कलराज मिश्र वाजपेयींना म्हणाले, ज्या राज्यात तुम्ही खासदार झालात तिथं एकही मंत्रिपद का नाही ?

एक काळ असा होता की, युपीच्या राजकारणात असे कायम म्हणले जायचे कि, जोपर्यंत कल्याणसिंह आणि कलराज मिश्रा ही जोडी जोपर्यंत आहे, तोपर्यंत भाजपची अवस्था कधीच बिघडू शकत नाही.   कल्याण सिंह स्वतः देखील जाहीरपणे सांगत असायचे कि, कलराज रहेगा तभी तो कल्याण होगा !!! 

राजकारणात आत्मीयतेने आणि जिद्दीने काम करणारे आणि नातेसंबंधांचा आदर करणारे कल्याण सिंग यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व आता होणे नाही. भाजपच्या स्थापनेपासून आमचे एकमेकांशी अतूट नाते आहे. कल्याण सिंह आणि कलराज मिश्र यांचे संबंध अगदी सख्ख्या भावासारखे होते. कलराज मिश्र कायमच जाहीरपणे व्यक्त होत असत कि, कल्याण सिंह यांनी मला अगदी सुरुवातीपासूनच आत्मीयतेने लहान भावासारखी आपुलकीची वागणूक दिली आहे, हे माझे भाग्य आहे. 

दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं निमित्त म्हणजे एक किस्सा आहे….जेंव्हा मुख्यमंत्री पदासाठी वाजपेयींचे नाव रेसमध्ये होते पण त्यांच्याऐवजी कलराज मिश्र हे कल्याण सिंह यांच्या नावावर ठाम होते.

त्यांनी हे आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं कि, १९९१ मध्ये जेंव्हा मुरली मनोहर जोशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तर तेंव्हा पक्षाचे अध्यक्षपद हे कलराज मिश्र यांच्याकडे होते. तेंव्हा उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात एक प्रश्न निर्माण झाला होता. युपीचा मुख्यमंत्री कोणाला करायचे असा हा प्रश्न होता. त्याचदरम्यान उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी अचानकच अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव पुढे आले. वाजपेयींमध्ये मला भावी पंतप्रधानपद दिसतेय, असा प्रस्ताव कलराज मिश्र यांनी मांडला होता.

तर कल्याण सिंह यांना उत्तर प्रदेशातल्या जनतेचा मोठा सपोर्ट आहे. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री केले पाहिजे असा प्रयत्न कलराज मिश्र यांनी केलेला.

मिश्र यांच्या प्रस्तावानंतर तसेच घडले, कल्याण सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले तर वाजपेयी नंतर देशाचे पंतप्रधान झाले होते. ते सांगतात कि, कल्याण सिंग मुख्यमंत्री बनल्यावर ते आणि मी मिळून यूपीत जाहीर सभा, बैठका घ्यायचो. त्यादरम्यान देखील त्यांनी पूर्वीचेच आमच्यातले भावाचे नाते जपले होते.

पण जेंव्हा अटलजी दिल्लीच्या राजकारणात पोहचले तेंव्हा पुन्हा एकदा कलराज मिश्र आणि अटलजींचा सामना झाला. त्याचा एक किस्सा…

जेंव्हा बलरामपूर जिल्ह्यातील घनश्याम शुक्ला आणि राम प्रताप सिंह हे दोन आमदार भाजपकडून विजयी झाले होते.  तेंव्हा कविराज मिश्र यांनी अटलजींना पत्र लिहिले होते कि, बलरामपूर जिल्ह्यात भाजपचे घनश्याम शुक्ला आणि राम प्रताप सिंह आमदार झाले आहेत त्यापैकी एकाला तरी मंत्री बनवा. पण त्या पत्राचं उत्तर काही आलं नाही म्हणून शेवटी  घनश्याम शुक्ला घरी येऊन कलराज मिश्र यांना विनंती केली कि,” तुम्ही दिल्लीला चला आणि त्यांना सांगा”. मग त्या दोन्ही आमदारांसह कलराज मिश्र दिल्लीला गेले. 

तिथे जाऊन या दोन्ही आमदारांच्या वतीने कलराज मिश्र यांनी अटलजींना जिल्ह्याच्या विकासाचे आणि संघटनेची ताकद वाढविण्याचे आश्वासन दिले, पण अटलजी काही त्यांच्या या शिफारशीवर समाधानी नव्हते शेवटी त्यांनी त्या आमदारांना मंत्री बनविण्यासाठी नकार दिला. 

तेंव्हा मात्र कलराज मिश्र यांनी अटलजींना सुनावलं…”तुम्हाला बलरामपूर जिल्ह्याने खासदार केलं आणि त्याच जिल्ह्याला तुम्ही एक मंत्रीपद देऊ शकत नाही?”

त्यानंतर मात्र अटलजी यांनी त्यांचं म्हणणं गांभीर्याने घेत लागलीच आपल्या खाजगी सचिवांना बोलावलं  आणि सांगितलं कि, कलराज मिश्राजींना फोन करा आणि सांगा कि तुम्हाला यूपीच्या मंत्रिमंडळात समाविष्ट केले आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.