दुनिया में बस दो ही चीजे बिकती है एक दारू.. और दुसरी गंदी बात !

दुनिया में बस दो ही चीजे बिकती है एक दारू.. और दुसरी गंदी बात !

सिनेमा सुरु आहे ..

सविता भाभीचा सीन सुरु आहे..

रात्रीच चांदणं पडलं आहे. सविता भाभी आतिषला बिलगून स्कुटरवर बसली आहे. आपल्या प्रेमभरल्या आवाजात ती त्याला विचारते आहे..

में वहा आकर अपनी इमेज गवा दूंगी, अपनी मिस्ट्री गवा दूंगी.. तुम क्या गवाओगे??

आतिष उत्तरतोय – व्हर्जिनिटी..

पाटी पडते अश्लील उद्योग मित्र मंडळाच्या नावाने.. आणि अचानक मधूनच बॅकग्राऊंडला गाणं सुरु झालंय..

जोबनवा म्हारा फ़ायर है
जो टच ना करे वो कायर है।
जो इस पे ना अट्टरॅक्ट हुआ।
वो अव्वल दरजे का लायर है …

सविता भाभी जशी आपल्या गोड आवाजाने आतिषला घायाळ करते. अगदी तसच ती रोज हजारो पुरुषांना आपल्या मदमस्त आवाजाने घायाळ करत आली आहे. ती रोज स्वप्नात येते पुरुषांच्या. फोन वर गप्पा मारते. आपल्या जीवनातल्या दुःखाच्या आनंदाच्या गोष्टी ती सांगते. मात्र ती समोर कधी येत नाही.

सविता भाभी असंख्य पुरुषांसाठी एक मिस्ट्री आहे. काहींसाठी ‘सविता भाभी’ गुप्तपणे विकल जाणार छापील पुस्तक आहे. तर काहींसाठी ती इनकॉग्निटो मोडवर किंवा प्रॉक्सी साइटवर बघितली जाणारी वेबसाइट आहे. सविता भाभी ओटीटी इरोटिकाचे भव्यदिव्य जग आहे.

ओटीटी इरोटिका.. ये ऍप होता तो सभी के पास, मगर देता कोई नहीं..सभी छूपाकर देखते है।
जैसे कि,

डॉक्टर – मेरी गर्लफ्रेंड मुझे घोडा बुलाती है
देवीजीं – घोडा ? किस टाईप के घोडे हो तुम
जितने वाला घोडा या… एनीवेज
u gott to take my Measurement
डॉक्टर – में फिर मेजरमेंट टेप लेके आता हू.
देवीजीं – मेजरमेंट टेप कि क्या जरुरत है?

अल्ट बालाजी स्ट्रीमिंग ऍपवर उपलब्ध असणाऱ्या ‘XXX अनसेन्सॉर्ड’ या सिरीजमधला हा डायलॉग. या सीन मध्ये अस काहीही नाही जे ‘नग्नता’ या श्रेणीत ठेवता येईल. जस आपण बॉलिवूडच्या एखाद्या मेनस्ट्रीम चित्रपटात हिरोईनच क्लीवेज, कंबर,पोट, मांडी बघतो ना अगदी सेम टू सेम तसच या सिरीज मध्ये दिसत.

या सिरीजची स्टोरीलाईन पाहिली तर समजेल कि, काय साधे विषय असतात हे. आता ‘XXX अनसेन्सॉर्ड’च बघा.. डॉक्टरकडे आपल्या शरीरावर सर्जरी करून घेण्यासाठी आलेली एक देवीजीं असते. बसsss.. यापुढे आहे ते सगळं डर्टी टॉक. बॉलिवूडच्या सिनेमांपेक्षा या सिरीज वेगळ्या ठरतात ते याच डर्टी टॉक्समुळे. म्हणून या सिरीज सॉफ्ट पॉर्न कॅटेगरीत मोडतात. कमी बजेटमध्ये बनविलेल्या आणि सॉफ्ट पॉर्न वर्गात मोडणाऱ्या बर्‍याच सिरीज अनेक स्ट्रीमिंग अ‍ॅप्सवर उपलब्ध आहेत. आपण जे नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम किंवा झी-फाइव्ह सारख्या अ‍ॅप्सवर शोधण्याचा प्रयत्न करतो ना.. ते अगदी कमी पैशात मिळत या अ‍ॅप्सवर.

उल्लू, अल्ट बालाजी, कुकू, गुपचूप, फ्लीझ, द सिनेमा दोस्ती हि अशीच काही स्ट्रीमिंग ऍप्स आहेत.

