या पाच भारतीय सिनेमांचं नाव गिनीज बुकात आहे, पण कारणं मात्र साधी नाहीत

बॉलिवुड असो की टॉलिवुड… बॉक्स ऑफिसचा गल्ला, जनतेचं भरमसाट प्रेम, पब्लिसिटी आणि ग्लॅमर, ह्या सगळ्यासोबत अजून एका गोष्टीचं व्हॅलीडेशन ह्या स्टार मंडळींना पाहिजे असतं ते म्हणजे ॲवार्ड्स आणि आपल्या नावावर होणारे रेकॉर्डस्.

कोणता पिक्चर किती हिट ठरला, कोणत्या पिक्चरला किती ॲवार्ड्स मिळाले किंवा कोणत्या पिक्चरने किती रेकॉर्डस् केले आणि किती मोडले, यावर स्टार लोकांचं तर लक्ष असतंच पण सोबत प्रेक्षकांचं पण असतं.

त्यात गिनीज बुकात नाव आलं म्हणजे जगभर चर्चा…

आणि आपल्या काही भारतीय सिनेमांनी तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये वाढीव कारणांमुळे जागा मिळवलीये

तर आज पाहूया असे पाच भारतीय सिनेमे ज्यांची नोंद गिनीज बुकात झालीये आणि तेही पाच भन्नाट कारणांमुळे…

पहिला येतो कहो ना प्यार है..

kaho na pyar

‘कहो ना प्यार है’ ही आपल्या हृतिक भाऊची डेब्यू फिल्म. गड्याने डेब्यू पासूनच इंडस्ट्रीत राडा करायला सुरवात केलेली. कहो ना प्यार है ब्लॉकबस्टर ठरला. १४ जानेवारी २००० साली आलेल्या ह्या पिक्चरने तब्बल ६६.७४ कोटींचा गल्ला जमवला तेही १० कोटींच्या बजेटमध्ये. सिनेमात हृतिकसोबत, अमीषा पटेल आणि अनुपम खेरसारखे कलाकार होते. पिक्चरचं डायरेक्शन आणि प्रॉडक्शन, हृतिकचे पप्पा राकेश रोशन ह्यांचं होतं.

ह्या पिक्चरचं गिनीज बुकमध्ये नाव येण्याचं कारण होतं ते म्हणजे ह्या पिक्चरला, सिनेमांच्या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये तब्बल ९२ वेगवेगळे ॲवार्ड्स मिळाले होते आणि ह्या ९२ ॲवार्ड्स चा रेकॉर्ड गिनीज बुकमध्ये नोंदवला गेला होता.

दूसरा पिक्चर आहे बाहुबली: द बिगिनींग (बाहुबली १).. 

main qimg 2c4d4c02268a052c0ef224070758e9b5 lq

१० जुलै २०१५ साली आलेल्या ह्या सिनेमाने ६५० करोड कमावले आणि सिनेमाचं बजेट १८० करोड रुपये होतं. हा सिनेमा तमिळ आणि तेलगू भाषेत बनवला गेला, आणि नंतर सिनेमाचं इतर भाषांमध्ये डबिंग करण्यात आलं. ह्या सिनेमात प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना आणि राम्या कृष्णन अशा भन्नाट कलाकारांनी काम केलंय आणि दिग्दर्शन केलंय राजामौली यांनी.

कोची मधल्या युनायटेड मीडिया कंपनीने ह्या पिक्चरचं सगळ्यात मोठं म्हणजेच ५० हजार स्क्वेअर फुट लांब पोस्टर बनवून गिनीज बुकात आपला विक्रम नोंदवला होता.

गिनीज बुकात नाव केलेला तिसरा पिक्चर म्हणजे पिके..

pk

आमीर खान आणि अनुष्का शर्मा ह्या दोन लिड ॲक्टर्सचा पिके हा सिनेमा. ह्या सिनेमात आमीर खानची ॲक्टिंग लय जोरात गाजली. सिनेमाचे डायरेक्टर राजकुमार हिरानी होते तर निर्मिती सिद्धार्थ कपूर यांची होती. १९ डिसेंबर २०१४ साली आलेल्या ह्या सिनेमात आमीर खान आणि अनुष्का शर्मा सोबतच, संजय दत्त, बोमन ईरानी आणि सुशांत सिंह राजपूत हेही भारी कलाकार होते. सिनेमाचं बजेट ८५ करोड इतकं होतं तर सिनेमाची कमाई ८५४ करोड एवढी झाली होती.

आश्चर्य म्हणजे ‘पिके’ ह्या सिनेमाने भारतापेक्षाही जास्त कमाई तर इतर देशांमध्येच केली होती आणि म्हणूनच पिकेचं नाव गिनीज बुकात नोंदवण्यात आलं होतं.

लिस्टमधला चौथा पिक्चर आहे सुनील दत्तचा ‘यादे’ हा सिनेमा.

Untitled

‘यादे’ हा सिनेमा म्हणजे सुनील दत्तचा वन मॅन शो होता. कारण ह्या पिक्चरचा सुनील दत्त सर्वेसर्वा होता. ह्या अख्ख्या सिनेमात फक्त सुनील दत्त हा एकटाच क्टर आहे. 

शिवाय सिनेमाचा निर्माता आणि दिग्दर्शक सुद्धा सुनील दत्तच आहे. आणि ह्या कारणासाठीच या पिक्चरचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलंय.

हा सिनेमा १९६४ साली रिलीज झाला होता आणि खूप गाजलाही होता. शिवाय सिनेमाला इतरही अनेक पुरस्कार मिळाले होते, या सिनेमात सुनील दत्त सोबत नर्गिस दत्त यांनीही काम केलं होतं.

आणि आता पाचवा आहे, लव्ह अँड गॉड हा सिनेमा.

love

आता कुठलाही पिक्चर बनवायला साधारण एक ते दोन वर्षांचा काळ लागतो. पण हा सिनेमा १९६३ साली बनवायला सुरू केला होता, तो बनला आणि पूर्ण झाला २७ मे १९८६ साली. 

म्हणजे हा सिनेमा बनून पूर्ण व्हायलाच तब्बल २३ वर्ष लागली होती. आणि ह्या कारणासाठीच लव्ह अँड गॉड या सिनेमाचं नाव गिनीज बुकात नोंदवलं गेलं होतं.

ह्या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती के. असिफ यांनी केली होती तर पिक्चर मध्ये निम्मी आणि संजीव कुमार मुख्य भूमिकेत होते.

तर हे आहेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव काढलेले आणि गाजलेले पाच भारतीय सिनेमे, यातले किती बघितलेत आठवा आणि नसतील बघितले तर व्हा सुरू, तेवढाच विकेंड सार्थकी लागेल.

हे ही वाच भिडू: 

 

Leave A Reply

Your email address will not be published.