अयोध्येनंतर आता ज्ञानवापीच्या निकालातही ‘कार्बन डेटिंग’ महत्त्वाचं ठरु शकतंय…

ज्ञानवापी मस्जिदीच्या वूजूखान्यात शिवलिंगासारखी मूर्ती आढल्यानंतर काशीत मंदिर-मस्जिद वाद निर्माण झाला आहे. वूजूखान्यात सापडलेली मूर्ती ही शिवलिंगच आहे असा दावा हिंदू पक्षाच्या वतीने करण्यात येतोय.  

या प्रकरणात ज्ञानवापी मस्जिदीच्या पश्चिम भिंतीवरील शृंगारगौरीची पूजा करणाऱ्यांपैकी ५ महिलांकडून, शिवलिंगाचे सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. 

त्यावर जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर मस्जिदीत सर्वेक्षण झालं. सर्वेक्षणात वूजूखान्यात शिवलिंगासारखी मूर्ती सापडली. मग या पाच याचिकाकर्त्या महिलांपैकी ४ महिलांनी मूर्तीची कार्बन डेटिंग करण्यात यावी, अशी याचिका जिल्हा न्यायालयात दाखल केली आहे. या पक्षाकडून अयोध्येमध्ये सापडलेल्या वस्तूंवर करण्यात आलेल्या कार्बन डेटिंगचा संदर्भ देण्यात आला आहे.

मात्र यातील प्रमुख याचिकाकर्त्या राखी सिंग यांनी कार्बन डेटिंगचा विरोध केलाय. या पद्धतीचा विरोध करतांना राखी सिंग यांनी असं म्हटलंय की, 

“कार्बन डेटिंग पद्धतीने मूर्तीची तपासणी केल्यास मूर्ती भंगेल आणि भंगलेल्या मूर्तीची हिंदू धर्मात पूजा केली जात नाही. त्यामुळे या मूर्तीची कार्बन डेटिंग करण्यात येऊ नये.’

राखी सिंग यांच्यासोबतच मुस्लिम पक्षाने सुद्धा कार्बन डेटिंगला विरोध केलाय. 

याबद्दल अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमेटीचं असं म्हणणं आहे की, 

“कार्बन डेटिंग ही कार्बन शोषून घेणाऱ्या वस्तूंची केली जाते, यात झाडं, झुडपं, मृत व्यक्ती, जनावरांची हाडं या वस्तूंची तपासणी केली जाऊ शकते. मात्र लाकूड आणि दगडांवर या पद्धतीचा पवापर केला जाऊ शकत नाही. कारण या दोन गोष्टी कार्बन शोषूनच घेऊ शकत नाहीत.” 

त्यामुळे असा प्रश्न निर्माण झालाय की, हिंदूंचे दोन गट आणि मुस्लिम पक्ष या तिघाड्यात अडकलेली ही कार्बन डेटिंगची पद्धत नेमकी काय आहे? 

तर ढोबळमानाने समजायचं झाल्यास कार्बन डेटिंग म्हणजे प्राचीन अवशेषांवर असलेल्या कार्बनचा अभ्यास करून ते अवशेष किती वर्ष जुने आहे हे सांगण्याची प्रक्रिया होय. आता सायन्सच्या डेफिनेशनने गांगरु नका सोप्यात समजून घ्या. 

या कार्बन डेटिंगच्या पद्धतीला ॲब्स्यूल्यूट डेटिंग या नावाने सुद्धा ओळखलं जातं  या पद्धतीच्या वापराने जवळपास ४० ते ५० हजार वर्षापर्यंत जुन्या वस्तूंचं वय किती आहे हे माहित करता येतं. मात्र अनेकदा या पद्धतीच्या वापराने अगदी तंतोतंत कालखंड माहित होत नाही असे आक्षेप सुद्धा या पद्धतीवर घेण्यात येतात.

मात्र यावर वाद जरी असले तरी कार्बन डेटिंगचा वापर गेल्या ७३ वर्षांपासून जगभरात करण्यात येतोय.

या पद्धतीचा शोध १९४९ सालात अमेरिकेतील शिकागो युनिव्हर्सिटीतील संशोधक विलियर्ड लिबी यांनी लावला होता. त्यांच्या या संशोधनासाठी १९६० साली संशोधनातील नोबेल सुद्धा त्यांना देण्यात आला होता. त्यांच्या या संशोधनाच्या काही मर्यादा असल्या तरी, या पद्धतीचा वापर अनेक देशांमधील पुरातत्व अवशेषांचा कालखंड माहित करण्यासाठी केला जातो.

कार्बन डेटिंगवर संशोधन करण्यासाठी भारतातील पहिली प्रयोगशाळा १९६० मध्ये सुरु करण्यात आली होती. हे प्रयोगशाळा टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर मध्ये अस्तित्वात आहे. त्यानंतर लखनौ, अहमदाबाद आणि मुंबई विद्यापीठात सुद्धा राष्ट्रीय स्तरावरील कार्बन डेटिंगच्या प्रयोगशाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. 

