मल्टिप्लेक्स थिएटरचे मालक म्हणतात गेल्या दिड वर्षात आमचं ४८०० कोटींचं नुकसान झालंय..!
गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सगळेचं उद्योगधंदे बंद होते. ज्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. मात्र त्यांनतर कोरोना संक्रमितांमध्ये हळू- हळू घसरण होत असताना केंद्र सरकारने तसेच राज्यांच्या सरकारने आपापल्या भागातल्या संक्रमित आकड्यानुसार अनलॉक प्रक्रिया सुरु केलीये.
दरम्यान, ऑक्टोबर- नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या या अनलॉक प्रक्रियेत चित्रपटगृहांबाबत सरकारने सावधगिरी बाळगल्याचं दिसतंय. इतर अनेक राज्यांत जरी थिएटर सुरु झाले असले तरी महाराष्ट्रात मात्र अजूनही फिल्म थिएटर सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
अनेकदा याबाबत चर्चा करण्यात आली. मध्यंतरी तर सगळ्या खबरदारी घेत थिएटर्स सुरु देखील करण्यात आले होते. मात्र कोरोना संक्रमितांचा आकडा वाढल्याने पुन्हा एकदा थिएटरचं शटर डाऊन करण्यात आलं.
आता गेल्या दीड वर्षांपासुन आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगीच्या प्रतीक्षेत असलेल्या थिएटर मालकांनी अखेर कंटाळून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाचं पत्र लिहिलं. गेल्या ७ सप्टेंबरला मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) ने मंगळवारी महाराष्ट्र सरकारला तातडीच्या आधारावर राज्यातील चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याची विनंती केली.
खरं तर, याआधी ३ सप्टेंबरला मराठी नाट्य क्षेत्रातील व्यक्तींसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबरपासून सगळी सभागृह, नाट्यगृह आणि सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरू करणार असल्याचं म्हंटल होत. येत्या ५ नोव्हेंबरपासून ५० टक्के क्षमतेने ही सगळी सभागृह सुरू करण्यास तत्वतः मान्यता दिली होती.
मुख्यमंत्र्यांसोबत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी देखील याला दुजोरा दिलाय. त्यांनी म्हंटलं कि, सभागृह सुरू करण्याबाबत डिटेल कार्यप्रणाली योग्य वेळी जारी केली जाईल. मात्र, यात थिएटर्स आणि मल्टिप्लेक्सचा समावेश होणार नाही, असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं होत.
अमित देशमुख म्हणाले की,
थिएटर्स आणि मल्टिप्लेक्सबाबत एक वेगळा निर्णय घेण्यात येईल. कारण राज्यातील एकूण थिएटर्सपैकी बहुतेक बंद असल्याने त्यांना वापरण्यायोग्य करण्यासाठी वेळ लागेल.
मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या या घोषणेनंतरचं मल्टिप्लेक्स असोशिएशनने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते.
MAI ने अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या आपल्या पत्रात म्हंटलं की, चित्रपटगृहे बंद केल्यामुळे सिनेमा जगताला मार्च २०२० पासून मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागलेय. कोरोना महामारीचा चित्रपट उद्योगावर मोठा परिणाम झाला, कारण देशभरातील अनेक चित्रपटांची शूटिंग आणि चित्रपटगृहे दोनदा बंद झाली आहेत. मार्च २०२०पासून विचार केला तर मासिक ४०० कोटी रुपयांच्या दराने महाराष्ट्राच्या सिनेमा जगताला सुमारे ४,८०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Film industry appeals to government of Maharashtra for reopening of cinemas @CMOMaharashtra @rajeshtope11 @AmitV_Deshmukh #unlockcinemasavejobs pic.twitter.com/lgOyf82OZW
— Multiplex Association Of India (@MAofIndia) September 7, 2021
या संघटनेबरोबरच आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलीस, या वेगवगेळ्या थिएटर समूहांनी देखील एकाच वेळी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून सरकारला फिल्म थिएटर सुरू करण्याची विनंती केलीये.
या समूहांच्या म्हणन्यानुसार देशात इतर राज्यांत थिएटर सुरू झाली असली तरी हिंदी चित्रपटांसाठी महाराष्ट्र त्यातल्यात्यात मुंबई ही मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे राज्यातली चित्रपटगृहे सुरू होणे गरजेचे आहे. कारण राज्यभरात जवळपास १००० च्या वर थिएटर्स आहेत. ज्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लाखो लोकांचा रोजगार यावर अवलंबून आहे.
मात्र कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षीच्या मार्च पासून आतापर्यंत दोनदा बंदीचा सामना करावा लागलयं. महत्वाचं म्हणजे जेव्हा निर्बंध लागले गेले तेव्हा सांगल्यात आधी थिएटर्स बंद करण्यात आले, आणि आता सगळ्यात शेवटी सुरू होणार हाचं व्यवसाय आहे. यामुळे आतापर्यंत जवळपास ४,८०० कोटींचा फटका बसल्याचा दावा या व्यावसायिकांनी केलायं.
राज्यात इतर सगळे उद्योगधंदे सुरु असताना फिल्म थिएटर्सवर बंदी का ? असा सवाल या असोसिएशनने उपस्थित केलाय.
या अशोसिएशनने फिल्म थिएटर्स सुरु करण्याच्या मागणीबरोबरचं त्यांच्या खबरदारी विषयी देखील आपलं म्हणणं मांडलंय. गेल्या वेळी चित्रपटगृहांमध्ये लोकांची गर्दी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली, निर्जंतुकीकरण आणि सोशल डिस्टंसिंग करण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात आली,तरीही थिएटर्स सुरू करण्यास सरकारकडून होणाऱ्या विलंबाबाबत यांनी नाराजी व्यक्त केली.
मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या थिएटर्स सुरू करण्याच्या या मागणीला प्रोडक्शन ऑफ इंडिया सारख्या अनेक चित्रपट संघटनांनी सुद्धा आपला पाठिंबा असल्याचं म्हटलंय.
हे ही वाचं भिडू :
- फाळकेंच्याही १४ वर्षे आधी सावे दादांनी भारतात चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली होती
- आणि पुण्यात प्रभात स्टुडिओच्या जागी फिल्म इन्स्टिट्यूट उभी राहिली
- त्या एका आयडियामुळे माधुरीच्या धकधकची सेन्सॉरच्या कचाट्यातून सुटका झाली.