या चार कुत्र्यांच्या प्रजाती फक्त माणसांच्या नाही तर भारतीय लष्कराच्याही बेस्ट फ्रेंड आहेत

If a man likes dog, he is a good dog. If a dog likes man, he is a good man.

पाताल लोक मधला हा डायलॉग आपल्या सगळ्यांना हिट झाला. कारण आजही माणसाचा बेस्ट फ्रेंड कुत्रा आहे आणि कुत्राच राहील. कारण या जगात कुत्र्यांसारखं निस्वार्थी प्रेम कुणीच करू शकत नसतंय, हे कुणीच नाकारू शकत नाही.

कुत्रे सामान्य माणसांना साथ देतातच पण पोलिसांच्या डॉग स्क्वॉडमधून कित्येकांचा जीवही वाचवतात. पण कुत्रे युद्धभूमीवरही लोकांच्या रक्षणासाठी आणि आर्मीच्या मदतीसाठी तत्पर असतात.

१९५९ मध्ये पहिल्यांदा भारतीय सैन्यात कुत्र्यांचा समावेश करण्यात आला. तेव्हा पासून आता पर्यंत अनेक जातींच्या कुत्र्यांनी आपली सेवा दिली आहे. तर १९७० मध्ये कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. आता पर्यंत या संस्थेत जवळपास ५ हजार कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आहे.

जर्मन शेफर्ड

जर्मन शेफर्ड प्रजातींचे कुत्रे धोकादायक म्हणून ओळखले जातात. याच बरोबर अतिशय हुशार सुद्धा असतात. यामुळे भारतीय लष्करात याचा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातांना करण्यात येतो. सीमावर्ती भागात जेव्हा नेटवर्क नसते तेव्हा जर्मन शेफर्ड खूप महत्वाची भूमिका पार पाडतात. भारतीय लष्कराकडून जर्मन शेफर्डला गुप्तहेरासारखे काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

आक्रमक कामांसाठी जर्मन शेफर्डचा उपयोग करण्यात येतो.

युद्धासाठी लागणारे लहान सहान हत्यार पुरविण्याचे काम जर्मन शेफर्ड मोठ्या चतुराईने करतात. भारतीय सैन्याच्या अनेक मोहिमेत जर्मन शेफर्डच्या कुत्र्यांनी मोठी कामगिरी निभावली आहे. पहिल्या महायुद्धावेळी जर्मन सैन्यानं या कुत्र्यांचा पहिल्यांदा वापर केला. जर्मन शेफर्ड आपल्या नावाला जागत जर्मन सैन्याची मोठी मदत केली होती.

लॅब्रोडोर

लॅब्रोडोर हे जगातील लोकप्रिय कुत्र्याच्या प्रजातींपैकी एक आहे. दिसायला गुटगुटीत असल्याने लॅब्रोडोर पाळण्याकडे सर्वसामान्यांचं कल असतो. मात्र, त्याचा खरा गुण हा त्याची हुंगण्याची क्षमता. लॅब्रोडोरची हुंगण्याची क्षमता अधिक असल्याने बॉम्ब शोधण्यासाठी त्याची मदत घेण्यात येते. मोठे राजकीय नेते यांच्या दौरे, सभेपूर्वी लॅब्रोडोरची गस्त पाहायला मिळते.

भारतीय सैन्याच्या विचार केला दहशवाद विरोधी कारवायांमध्ये लॅब्रोडोरने बरीच मदत केली आहे. वासावरून दहशतवादी कुठं लपून बसले याची अचूक माहिती सैन्याला देण्याचे काम लॅब्रोडोर करतात.

व्हिएतनाम विरोधातील युद्धात अमेरिकेने लॅब्रोडोरचा वापर केला होता. अमेरिकेचे जखमी सैनिक आणि पाण्यात लपलेल्या शत्रूंचा शोध घेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती.

बेल्जियन मेलिनोईस

बेल्जियन मेलिनोईसचे प्रजातीचे कुत्रे सर्वात वेगवान मेंदू असणारे म्हणून ओळखले जातात. त्याच बरोबर साहसी आणि चतुर असतात. बचाव कार्यात सर्वात अग्रेसर बेल्जियन मेलिनोईस असते. जगभरातील मोठ्या सुरक्षा एजन्सी मध्ये या कुत्र्याला विशेष महत्व आहे.

जर्मन शेफर्ड पेक्षा अंगकाढींने बेल्जियन मेलिनोईस लहान असतं. त्यामुळे पॅराग्लायडिंग आणि विमानातून दोरीच्या साहाय्याने खाली कुठलीही अडचण येत नाही. २०१९ मध्ये आयसीसीचा नेता अबू बकर अल बगदादीला बेल्जियन मेलिनोईनच्या प्रजातीच्या पळवून मारले होते. बेल्जियन मेलिनोईस हे मुळात पाळीव कुत्रा म्हणून ओळखला जातो. त्याचे वजन २० ते ३० किलो असते.

भारतात सगळ्यात आधी सीआरपीएफने बेल्जियन मेलिनोईस आपल्या सोबत तुकडीत सामील करून घेतली. त्यानंतर हळूहळू सुरक्षा दलांमध्ये बेल्जियन मेलिनोईस आवडीचा कुत्रा बनला आहे.

ग्रेटर स्वीस माउंटन डॉग

ग्रेटर स्वीस माउंटनच्या प्रजातीच्या कुत्र्यांमध्ये प्रचंड ताकत असते. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी पहिल्यांदा या कुत्र्यांचा उपयोग करण्यात आला. ग्रेटर स्वीस माउंटन लष्करांच्या शोध मोहिमेत सिंहांचा वाटा उचलातात. दुरवरच्या लहान सहान हलचाली देखील या प्रजातीचे कुत्रे हेरतात.  भारताच्या सुरक्षिततेत ग्रेटर स्वीस माउंटनचे योगदान मोठं आहे.

कुत्र्यांच्या या प्रजाती सीआरपीएफ, कोब्रा आयटीबीपी सारख्या भारतीय निम लष्करी दलाकडून नक्षलवादी विरोधी कारवाईत वापर करण्यात येतो. पठाणकोट हल्ल्यादरम्यान एनएसजीच्या ऑपरेशनचा भाग होते. एका दहशवाद्याला खाली पाडलं होत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.