मटण-चिकन खायचं असेल तर पुण्यातली ही ’10’ हॉटेल्स बेस्ट पर्याय आहेत..

रविवारी रात्री जेवायचं ठरलेलं असतं. ते म्हणजे चिकन नाही तर मटण. तुम्ही पुण्यातील पेठांमध्ये राहता म्हणल्यावर तर प्रश्नचं नाही. एकसे बढकर एक खानावळी आहेत. इथल्या हॉटेल, खानावळीत महाराष्ट्रातील सर्व भागातील चवीचा अनुभव मिळतो. तेही परवडणाऱ्या किंमतीत. 

कुठं चिकन मटण चांगलं मिळंल, यासाठी लय काय शोध घेण्याची गरज नाही. तुम्हाला पुण्यातील १० चांगली मटण-चिकन मिळणारी ठिकाणं सांगणार आहोत.  

१) मिलन खानावळ

पुण्याच्या मध्यभागी असणाऱ्या सदाशिव पेठेत कुमठेकर रस्त्यावर मिलन खानावळ आहे. इथल्या मेन्यूत तुम्हाला चिकन, मटण बरोबर फिश थाळी पण मिळते.

इथली मटण राईस प्लेट, मटण फ्राय राईस प्लेट, मटण मसाला राईस प्लेट, चिकन राईस प्लेट, चिकन फ्राय राईस प्लेट, चिकन मसाला राईस प्लेट या थाळी इतक्या खास आहेत. त्याच्या सोबत तांबडा, पांढरा रस्सा इथली ओळख आहे. थालीत चपाती, भाकरीचा ऑप्शन असतो.   

२००० साली मारुती दळवी यांनी ही खानावळ सुरु केली. दळवी मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील आहेत. १९९३ पासून ते पुण्यातील सातारा रस्त्यावरील हॉटेलमध्ये कामाला होते.

संध्याकाळी फेरफटका मारला तरी मिलन खानावळ समोरील गर्दी पाहून तुमच्या लक्षात येईल हॉटेल किती फेमस आहे ते. सदाशिव पेठेत कुमठेकर रस्त्यावर ही खानावळ आहे.

27624969 1854318577975692 4154587089686931218 o

२) साईनाथ खानावळ 

नादखुळं मराठमोळं अशा टॅग लाईन खाली साईनाथ खानावळ फेमस आहे.  मटण थाळी, मटण फ्राय थाळी, मटण करी थाळी, चिकन मसाला थाळी, चिकन करी या थाळी इथली ओळख आहे.

थाळीत तांबडा, पांढरा रस्सा त्याबरोबर सुक्कं चिकन, मटण देण्यात येतं. मराठवाड्या स्पेशल मसाला वापरण्यात येतो. तुपात इंद्रायणी भात देण्यात येतो. मटण भाकरी स्पेशल साईनाथ खानावळीचा खासियत आहे. सुक्क, फ्राय आणि मसाला तीन ऑप्शन मिळतो. 

स्पेशल घरी बनविण्यात आलेल्या मसाल्यात इथं मटण, चिकन तयार करण्यात येतं. अमोल निकम हे साईनाथ खानावळीचे मालक असून त्याची सुरुवात २०१६ मध्ये करण्यात आली.  

अल्का चौकात कुमठेकर रस्त्याला लागूनच आहे साईनाथ खानावळ आहे. 

sainath khanawal family

३) आवारे मराठा खानावळ

सदाशिव पेठेतील अजून एक खानावळ मटण, चिकनसाठी फेमस आहे.

चिकन हंडी, चिकन मसाला थाळी, मटण मसाला थाळी, आळणी  मटण करी थाळी, आळणी मटण थाळी  इथं फेमस आहे. खानावळीत घरी बनवलेल्या मसाल्यातुन सगळे पदार्थ बनविण्यात येतात. कोल्हापूर पद्धतीने बनविण्यात येणारा तांबडा, पांढरा रस्सा थाळी सोबत देण्यात येतो. ५०० रुपयांमध्ये इथं दोघांचा मटण-चिकन खाऊन होत. 

