मृतदेहांचा खच ओळखता येऊ नये यासाठी लाकडे आणि ओढण्या हटवण्याचे काम सुरु..?

उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या गंगा किनारी पडलेल्या मृतदेहांबाबत आता नवा वाद उफाळून आलाय. यापूर्वी गंगेच्या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने मृतदेहांचा खच पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते, यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

आता प्रयागराजमधील फाफमऊ आणि श्रृंग्वेरपुर घाटावरील सफाई कामगारांनी मृतदेहांना लपटलेल्या ओढण्या (चुनरी) आणि किनाऱ्यावरील लाकडं उचलायचं काम सुरु केल्यानं वादंग माजला आहे.

खुद्द प्रियांका गांधींना हा व्हिडीओ शेअर केला आहे, 

किनाऱ्याला पुरलेल्या मृतदेहांचा खच ओळखता येऊ नये यासाठी ती लाकडे आणि ओढण्या हटवण्याचे काम सुरु आहे. तर स्थानिक प्रशासनाच्या मते, असे काहीही नसून हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Screenshot 2021 05 26 at 4.58.16 PM

न्यूज चॅनेल्स आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ व फोटोंमध्ये असं दिसत आहे कि, मृतदेहांचे कपडे सुद्धा काढले जात आहेत. हे कृत्य अत्यंत गंभीर असून, याची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यांची समिती गठित करण्यात येणार असून दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल.

व्हिडिओत असं ही सांगण्यात आलंय की,

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सफाई कर्मचारी तैनात करण्यात आले आणि ओढण्या काढण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. दफनविधीनंतर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी लाकड लावण्यात आली. घाटावर दररोज मोठ्या संख्येने मृतदेह पुरले जात होते. त्यानंतर ही प्रशासनाने कोणतेच पाऊल उचलले नाही. म्हणून, लोकांना जेथे जागा मिळाली तेथे त्यांनी मृतदेह पुरले. गंगेच्या किनाऱ्यावर इतक्या मोठ्या संख्येने दफनविधी केल्याबद्दल अनेक पर्यावरण तज्ज्ञांनीही प्रश्न उपस्थित केले.

आता या विषयावरही राजकारण सुरू झालंय.

कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी या विषयावर ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

‘जीते जी ढंग से इलाज नहीं मिला, कितनों को सम्मान से अंतिम संस्कार नहीं मिला. सरकारी आंकड़ों में जगह नहीं मिली. अब कब्रों से रामनामी भी छीनी जा रही है. छवि चमकाने की चिंता में दुबली होती सरकार पाप करने पर उतारू है. ये कौन सा सफाई अभियान है?ये अनादर है-मृतक का, धर्म का, मानवता का’

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.