जुन्या जमान्याच सॉफ्ट पॉर्न डेबोनायर, रती कामदेव, मधुर कहानीया, बिंदिया, महानगर कहानीया अशी मासिक अर्थातच मॅगझिन्स तुम्ही एखाद्या रेल्वे स्टेशनवर, बुक स्टॉल वर पाहिलीच असतील. ही मासिक कामसूत्राचा भांडार आहेत. याआधी लोक कालीगंगा आणि पोलीस टाइम्स वाचायचे. त्यानंतर माणूस नामक प्राण्याने प्रगती केली आणि तो मॅगझिन्सकडे वळला. आता या मॅगझिन्सच्या काही कथांची शीर्षके पहा:

१. नवऱ्याची मदत
२. मराठी मादक कथा
३. काकूंचे किस्से
४. रात्रीचा पाऊस
५. पाटलाने कर्ज वसूल केले

प्रत्येक अंकात अशा 10 ते 15 इरॉटिक स्टोरीज असतात. वरून मसाला म्हणून स्त्री मादकतेचे प्रतीक असणाऱ्या उघड्या मांसल मांड्या दाखवल्या जातात. आता तुम्ही म्हणाल, काय राव हार्डकोअरच्या जमान्यात हे आम्हाला बुंदी रायत्याची स्टोरी सांगतायत.. तो जनाब रुको जरा, सबर करो..

और सुनो

इंटरनेटमुळे खेडोपाडी क्रांती घडली. डेटा पॅक भारतात आल्यापासून व्हिडीओच्या रूपात आपल्याला सॉफ्ट पॉर्न, इरॉटिकचे जग खुल झाल. सुमारे १०-१२ वर्षांपूर्वी भारतात डायल अप कनेक्शन मिळायला सुरुवात झाली आणि २००८ सालात यूट्यूबच भारतात लॉन्चिंग झालं. त्यावेळी ना कम्युनिटी गाईडलाईन्स होत्या ना पायरसीचे काही कठोर नियम होते. याचाच फायदा सॉफ्ट पॉर्न इंडस्ट्रीला झाला. युटूयबवर हुल्लड माजवून दिली या व्हिडिओंनी. एखाद्या प्रथितयश बॉलिवूडच्या ट्रेलरला पण इतके व्हिव्ज नसतील इतके या व्हिडिओंना असायचे.

उदाहरण दाखल ‘देसी जलवा’ आणि ‘मैटीनी मस्ती’ चे व्हिव्ज तुम्ही चेक करू शकता.. 2.80 करोड़च्या वर आहेत या व्हिडीओचे व्हिव्ज.

जमाना बदलता गया, रेस्ट्रिक्शन्स आते गये.. सब सेन्सॉर्ड होता गया…

याआधी आपण पहिलेल्या युटूयब वर सुमार स्टोरी, सुमार अभिनयाचा दर्जा, आणि भरपूर मेकअप फासलेल्या सुमार अभिनेत्री होत्या. या सगळ्याला कारण ही असच सांगता येईल कि हे सिनेमे एकतर रिजनल होते त्यात कमी बजेट, भोजपुरी आणि माल्लू ऑन्टीचा वावर. त्यामुळे त्यांचा दर्जा हि सुमारच असणार.

या सगळ्या कालावधीत आलं ४ जी नेटवर्क. आणि मग आला ओटीटी प्लॅटफॉर्म. लोकांची क्रयशक्ती वाढली. सहाजिकच चांगल्याची अपेक्षा नाही का वाढणार?

ओटीटीवर पाहिले जाणारे व्हिडिओ हे भारी बजेटचे व्हिडिओ असतात. ज्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. यात काम करणारे नट नट्या कदाचित अनुभवी नसतील,पण ते युट्यूबच्या लो बजेट चित्रपटांप्रमाणे ओव्हर ऍक्टर नसतात. मेन स्ट्रीम चित्रपटांप्रमाणेच त्याचे निर्माते, दिग्दर्शक, कास्टिंग दिग्दर्शक, लेखक, संवाद लेखक आणि वेशभूषा दिग्दर्शक असतात.

१०० हुन अधिक बी आणि सी ग्रेड सिनेमे बनवणारे ऍक्टर कम डिरेक्टर कम प्रोड्युसर असलेले तिलक बाबा म्हणतात,

एका महिन्यात २० ते ३० बी आणि सी ग्रेड सिनेमे बनतात. त्यातले अर्धे तर तयार होण्याच्या आधीच डब्यात जातात. आत्ता ओटीटी प्लॅटफॉर्मचा जमाना आहे. आधी येणारे बी आणि सी ग्रेड सिनेमे छोट्या सिनेम हॉलमध्ये लागायचे. खर्चापेक्षा इन्कम चांगल असायच. प्रत्येक प्रोजेक्टची किंमत वेगळी असते. आता हातात सहज मोबाईल आल्याने अशा सिनेमांची मागणी वाढली आहे पण ओटीटी प्लॅटफॉर्म वर.