एखाद्या वस्तूचं वयोमान मोजण्यासाठी या पद्धतीने काही स्टेप्स वापरल्या जातात.

पृथ्वीच्या वातावरणात कार्बनचे तीन आयसोटोप्स अस्तित्वात आहेत, यात कार्बन १२, कार्बन १३, आणि कार्बन १४ यांचा समावेश होतो. यातील कार्बन १२ आणि कार्बन १३ हे स्थायी स्वरूपात अस्तित्वात असतात तर कार्बन १४ हा अस्थायी स्वरूपात अस्तित्वात असतो.

कार्बन डेटिंगसाठी कार्बन १२ आणि कार्बन १४ यांची आवश्यकता असते. यात ठराविक वस्तूवरील कार्बन १२ आणि कार्बन १४ चे नमुने गोळा केले जातात. नमुन्यांची तपासणी करून ते नमुने किती जुने आहेत याची सरासरी काढली जाते.

कार्बन १४ हा एक रिडिओॲक्टिव्ह कार्बन आहे. या कार्बनची निर्मिती रिडिओॲक्टिव्ह किरणं आणि आकाशातील विजांच्या प्रभावाने होणाऱ्या एन. पी. प्रक्रियेमुळे होत असते. या कार्बनची जशी निर्मिती होते त्याचा पद्धतीने हा नष्ट सुद्धा होतो. जवळपास ५७३० नंतर या कार्बनचं प्रमाण अर्ध्यावर येतं.  

संशोधक सांगतात की, हा कार्बन जितक्या जास्त गतीने नष्ट होतो त्याच्या २७-२८ टक्के जास्त गतीने याची निर्मिती होत असते. यामुळे याती संतुलन साधने कठीण असते.

याच पद्धतीचा वापर करून कार्बन १४ च्या विघटनाचं प्रमाण किती आहे याची तपासणी करून नमून्याचं वय तपासलं जतन. या पद्धतीनुसार ४० ते ५० हजार वर्षापर्यंत जुन्या वस्तूंचा कालखंड तपासला जाऊ शकतो. 

या पद्धतीत आवश्यकतेनुसार एएमएस म्हणजेच एक्सिलेरेटेड मास स्पेक्टॉमीट्री, ओएसएल म्हणजेच ऑप्टिकल स्टिम्युलेटेड ल्युमिनेंसेस तसेच थोरियम-२३० या पद्धतींचा सुद्धा वापर केला जातो. 

पण या कार्बन डेटिंग पद्धतीच्या वापराच्या काही मर्यादा सुद्धा आहेत.

कार्बन डेटिंगमध्ये केवळ कार्बन शोषून घेणाऱ्या वस्तूंच्याच नमुन्यावर संशोधन केलं जाऊ शकतं. यात लाकूड, कोळसा, बियाणं, बीजाणू, परागकण, हाडं, चामडे, केस, पंख, शिंग, रक्ताचे अवशेष, मृदा, माती, शंखशिंपले, भांडी, भिंतींवरील आणि लेण्यांवरील चित्र, कागद इत्यादी वस्तूंवर संशोधन केलं जाऊ शकतं. 

मात्र दगड आणि धातूचं वय शोधण्यासाठी कार्बन डेटिंगचा वापर करण्यात येत नाही, तसेच संशोधन करतांना वस्तूवरील केवळ नमुने घेण्यात येतात असं संशोधक सांगतात. 

याच आधारावर अयोध्येमध्ये झालेल्या उत्खननात सापडलेल्या वस्तूंवर कार्बन डेटिंगचा वापर करण्यात आला होता. 

याबद्दल रामलल्ला मंदिर केसचे वकील झालेल्या कार्बन डेटिंगबद्दल माहिती दिलीय.  

ते म्हणाले की, “अयोध्येत मुर्त्या आणि दगडी वस्तूंसोबतच विटा, मातीची भांडी, नाणी, हाडांचे अवशेष, कानाच्या चामड्याचे अवशेष सापडले होते. त्यात धातू आणि दगडाच्या वस्तूंना सोडून बाकी वस्तूंची कार्बन डेटिंग करण्यात आलेली होती.”

मात्र ज्ञानवापी मस्जिदीत केवळ दगडी शिवलिंगाचा सापडलाय. अयोध्येप्रमाणे आणखी कोणत्याच वस्तू सापडलेल्या नाहीत. त्यामुळे शिवलिंगाची कार्बन डेटिंग करायचं झाल्यास, दगडी मूर्तीवरून कोणत्या प्रकारचे नमुने गोळा करायचे असा प्रश्न संशोधकांसमोर उभा होईलच.  

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.