गडकरी म्हणतायत त्यात तथ्य आहे, पुण्यात खरंच उडणारी बस दिसू शकते.

प्रयागराज पाठोपाठ पुण्यात येणार उडणारी बस.. नुकतंच माध्यमांसोबत बोलताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरीच तस म्हणाले आहेत. पुण्याच्या चांदणी चौकातल्या ट्रॅफिक समस्येबद्दल बोलताना ते म्हणाले की केबल कार, रोप वे माझ्याच विभागाकडे आहे. आम्ही एकूण 165 रोप वे, केबल कार बांधतोय.

पुण्याचा अभ्यास करून लेटेस्ट टॅक्नोलॉजीने पुण्यात हवेत वरच्या वर जाणारी बस सुरू करता येईल..

झालं यावर एकच ट्रोलिंग सुरू झालं. यापूर्वी प्रयागराज येथे बोलताना देखील गडकरींनी उडत्या बसेसचा दाखला दिला होता. तेव्हा देखील ट्रोलिंग झालं होतं. पुढे नागपूरमध्ये देखील अशा हवेतल्या बसेस सुरू करणार अस सांगितलं होतं, तेव्हा देखील गडकरींची चेष्टा झाली. आत्ता पुण्यात हवेतल्या बस सुरू करणार अस म्हणताच इथेही चेष्टाच सुरू झालेय..

पण या चेष्टेच्या पलीकडे कधी विचार केलाय का? गडकरी नेमकं काय म्हणतायत? खरच अशी बस असू शकते का? आणि असेलच तर ती आपल्या पुणे-मुंबई-नागपूर सारख्या शहरांमध्ये सूरू होवू शकते का? तर हो.. अशी उडणारी बस अस्तित्वात आहे आणि गडकरी जो दावा करतायत जे व्हिजन मांडतायत ते शक्य आहे.

यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे केबल कारचा.

नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की यात एक केबल असेल म्हणजेच रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी जसा रोप वे आहे तशीच ही सिस्टीम असेल. यात शहराच्या दोन ठिकाणी उंच टॉवर बांधून या दरम्यान केबल बस चालवल्या जातील. नागपूर येथे बोलताना नितीन गडकरींनीच ही सिस्टीम कशी असेल ते सांगितलं होतं.  ही सिस्टीम पुर्णपणे इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर असल्याने प्रदुषण नसेल.

शिवाय डिडिकेटेड केबल्स असल्याने प्रवास जलद होईल. जगात फिलीपाईन्स, ब्राझील, अमेरिका अशा अनेक देशात केबल्स कार्स आहेत.. तशाच बस भारतात देखील सुरू करता येतील. पण इतर देश आणि भारत यातला महत्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे मास ट्रान्सपोर्टचा. यावर मात करून 164 केबल बस सुरू करणार असल्याचं गडकरींनी म्हणलय..

पण यापुढे जावून प्रॉपर हवेतून उडणारी बस असू शकते काय?

तर ती देखील आहे. त्या टेक्नॉलॉजीचं नाव आहे E-Vtol टेक्नॉलॉजी.. इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ ॲण्ड लॅण्डिंग म्हणून ओळखली जाणारी ही वाहणं गडकरी म्हणतात तशी खरोखरच हवेत उडणारी आहेत. विशेष म्हणजे या वाहनांना विमानासारखी धावपट्टी लागत नाही की हेलिकॉफ्टरसारखी ती जोरजोरात आवाज करत नाहीत.

अगदी माणसांना घेवून जाणारे ड्रोन डोळ्यापुढे आणा, अशीच ही सिस्टीम असेल. सायन्स फिक्शन असणाऱ्या सिनेमात आपण अशा प्रकारच्या गाड्या पाहिल्या असतील, पण ही टेक्नॉलॉजी देखील शक्य आहे… 

बर हे सगळं 2050-2100 सालात येईल का तर नाही, मॅकिन्से ॲण्ड कंपनीच्या अंदाजानुसार 2030 पर्यन्त अशी शेकडो E-vtol कॅटेगरीतलं वाहणं तुमच्या शहरात उडताना दिसून येतील. सध्या अशा वाहनांची ट्रायल सुरू असून 5 ते 6 प्रवासी वाहून नेण्यापूरतीच त्यांची क्षमता आहे. एअरबस या विमान बनवणाऱ्या कंपनीने अशा वाहनांची यशस्वी चाचणी केल्याची सांगितलं देखील आहे.

एअरबस कंपनीने सिटीबस नावाचा प्रोजेक्ट सुरू केला आहे. या अंतर्गच रोल्स रॉयस कंपनीच्या इंजिनचा वापर करून चार ते पाच माणसं वाहून नेण्याची क्षमता असणारे एअर टॅक्सी सुरू करण्याच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत..

अशा वाहनांची क्षमता वाढवून त्या सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या शहरांमध्ये कशा वापरता येतील यासाठी संपूर्ण जगातच प्रयत्न सुरू आहेत.

आत्ता जाता जाता अजून एक गोष्ट चाकणच्या सागर डिफेन्स इंजिनियरिंग या कंपनीने भारतातला मानवी वाहतूक करू शकणारा ड्रोन विकसित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर या ड्रोनचे प्रात्यक्षिक देखील झाले असून असे ड्रोन भारतीय नौदलाकडे सोपवले जाणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे हे तंत्रज्ञान कुठे विकसित झालय तर पुण्याच्या चाकणमध्ये..

थोडक्यात केबल कार ते E-vtol सिस्टीम पुढील काही वर्षात सर्वसामान्य होण शक्य आहे, त्यामुळे गडकरी जे बोलतात ते शक्य आहे. पण या सर्व गोष्टीत मनापासून असणारी एकच इच्छा ती म्हणजे हवेत टोलनाके तेवढे नसावेत…

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.