अशाच चित्रपटाच्या सेटवर काम करणारा एक मेकअपमॅन म्हणतो, वही कॅमरा, वही लाईट हैं वही स्टुडियो है.. सब सेम है, बस सी ग्रेड का नाम दिया है. अब इस छोटी फिल्मो में आप किसिंग नही दिखाओगे, स्मूजिंग नही दिखाओगे तो क्या दिखाओगे, जय संतोषी माता दिखाओगे.. तो आपको आत्महत्या करनी पडेगी. और बिना सेक्स के आदमी का जीवन ही बेकार है.

बर सेक्स तर इम्पॉरटंन्ट आहे.. तर मग सॉफ्ट पॉर्न का.. हार्ड कोअर का नाही?

तो लिजिए लोगों के जवाब

१. तुषार म्हणतो कि, त्याचा नेहमीच हार्ड कोअरचा मूड नसतो. कधीकधी मला एखादा चांगला सॉफ्ट पॉर्न व्हिडिओ पहावासा वाटतो. पण एक मात्र आहे कि हे चित्रपट परिपूर्ण मार्गाने चित्रीत झाले असावे आणि पॉर्नस्टार्स पण खूप चांगले दिसतील अशा पद्धतीने.

२. एक मुलगी म्हणते मी सतत हार्डकोर नाही बघू शकत. मळमळत मला जास्त झालं कि, तर कधी कधी काही फिलच होत नाही.

हार्ड कोअर पॉर्न हे नेहमी पुरुषी केंद्रित असत. प्रत्येक वेळी मुलींना ते बघायला आवडेलच असं नाही. त्यांच्या सीन्सची हाईट तर इतकी असते की, लेस्बीयनसाठी काढलेली हार्ड कोअर पॉर्न पण पुरुषांसाठीच चित्रित केलीत का असा भास होतो. हार्ड कोअरचे विषय पण कधीकधी ओकारी येण्यासारखे असतात. जस कि स्लेव्ह पॉर्न, हिंसक पॉर्न, एनल सेक्स, ओरल सेक्स, रेप पॉर्न. आणि मेन म्हणजे यांना स्टोरीलाईन नसते.

म्हणून आत्ता चलती आहे ओटीटीची. त्याच्यावर काय बघतात लोक?

तर हे बघतात,

गंदी बात (अल्ट बालाजी) :रुरल एरिया मधल्या इरॉटिक स्टोरीज
चरम सुख – जाणे अंजाने मे : ( ullu) सासरा आणि सुनेच्या स्टोरीज
अतिथी इन हाऊस (kooku) : घरमालकिनीचे नवीन नवीन भाडेकरू बरोबर संबंध
मस्तराम ( MX player) : जुन्या मस्तराम या मॅगझीनवर आधारित कथा आणि लेखकाची कथा निर्मितीची प्रक्रिया
XXX अनसेन्सॉर्ड (Alt balaji) : वेगवेळ्या पात्रांच्या कथा

पॉर्न वर चर्चा करावी कि करू नये हे एक द्वंद्वच आहे. आपण लोकांच्या डोळ्यावर पट्टी तर नाही बंधू शकत. इशिका बोरा जी एक मॉडेल आहे, आसामच्या रिटायर्ड पोलीस कमिशनरची मुलगी आहे, ती म्हणते लोकांना असं वाटत हि बोल्ड शूट करते, बी ग्रेड मध्ये काम करते म्हणजे ही इजिली अव्हेलेबल होऊ शकते. जे लोक बोलतात की पॉर्न इंडस्ट्री घाण आहे दलदल आहे असेच लोक जास्त बघतात असे सिनेमे. साडी नेसून करतो सिनेमे तयार, बघणार का कोणी?

ज्याचं त्याच उत्तर त्याच त्यानेच ठरवायचं आहे. आम्ही तर बाकी इतिहास सांगितलाय. आणि बॅकग्राऊंडला गाणं सुरूच आहे बरं,

तू देख सिनेमा लेटे लेटे खाट पे

आ दिल बेहला दु तेरा गंदी बात से
आ दिल बेहला दु तेरा गंदी बात से

  •  स्नेहल माने 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.