आवारे मराठा खानावळीची सुरुवात १९०१ बाळा रघु आवारे यांनी केली. आता त्यांची चौथी पिठी नरेंद्र आवारे ही खानावळ सांभाळतात.

सदाशिव पेठेतील जोंधळे चौकात आवारे मराठा खानावळ आहे. 

WhatsApp Image 2022 04 16 at 4.05.47 PM

४) हॉटेल जगदंब 

इथलं काळ्या मसाल्यातील मटण खूप फेमस. लोकं ५०-१०० किलोमीटर ट्रॅव्हल करून मटण खायला येतातं. हॉटेल जगदंब मध्ये तयार होणारे सगळे पदार्थ साजूक तुपातले असतात.

मटण हंडी मालवणी मटण खर्डा, मटण मसाला, मटण करी, चिकन हंडी, चिकन करी, चिकन मसाला इथं मिळतं. त्याच बरोबर स्पेशल मटण भाकरी, गावरान चिकन भाकरी थाळी, बॉयलर ताट हे थाळीचे पर्याय आहे.  

खेड शिवापूर येथे राहणाऱ्या गणेश पायगुडे यांनी २०१२ मध्ये हॉटेल जगदंब सुरु केले. काळ्या मसाल्यातील मटण ही जगदंब हॉटेलची खरी ओळख आहे. 

पुणे सातारा हायवेवर खेड शिवापूर टोल नाक्याजवळ हॉटेल जगदंब आहे. इथं मोठ्या प्रमाणात वेटिंग असतं. विकेंड वगळता इतर दिवशी सुद्धा १ तास थांबावं लागत.  

 

jagdamb

५) हॉटेल संदीप

अहमदनगर येथील हॉटेल संदीप हे उकडलेलं सुक्क मटण आणि काळ्या मसाल्यात बनविण्यात येणाऱ्या मटनामुळे प्रसिद्ध आहे.

बोल्हाईमातेच मंदिर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथे आहे. यामुळे जिल्ह्यात बोकडाचे मटण खात नाही. मात्र, संदीप हॉटेल मध्ये बोकडाचे मटण मिळते. यामुळे पुण्याच्या बाहेरून आलेले अनेकांची पसंती संदीपला आहे. 

 संदीप हॉटेलच्या मेन्यूवरील चिकन उकड, चिकन हंडी, चिकन फ्राय, चिकन रोस्ट, मटण हंडी, मटण उकड, मटण फ्राय हे पदार्थ फेमस आहे. हे हॉटेल ४ फ्लोवर असूनही इथं वेटिंग केल्या शिवाय जागा मिळत नाही.  हॉटेलचे मालक संदीप कोतकर आहेत. 

सप्टेंबर २०२० मध्ये हॉटेल संदीपची ब्रँच पुण्यातील जंगली महाराज रस्ता येथे सुरु झाली. 

६) जय भवानी मटण भाकरी हॉटेल 

मटण भाकरी हे नवीन फूड कल्चर आलंय. जरी त्यासाठी ५० किलोमीटरचा प्रवास करावं लागला तर अनेकांची न नसते. खेड शिवापूर येथे जगदंब प्रमाणे मटण भाकरीसाठी जय भवानी हॉटेल फेमस आहे. इथं घरी तयार केलेल्या मसाल्यात मटण, चिकन बनविण्यात येत. 

मटण मसाला, मटण आळणी, मटण सुक्का, मालवणी चिकन हंडी हे पदार्थ हॉटेल भवानीचे फेमस आहेत. जय भवानी हॉटेल मध्ये चिकन, मटण प्रमाणे सुपातील दम बिर्याणी आवडीने खाल्ली जाते. 

हॉटेलचे मालक हे शंकर कोंडे देशमुख आहेत. २००० साली हे हॉटेल सुरु करण्यात आले. 

पुणे सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ हॉटेल भवानी आहे.

