते.

अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची राहूनच गेली. मराठीमध्ये कॉन्झरवेटिव्ह पक्षाला हुझुर पक्ष तर लेबर पक्षाला मजूर पक्ष देखील म्हटलं जातं. आता बघूया दुसऱ्या पक्षाबद्दल म्हणजेच लेबर पार्टीबद्दल. नावावरूनच कळालं असेल की कामगारांच्या हितांसाठी लढण्यासाठी या पक्षाची स्थापना झाली होती. त्यामुळे समाजवादी विचारसरणीकडे झुकणारी ही पार्टी आहे. भारतासाठी या पक्षाचं योगदान म्हणजे भारताला स्वतंत्र मिळालं पाहिजे या मताचा हा पक्ष होता आणि ब्रिटनमध्ये या पक्षाची सत्ता असतानाच भारताला स्वतंत्र मिळालं होतं.

आता हळू हळू पुन्हा येऊया आपल्या मेन मुद्याकडं. ब्रिटनमध्ये भारतसारखीच संसदीय लोकशाही आहे. भारताने संसदीय लोकशाही व्यवस्था ब्रिटनकडूनच घेतली आहे. संसदीय लोकशाही व्यवस्था  म्हणजे जनता खासदार निवडणार आणि मग खासदार पंतप्रधान. 

भारताच्या आणि ब्रिटनमधल्या संसदीय लोकशाहीची समानता इथंच संपते. ब्रिटनमध्ये लोकशाही खोलवर रुजलेली आहे. ऋषी सुनाक आणि लिझ ट्रॉस यांच्यादरम्यानच्या निवडणुकी दरम्यानही तेच सिद्ध झालं. सध्याच्या घडीला ब्रिटनच्या लोकसभेत म्हणजेच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कन्झरवेटिव्ह पक्षाचं बहुमत आहे.

लोकसभेतील  ६५० जागांपैकी ३५७ जागा कॉन्झरवेटिव्ह पक्षाकडे आहेत तर लेबर पक्षाकडे फक्त २००. 

आता बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉन्झरवेटिव्ह पक्षाला आपला पक्षनेता निवडायचा होता जो पुढे जाऊन पंतप्रधान होईल. 

पण इथंही लोकशाही आहे जी भारतातल्या कोणत्याही पक्षात नाही. ती म्हणजे पक्षांतर्गत लोकशाही. त्यानुसार पक्षाचा नेता कोण असेल हे हायकमांड वगैरे ठरवत नाही तर त्यासाठी पक्षात निवडणूक होते.

त्यामुळे ज्यांना बोरिस जॉन्सन यांची जागा घ्यायचं होती अशा कॉन्झरवेटिव्ह पक्षाच्या पाच खासदारांनी पक्षाकडे आपली उमेदवारी दाखल केली. आता दोन फेजमध्ये निवडणूक होऊन मग पक्ष नेता निवडला जातो.

पहिल्या फेजमध्ये खासदार मतदान करतात.

 जे पाच उमेदवार उभे आहेत त्यातील शेवटचे दोन उमेदवार शिल्लक राहेपर्यंत खासदारांच्या फेऱ्या चालतात. त्यामुळे यावेळी कॉन्झरवेटिव्ह पक्षाच्या खासदारांच्या मताच्या पाच फेऱ्या झाल्या आणि शेवटी ऋषी सुनाक आणि लिझ ट्रॉस हे दोघंच राहिले.

या पाचही राऊंडमध्ये ऋषी सुनक पहिल्यापासूनच टॉपला राहिले. तर लिज ट्रॉस यांना शेवटच्या फेरीपर्यंत झगडावं लागलं.

शेवटच्या राऊंडमध्ये ऋषी सुनक यांना १३७ खासदारांनी पाठिंबा दिला तर लिज ट्रॉस यांना ११३ मतं मिळाली. आता या दोघांना कन्झरवेटिव्ह पक्षाचे जे जवळपास एक लाख साठ हजार नोंदणीकृत सदस्य आहेत त्यांच्यामधून निवडून यायचं होतं.

