यांच्या विमानाचा देखील अपघात झालेला पण नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला

आज तामिळनाडूतील कुन्नूर इथं दुपारी लष्कराचं एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल. ज्यात सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह एकूण १४ जण होते. हेलिकॉप्टर अपघात होताच जाळून खाक झालं, अपघात झाला तेव्हा बिपीन रावत जखमी अवस्थेत होते, ते अपघातातून बचावतील अशी सगळ्यांना आशा होती. पण यात सगळ्यांचाच मृत्यू झाला.

याआधीही अश्या हवाई अपघातात आपले अनेक नेते आणि अधिकारी यांचं निधन झालयं. पण काही नेते अशीही आहेत जे ज्यांचं नशीब बलवत्तर म्हणून हवाई अपघात होऊनही त्यांचा जीव वाचला.

मोरारजी देसाई :

४ नोव्हेंबर १९७७ देशात जनता पक्षाचं सरकार होत आणि मोरारजी देसाई पंतप्रधान होते. त्यावेळी पंतप्रधान आपल्या आसामच्या दौऱ्यावर निघाले होते. संध्याकाळी ५ च्या आसपास त्यांनी दिल्लीतून उड्डाण केलं. पंतप्रधानांचं टी यू १२४ पुष्पक विमान रात्री ८ वाजता आसामच्या जोरहाट इथं उतरणं अपेक्षित होत.

पण पंतप्रधानांचा विमान विमानतळाच्या काही किलोमीटर आधीच घिरट्या घालायला लागलं. विमान लँडिंग करता येईना, त्यामुळे त्यानं पुन्हा उड्डाण केलं. त्यात विमानातलं इंधन संपत आलेलं. शेवटी विमानतापासून ५ किलोमीटरच्या अंतरावर विमान कोसळलं. विमानाच्या कॉकपीटमधल्या वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी  प्रसंगावधान दाखवत विमान समोरच्या दिशेने पडेल अश्या दिशेने विमानाची दिशा बदलली आणि विमान एका शेतात जाऊन पडलं.

वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे मोरारजी देसाई वाचले, पण वायुसेनेच्या ५ अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला.

राजनाथ सिंह :

काही वर्षांपूर्वी संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह आणि उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी हे सुद्धा एका विमान अपघातात बचावले होते. दोघेही उत्तर प्रदेशातील रामपूरला जात होते. हेलिकॉप्टर लँड होणारचं होत. त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि पायलटचं हेलिकॉप्टरवरचं नियंत्रण गेलं.

यावेळी प्रसंगावधान दाखवत पायलटने सुक्या गवताच्या ढिगाऱ्याजवळ हेलिकॉप्टर उतरले. तितक्यात हेलिकॉप्टरला आग लागायला सुरुवात झाली. सुक्या गवतावर हेलिकॉप्टर लवकरच पेट घेईल म्हणून पायलटने लगेच पुन्हा उड्डाण केले आणि सुरक्षित ठिकाणी उतरवले. त्यामुळे या अपघातातून राजनाथ सिंह आणि मुख्तार अब्बास दोघेही बचावले.

देवेंद्र फडणवीस :

२०१७ साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती. यावेळी मुख्यमंत्री एका सभेसाठी निलंग्याला गेले होते. आपली सभा आटपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईला रवाना होण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये चढले. मुंबईला येत असताना तेवढ्यात मुख्यमंत्र्यांच्या चॉपरमध्ये बिघाड झाला आणि चॉपरचा अपघात झाला.

पण या अपघातातून मुख्यमंत्री सुखरूप बचावले. त्यांचं हेलिकॉप्टर कमी उंचीवर असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती.

पृथ्वीराज चव्हाण :

२००४ सालच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु होता. या प्रचारात अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गुजरात आणि दादर -नगर हवेलीचे प्रभारी म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली होती. चव्हाणांचा काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत नियोजित करण्यात आला होता.

यावेळी सोनिया गांधी एका हेलिकॉप्टरमध्ये होत्या, तर त्याच्या मागच्या हेलिकॉप्टरमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अहमद पटेल आणि विशेष सुरक्षा पथकाचा एक अधिकारी असे चौघे होते.  हेलिकॉप्टर हवेत असतानाच त्यात काहीतरी बिघाड झाला. ही गोष्ट पायलटच्या लगेच लक्षात आली आणि त्याने हळू- हळू करत हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवण्याचा प्रयत्न केला.

पण या नादात हेलिकॉप्टरची शेपटी जोरात आपटली आणि तुटली. त्यात हेलिकॉप्टरचा दरवाजा उघडला गेला त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण बाहेर फेकले गेले. तेव्ह त्यांच्या डोक्याला खोच पडली. सोनिया गांधी यांच्या ताफ्यात असणाऱ्या रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.

खोकं पडल्याने पृथ्वीराज यांच्या डोक्याला टाके पडले. पण विमान अजून थोडं उंचावर असते तर जीव वाचणं कठीण होत. पृथ्वीराज चव्हाणांच नशीब म्हणून ते या अपघातातून बचावले.

अमरिंदर सिंग :

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि मंत्री प्रताप सिंग बाजवा हे सप्टेंबर २००६ मध्ये गुरुदासपूरला जाण्यासाठी एक सभा आटोपून निघाले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं पण उड्डाण घेतल्यानंतर काहीच वेळातचं ते विजेच्या तारांना जाऊन आदळलं. पण पायलटने वेळीच हेलिकॉप्टरची दिशा बदलली आणि ते दोघे अपघातातून बचावले.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.