शरद पवारांना पंतप्रधान करण्याच्या तयारीला लागलेला राष्ट्रमंच काय आहे ?

मोदी सरकारच्या धोरणांविरोधात राष्ट्र मंचाची मंगळवारी म्हणजेच उद्या दुपारी चार वाजता दिल्लीतील शरद पवार यांच्या घरी बैठक होणार आहे आणि विशेष, या महत्वपूर्ण बैठकीला यशवंत सिन्हा आणि शरद पवार तसेच संजय सिंग यांच्यासह इतर काही नेते, आम आदमी पक्षाचे पवन वर्मा उपस्थित राहणार आहेत.

भल्याभल्यांना निवडून आणणारे प्रशांत किशोर तिसऱ्या आघाडीच्या तयारीला केंव्हाच लागले आहेत. २०२४ साठी विरोधी पक्षांनी एकत्र आणण्यासाठी हातमिळवणी केली आहे असे एकंदरीत या बैठकीच्या तयारीवरून दिसतेय.

या बैठकीत राष्ट्रमंचाचे निर्णय आणि महत्वाचे उपक्रम ठरणार आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारया  प्रशांत किशोर यांचे यश पाहून आता या सर्वांनाच त्यांच्यावर विश्वास टाकण्याची तयारी दाखवली आहे.

मोदी सरकारला पर्याय म्हणून आता सगळेच आपापली प्रादेशिक राजकीय ताकद आजमावून पाहणार  आहेत..यात आता शरद पवारांनीही उडी घेतली आहे. आपण आजपर्यंत ऐकत आलो आहोत कि शरद पवार साहेब नक्कीच एक दिवस पंतप्रधान बनणार, कदाचित याच तिसऱ्या आघाडीच्या मदतीने हे खरं होण्याची शक्यता आता आपण नाकारू शकत नाही.

कारण ह्या अंदाजाला आधार म्हणजेच प्रशांत किशोर यांनी याधीही शरद पवार यांची भेट घेतली होती, गेल्या १० दिवसांत त्यांची दोन वेळा भेट झाली आहे. परंतु आता शरद पवार प्रथमच राष्ट्रीय मंचाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे हि महत्वपूर्ण बैठक त्यांच्या घरी होणार असल्यामुळे आता तिसऱ्या आघाडीची सूत्रे आता साहेबांच्या आदेशावरून चालतील का हे पाहणे महत्वाचे ठरते.

शरद पवारांना पंतप्रधान बनू पाहणारं हे राष्ट्रमंच काय आहे ?

२०१८ मध्ये माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा  यांनी राष्ट्र मंचाची स्थापना केली होती. तेंव्हा सिन्हा यांनी  देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर तसेच समस्येवर चर्चा घडवून आणण्यासाठी राष्ट्रमंचाची सुरुवात केली होती.  यात भाजपचे विरोधी पक्ष नेते सोडले तर बाकीचे काही  महत्वाची परंतु बिगर राजकीय नेते देखील यात सहभागी होत आहेत. थोडक्यात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवणे हा राष्ट्रमंचाचा उद्देश आहे.

जरी राष्ट्रीय मंच हा राजकीय मंच नसला तरीही या मंचाद्वारे भविष्यात मोदींसाठी कॉंग्रेस वगळता तिसरा पर्याय म्हणजेच देशातील तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता आहे, कारण राष्ट्रीय मंच सरकारविरोधातल्या इतर मुद्द्यांसह राजकीय, आर्थिक, सामाजिक मुद्द्यांवर देखील चर्चा करत असतो.

तसेच ममता दीदींचा देखील राष्ट्र मंचाला उघड उघड पाठींबा आहे, कारण राष्ट्रमंचची स्थापना करणारे यशवंत सिन्हा आता तृणमूल पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे प्रत्यक्षपणे मंचावर ममता दीदींचा ही वरदहस्त आहे.

तसेच तिसऱ्या आघाडीचा चेहरा म्हणून ममता दीदी समोर येण्याचा प्रयत्न प्रशांत किशोर यांच्या मदतीने  करत असतील तर मग या तिसऱ्या आघाडीत शरद पवारांचे काय स्थान असणार आहे?  जर शरद पंतप्रधान पदाचा चेहरा बनून समोर येत नसणार तर पवार या आघाडीचे संयोजक म्हणून भूमिका बजावणार आहेत का हे पाहणे आता महत्वाचं आहे.

ममता दीदी, राष्ट्र मंचाचे संस्थापक सिन्हा, शरद पवार तसेच बंगालमध्ये तृणमूलच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे..

असं तगडं समीकरण आता देशाच्या राजकीय इतिहासात प्रथमच पाहायला मिळणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.