द मुसलमान – जगातलं एकमेव हस्तलिखित वर्तमानपत्र.

 

चैन्नईच्या एका बोळात असणारं द मुसलमान या वर्तमानपत्राचं मुख्य कार्यालय. छोट्याश्या टेबल खुर्च्यांवर बसून अग्रलेख लिहणारे संपादक, बातम्या लिहणारे उपसंपादक आणि  बातम्या जमा करण्याच्या गडबडीत असणारे वार्ताहर. सर्वसामान्य वर्तमानपत्राच्या कार्यालयात पहायला मिळेल असच चित्र या छोट्याश्या वर्तमानपत्राच्या मुख्य कार्यालयात दिसतं.

मग या वर्तमानपत्रात अस काय आहे जे जगातल्या कोणत्याच वर्तमान पत्रात नाही ? तर हे वर्तमानपत्र गेले ९१ वर्ष हस्तलिखित स्वरुपात प्रकाशित केलं जातं. हिच गोष्ट या वर्तमानपत्रास असामान्य बनवते.

द मुसलमान या दैनिकाची स्थापना १९२७ साली चैन्नईत करण्यात आली. जनाब सय्यद अजमल उल्ला यांनी या वर्तमानपत्राची स्थापना केली. त्यांनी वर्तमानपत्र सुरू केलं तेव्हा भारतात सर्रास टंकलेखनाची पद्धत वापरली जात होती मात्र काहीतरी वेगळं करावं ज्यातून आपलं उर्दूवरचं प्रेम ही लोकांच्या घराघरात पोहचेल या हेतूनं त्यांनी द मुसलमान च्या बातम्या हाताने लिहण्यास सुरवात केली.

Screen Shot 2018 03 14 at 7.15.21 PM

संपादक, उपसंपादक, वार्ताहर या सर्वांच एकच काम ठरलेलं ते म्हणजे रोजच्या बातम्या हाताने लिहून मग छापखान्यात देणं. जनाब सय्यद अजमल उल्ला यांनी सुरू केलेला हा अनोखा उपक्रम आज त्यांची तिसरी पिढी संभाळत आहे.

जनाब सय्यद अजमल उल्ला यांचे नातू सय्यद अरिफउल्ला हे या दैनिकाचे संपादक म्हणून काम पाहतात. ते सांगतात की, आज या वर्तमानपत्रात ६ जण काम करत असून हे सर्व उर्दूच्या प्रेमातून काम करतात. हस्तलिखित स्वरुपात प्रकाशित होणारं हे वर्तमानपत्र भारतातील एकमेव वर्तमानपत्र तर आहेच पण कदाचित ते जगातलं देखील एकमेव वर्तमानपत्र असू शकतं.

गेली ९१ वर्ष तेही फक्त भाषेच्या प्रेमासाठी रोज हाताने बातम्या लिहणाऱ्यांच वैशिष्ट म्हणजे १९२७ पासून जो कोणी या वर्तमानपत्रात कामासाठी आला तो कधीच हे वर्तमानपत्र सोडून गेला नाही. त्यांच्या या जिद्दीला बोल भिडूचा साष्टांग !!!

 

Leave A Reply

Your email address will not be published.