इथंही सुरवातीला आपली उत्कृष्ट वक्तृत्वशैली, बुद्धीमत्ता आणि अर्थमंत्रीपदाचा अनुभव या जोरावर ऋषी सुनक सुरवातीला बाजी मारतील अशी शक्यता निर्माण झाली आणि मात्र उत्तरोउत्तर ऋषी सुनक यांच्या विरोधात वातावरण तयार होत गेला आणि ते मागे पडत गेले.

इथंच काहीजण थेअरी मांडत आहेत की ऋषी सुनाक यांना पक्षाच्या गोरी सदस्यांनी मतदान केलं नाही आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला.

त्याच संस्थांनी प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार टोरीचे ९७ टक्के सदस्य गोरे आहेत. हा टोरी या नावानेसुद्धा कॉन्झरवेटिव्ह पक्ष ओळखला जातो. त्यामुळे मग गोऱ्यांनी एक भारतीय वंशाचा माणसाला पंतप्रधान होऊ दिलं नाही असं बोललं गेलं.

मात्र थोडा डीप गेल्यावर लक्षात येतं वंशाचा मुद्दा गौण होत जातो. ब्रिटनच्या एकूण लोकसंख्येतच गोरी लोकसंख्या ८७ टक्के आहे. तरीही या लोकसंख्येने ३० भारतीय आणि पाकिस्तानी वंशाचे खासदार संसदेत पाठवले आहेत. त्याबरोबरच ऋषी सुनक यांना शेवटपर्यंत ज्यांनी मतदान केलं ते खासदारदेखील बहुतांश गोरेच होते.

मग ऋषी सुनक नेमके कुठे मागे पडले?

तर आजही काही तज्ञ सांगतात की लिझ ट्रॉस यांच्यापेक्षा ऋषी सुंक शेवटच्या टप्प्यात जे त्यांच्यावर आरोप झाले त्यामुळेच जास्त मागे पडत गेले.

इतक्या दिवस एक सामान्य कुटुंबातला मुलगा, बुद्धिमतेच्या जोरावर चांगलं शिक्षण घेतो अशी त्यांची प्रतिमा होती. मात्र याला तडा गेला यावेळीच्या इलेक्शनला. त्याचं पाहिलं कारण ठरली त्यांची आणि त्यांच्या बायकोची संपत्ती.  या दाम्पत्याची एकूण संपत्ती ७३० मिलियन पाउंड असल्याचं समोर आलं. विशेषतः इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांची मुलगी असलेल्या त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांची संपत्ती आणि त्यांच्या नावावरची घरं इंग्लंडच्या राणीपेक्षा जास्त असल्याच्या बातम्या ब्रिटिश माध्यमांनी चालवल्या. त्यामुळे एवढ्या गर्भश्रीमंत माणसाला आपले महागाईने काय हाल होत आहेत हे कळेल का टोरी पार्टीच्या मतदाराना वाटलं आणि ऋषी सुनक यांची लोकप्रियता घटत गेली असं जाणकार सांगतात.

इन्व्हेस्टमेंट बँकर असलेल्या सुनक यांनी टॅक्स वाचवण्यासाठी त्यांची बायको अक्षता मूर्ती यांचं भारतीय नागरिकत्व कायम ठेवलं. अशाही गोष्टी समोर आल्या. त्याचबरोबर ब्रिटनला टॅक्स हेवन बनवण्याची ऋषी सुनक यांची योजनाही मतदारांच्या पचनी पडली नाही. महत्वाचं म्हणजे त्यांनी प्रचारासाठी गरीब जनतेकडूनही पैसा जमा केला होता अशा गोष्टीही समोर येत गेल्या.

त्यामुळे मग जेव्हा कॉन्झरवेटिव्ह पक्षाच्या एक लाख साठ हजार सदस्यांनी मतदान केलं तेव्हा लिझ ट्रॉस यांनी ऋषी सुनक यांचा सहज पराभव केला.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.