मुस्लीम बहुसंख्यांक असलेल्या देशाच्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे, कारण..

जगातला सर्वात मोठा मुस्लिम देश, जिथे एकूण लोकसंख्येच्या ८७ टक्के म्हणजेच २० कोटींच्या जवळपास मुस्लिम लोकसंख्या आहे. तर ३ टक्के अर्थातच २ कोटीच्या जवळपास हिंदूंची लोकसंख्या आहे. 

थोडक्यात मुस्लिम बहुल देश अन अल्पसंख्यांक असणारा हिंदू समाज आणि या देशाचं नाव आहे इंडोनेशिया !

तुम्ही या देशात कधी गेलाच ट्रिपवर तर एक गोष्ट नक्कीच तुम्हाला नजरेत पडेल, इंडोनेशिया हा मुस्लिमबहुल देश असला तरी त्याची किंचितशी छापही तुम्हाला बघायला मिळणार नाही.  तुम्ही जिथे पहाल तिथे तुम्हाला भरपूर हिंदू मुर्त्या दिसून येतील.

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे जेंव्हा इंडोनेशियात गेलेले तेंव्हा त्यांच्याबाबतही असेच घडले होते..

२०१० च्या जुलै महिन्यात जेंव्हा लालकृष्ण अडवाणी जागतिक सिंधी परिषदेत सहभागी होण्यासाठी जकार्ताला गेले होते, तेव्हा मुस्लिम बहुसंख्य हिंदूंबद्दलचा आदर पाहून ते थक्क झाले होते…

एका वाक्यात वैशिष्टय सांगायचं झालं, 

या देशाची सांस्कृतिक ओळख अशी की इथला हिंदू आणि मुस्लिम यात काय फरक आहे ?  हे कुणीच सांगू शकत नाही. हो खरंच…

याचं एक मोठं उदाहरण सांगायचं तर,

देशाच्या २० हजारच्या नोटेवर हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणपतीचा फोटो छापलेला आहे.

हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे यापेक्षा मोठे उदाहरण जगातील कोणत्याही देशात पाहायला मिळणार नाही.

या नोटेशिवाय आणखीही अनेक पुरावे पाहायला मिळतील, जे इंडोनेशियामध्ये दोन्ही धर्मात कसा बंधुभाव असल्याचं दिसून येईल.  

इंडोनेशियाच्या चलनाला रुपया म्हणतात. 

२० हजार रुपयांच्या नोटेवर नजर टाकली तर मोठ्या आकारात गणेशजींचा फोटो छापलेला आहे, तर त्याच्या शेजारीच हजर देवांतराचा फोटो आहे.  देवांतरा इंडोनेशियाचे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांनी आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेचा पाया घातला होता.  त्यावेळी इंडोनेशिया डच प्रभावाखाली होता आणि तिथे एक वसाहत होती. 

Lord Ganesha's picture printed on Indonesia's currency notes | www.lokmattimes.com

नोटेच्या मागील बाजूस एका क्लासरूमचा फोटो आहे. ज्यात विध्यार्थी अभ्यास करतांना दिसतात. हे चित्र सांगते की, इंडोनेशियामध्ये शिक्षणाचे सर्वात महत्वाचे महत्त्व आहे. जितके महत्त्व गणेश जी, देवांतराना दिले जाते त्याच बरोबरीचे महत्व शिक्षणाला दिले जाते.

असेही मानले जाते की, पूर्वी इंडोनेशिया देश हिंदू राजवटीच्या प्रभावाखाली होता. पहिल्या शतकात, येथे हिंदू राज्यकर्त्यांचे राज्य होते, म्हणून या देशातील धर्म आणि संस्कृतीवर हिंदूंचा ठसा ठळकपणे दिसून येतो. आणि त्याचमुळे इंडोनेशियामध्ये सर्वत्र हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आणि मंदिरे बांधण्यात आली आहेत.

तसेच इंडोनेशियाचे रामायण-महाभारत कनेक्शन

इंडोनेशियातील हिंदू प्रेमाचे आणखी एक उदाहरण रामायण आणि महाभारतातूनही दिसून येते.

तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र इंडोनेशियात रामायण आणि महाभारताची कथा घरोघरी सांगितली जाते. अगदी रामायण आणि महाभारतावर आधारित नाटकं रचली जातात.

इंडोनेशियन सैन्य हनुमानजींना आपले गुरु मानते..

जर तुम्ही बाली पर्यटनाचा लोगो पाहिला तर तुम्हाला हिंदू प्राचीन कथा आणि कथांचा संपूर्ण समावेश दिसेल. बांगडुंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंडोनेशियामध्ये खूप प्रसिद्ध आहे, ज्याचा लोगो गणेशावर आधारित आहे. तसेच येथील जकार्ता स्केयरवर कृष्ण-अर्जुनाची मूर्ती आहे. 

202043352.jpg

मात्र मुस्लिम देशाच्या करन्सीवर हिंदू देवता गणपतीचा फोटो का आहे ?

याबद्दल एक लोककथा आहे कि, १९७७ मध्ये आशियातील जवळपास सर्वच देशांच्या चलनात उलथापालथ होत होती.

अशी परिस्थती निर्माण झाली असा कोणताही देश नव्हता ज्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडली नसेल.

आता इंडोनेशियाच्या अर्थमंत्र्यांचा हवाला देऊन याबद्दल असे काही दावे केले जातायेत कि, सर्व आशियाई देश त्यांच्या चलनात घसरण होत होती यात आर्थिक समस्येत त्रस्त असताना कोणीतरी अर्थमंत्र्यांना देशाच्या करन्सीवर हिंदू दैवत असलेल्या गणपतीचा फोटो लावण्याचा सल्ला दिला.

इंडोनेशियानेही तेच केले आणि करंसीच्या अवमूल्यनातून मुक्तता मिळवली. आर्थिक संकट गेलं आणि त्यानंतर इंडोनेशियाला कधीच चलन अवमूल्यनाचा सामना करावा लागला नाही. म्हणून त्यांच्या करंसीवर गणपतीचे स्थान आहे.

आता यात कितपत तथ्य आहे हे माहिती नाही, त्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. परंतु इंडोनेशियाचे लोकं असं म्हणतात..

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.