बाकीचे चर्चा करत आहेत आणि दिल्लीने तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्याची तयारी सुरु केली देखील

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झालेली गंभीर परिस्थिती पुन्हा येऊ नये, यासाठी दिल्ली सरकारने  आधीच कंबर कसलीये. कोविड – १९  च्या तिसर्‍या लहरीला सामोरे जाण्यासाठी केजरीवाल सरकार ५००० तरुणांना आरोग्य सहाय्यक म्हणून प्रशिक्षण देणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

केजरीवाल म्हणाले की,

आरोग्य सहाय्यकांना किंवा कम्युनिटी नर्सिंग सहाय्यकांना ‘नर्सिंग’ आणि आरोग्य सेवेचं  दोन आठवड्यांचं  मूलभूत प्रशिक्षण दिले जाईल. ५००  लोकांच्या पहिल्या तुकडीसह २८ जून रोजी हे प्रशिक्षण  सुरू होईल.

याचीच तयारी म्हणून दिल्ली सरकारनं ५००० युवकांना आरोग्य सहाय्यक म्हणून प्रशिक्षण  देण्याचा निर्णय घेतलाय. केजरीवाल यांनी सांगितलं कि, महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या  दरम्यान जेव्हाही  त्यांच्या सेवेची आवश्यक असेल तेव्हा आरोग्य सहाय्यकांना बोलावले जाईल. जितक्या दिवस ते काम करतील त्या हिशेबाने त्यांना पैसे दिले जातील.

 

या प्रशिक्षणाच्या भरतीसाठी एक नियमावली देखील जारी करण्यात आलीये. त्यानुसार प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना १८ वर्ष पूर्ण असण्याबरोबरच १२ वी पास असणे आवश्यक आहे. १७ जूनपासून हे  अर्ज  ‘पहले आओ, पहले पाओ’ या आधारावर स्वीकारले जातील.

केजरीवाल त्यांनी बोलताना सांगितले,  “सरकारने ५००० आरोग्य सहाय्यकांची महत्वाकांक्षी योजना आखली आहे. त्याअंतर्गत ५ हजार तरुणांना २ – २  आठवड्यांचे ट्रेनिंग दिले जाईल, आयपी विद्यापीठ हे ट्रेनिंग देणार आहे. दिल्लीतील ९ मोठ्या मेडिकल इंस्टीट्यूटमध्ये बेसिक ट्रेनिंग दिली जाईल.

हे ५००० हेल्थ असिस्टंट  डॉक्टर आणि नर्सचे  असिस्टंट  म्हणून काम करतील. यासाठी १७ जूनपासून ऑनलाईन अर्ज करता येणार असून त्यांचे प्रशिक्षण २८ जूनपासून सुरू होणार आहे. यासोबच दिल्ली  सरकारने नऊ रुग्णालयांमध्ये २२ ऑक्सिजन प्लांटचे उदघाटनही केले आहे. 

दरम्यान, दिल्ली सरकार ज्याप्रमाणे तिसऱ्या लाटेची तयारी करतंय त्यावरून इतर राज्यांनीही धडा घेऊन  आपल्या  राज्यात आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची  गरज आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.