७) भुजबळ बंधू- हॉटेल आपुलकी 

१९९६ पासून भुजबळ बंधू हॉटेल आपुलकी सुरु झालं. तेव्हा पासून घरी बनवलेल्या काळ्या मसाल्यापासून चिकन, मटण बनविण्यात येते. इथं खर्डा मटण फ्राय, मटण दम खिमा, खारे चिकन फ्राय बरोबर मटण आणि चिकन मसाला थाळी इथं फेमस आहे.  

कपिल भुजबळ हे हॉटेल आपुलकीचे मालक असून गणेश नगर, कर्वे नगर येथे हे हॉटेल आहे.

WhatsApp Image 2022 04 16 at 4.18.44 PM

८) हॉटेल नागपूर 

नावाप्रमाणे नागपूर भागात वापरण्यात येणाऱ्या सावजी मसाला वापरून हॉटेल नागपूर मध्ये चिकन, मटण बनविण्यात येते. चुलीवर जुन्या पद्धतीने हे चिकन, मटण शिजविण्यात येत.

मटण करी, मटण फ्राय, मटण पुलाव, भेजा फ्राय, चिकन फ्राय चिकन पुलाव हॉटेल नागपूरचे या गोष्टी फेमस आहे.इथं बसायला टेबल-खुर्च्या नाहीत तर भिंतीला लागून बेंच आहेत. बसायला स्टूल देण्यात येतात. 

महेंद्र पारशीवलीकर हे हॉटेलचे मालक असून त्याची सुरुवात १९८० मध्ये करण्यात आली. टिळक स्मारक समोरील बोळात पेरूगेट जवळ हॉटेल नागपूर आहे.

hotel nagpur restaurant

 ९) हॉटेल चूल मटण 

नावाप्रमाणे हॉटेल चूल मटण मध्ये चुलीवर तयार चिकन, मटण बनवले जाते. इथं चिकन थाळी, मटण थाळी बरोबर मटण दलाचा फेमस आहे. स्पेशल तांबडा मसाल्यात हे सगळे पदार्थ बनवले जातात..      

विनोद तांबे हे हॉटेल चूल मटणचे मालक असून २०१७ मध्ये या हॉटेला सुरवात झाली.

डि.पी. रस्त्यावरील कृष्णा लॉन समोर हॉटेल हॉटेल चूल मटण आहे

unnamed

१०) हॉटेल सुर्वेज

प्युअर नॉन व्हेज अशी ओळख असणाऱ्या हॉटेल सुर्वेज हे मूळचे साताऱ्यातील आहे. इथं मटण उकड, मटण भजी, मटण फ्राय, चिकन लेगपीस पकोडा, मटण थाळी, चिकन-मटण रोस्ट हे पदार्थ फेमस आहे. हॉटेल सुर्वेजची विशेष ओळख ही मटण दालचा आहे.   

हॉटेल सुर्वेज ३० जानेवारी २०१६ पासून पुण्यात सुरु आहे. हॉटेल सुर्वेज तुकाराम पादुका चौक, फर्ग्युसन रस्त्यावर आहे.

01112017 Surves 01

ही सगळी लिस्ट पाहिलं तर खाण्याच्या बाबतीत चिकन मटण पुणेकरांचा नाद नाही करायचा असं म्हणता येईल. तुम्हाला चिकन, मटण आवडणारी कुठली हॉटेल माहिती असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. 

हे ही वाच भिडू 

4 Comments
 1. प्राणेश सायकर says

  हॉटेल या रावजी बाणेर
  मटन शेतकरी
  काळा रस्सा
  पांढरा रस्सा

 2. Ajit says

  Only “LAD”
  #NUSTA CHIKEN MOTTON
  NEAR WAKAD FLYOVER

 3. Akshay says

  वेदांत मटण खानावळ, chikhali
  समाधान मटण भाकरी, ravet
  जगदंब नॉनव्हेज, wakad

 4. नितीन says

  हॉटेल मराठमोळं, सोरतापवाडी
  पुणे-सोलापूर हायवे
  नॉन व्हेज स्पेशल

Leave A Reply

Your email address will not be published.