अंबानींनी १५००करोडचं घर गिफ्ट दिलेल्या त्यांच्या राइट हॅन्डचं कामपण तितकंच भारी आहे

मुकेश अंबानी आज भारतातलं  प्रत्येक पेपरचं पान म्हणा किंवा की टीव्ही चॅनेल हा माणूस जवळपास रोजच आपल्याला दिसतो. जगातल्या सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक असलेल्या या माणसाच्या प्रत्येक गोष्टीची बातमी होते. आता आपल्यापैकी काहीजण म्हणणार तुम्हीच त्यांच्या बातम्या देता. पण खरी परिस्तिथि ही देखील आहे की अंबानीसारखी माणसं जिथं जाऊन पोहचली आहेत तिथं पोहोचायची आपल्यापैकी अनेक जणांची महत्वाकांक्षा आहे. त्यामुळं या माणसांच्या वागणुकीवर आपलं पण लक्ष राहतंच.

आता अशीच एक कृती मुकेश अंबानी यांनी केली आहे ज्यामुळं पुन्हा त्यांच्याकडे जगाचं लक्ष गेलं आहे. त्यांनी आपल्या एका कर्मचाऱ्याला १५०० करोडचं घर भेट दिलं आहे. 

असे सांगितले जात आहे की हे घर २२ मजली आहे, यात सर्व प्रकारच्या सुविधा देखील आहेत. या वास्तूचे नाव वृंदावन असे आहे.  या बंगल्याचा प्रत्येक मजला ८,००० स्क्वेअर फूट आहे आणि जर आपण या संपूर्ण बंगल्याबद्दल बोललो तर ते १.७ लाख स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त आहे.त्याचबरोबर या घराची देखभाल करण्यासाठी १७५ जणांची फौज ठेवण्यात आली आहे. 

आता एवढं सगळं दिलंय म्हटल्यावर हा कर्मचारी पण साधासुधा नसणार. तर अंबानी समूहाची प्रामाणिकपणा, विश्वास आणि निष्ठेनं केलेल्या सेवेबद्दल मनोज मोदी यांना हे पद देण्यात आलं आहे.

डेसिग्नेशननुसार, मनोज मोदी रिलायन्स रिटेल लिमिटेडमध्ये संचालक आहेत.  जिओमध्ये Facebook च्या $५.७ बिलियन स्टेकमध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली होती जी आजपर्यंत टेक कंपनीने केलेली सर्वात मोठी FDI  भागीदारी आहे.मात्र अंबानी उद्योग समूहात मनोज मोदी यांचं काम याहूनही मोठं आहे.

 मनोज मोदी यांनी अंबानींच्या तिन्ही पिढ्यांबरोबर काम केलेलं आहे.

मनोज मोदी १९८० पासून रिलायन्सचा एक भाग आहेत — ज्या काळात धीरूभाई अंबानी यांनी त्यांचा तेल आणि पेट्रोलियम व्यवसाय सुरू केला होता. मुकेश अंबानी आणि मनोज मोदी या दोघांनी मुंबईतील युनिव्हर्सिटी ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये एकत्रच शिक्षण घेतले होते आणि तेव्हापासून त्यांची मैत्री होती.तेव्हापासून, त्यांनी धीरूभाई, त्यांचा मुलगा मुकेश अंबानी आणि आता त्यांची मुले ईशा आणि आकाश अंबानी यांच्यासोबत काम केले आहे.

मनोज मोदी मात्र त्यांच्या  कामकाजा बाबत अतिशय गुप्तता राखून असतात ते फार क्वचितच माध्यमांशी संवाद साधतात. 

त्यामुळे त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ मिळणं तसं विरळंच. पण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या हॉलमध्ये, मनोज मोदी हे रिलायन्सच्या कॉर्पोरेट साम्राज्यामागील सर्वात शक्तिशाली शक्तींपैकी एक मानले जातात.रिलायंसने वाटाघाटी केलेले  स्टार्टअप संस्थापक सांगतात की रिलायन्समध्ये मनोज मोदींच्या होकाराशिवाय कोणतीही मोठी गोष्ट कधीच पास होत नाही आणि ते एक प्रकारचे ‘मंजूरीचा शिक्का’ आहेत. 

त्यांचं संघटनेतील महत्वाचं स्थान  केवळ त्यांच्या निष्ठेमुळे नाही, तर रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी त्यांच्या अत्यंत हुशार, हुशार आणि सक्षम वाटाघाटी कौशल्यामुळे प्राप्त झालं आहे असं सांगण्यात येतं.

त्यामुळं या एवढ्या महत्वाच्या व्यक्तीचा रिलायन्स नं योग्य पद देऊन सन्मान केला आहे. कारण पैसा पेक्षा माणूस मोठा आहे. आणि पैसा कमवण्यासाठी मनोज भाईंसारखी माणसं जपली पाहिजेत हे अंबानी बरोबर ओळखतात आणि म्हणूनच ते अंबानी आहेत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.