गेल्या २० वर्षांपासून या सुरक्षित हातात आहे भारतीय क्रिकेट संघाचं ‘स्टेअरिंग’

 

१९९९ सालापासून भारतीय क्रिकेट संघ जेव्हा कधी इंग्लंडच्या दौऱ्यावर जातो त्यावेळी संघात बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या असतात. प्रत्येक दौऱ्यात संघाचा कॅप्टन वेगळा असतो, कधीकधी कोच बदललेले असतात. आधीच्या दौऱ्यातील  अनेक खेळाडूंच्या जागी नवीन खेळाडू आलेले असतात.  पण या २० वर्षात एका ब्रिटीश  माणसाचं भारतीय संघाशी असलेलं नात मात्र जशास तसं टिकून आहे. तो माणूस म्हणजे जेफ गुडविन. भारतीय क्रिकेट संघाचा ड्रायव्हर.

gudween 4jpeg
bcci

१९९९ सालापासून जेफ गुडविन हे भारतीय संघाचे ड्रायव्हर म्हणून काम बघताहेत. सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने या दौऱ्यात देखील भारतीय संघाचं सारथ्य त्यांच्याकडेच आहे. २ दिवसांपूर्वी बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर त्यांची एक मुलाखत प्रसिद्ध केली. या मुलाखतीमध्ये त्यांनी भारतीय खेळाडूंशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा दिला.

सुरेश रैनाला कधीच विसरू शकणार नाही

सुरेश रैना आपल्यासाठी खूप खास असल्याचं गुडविन सांगतात. यामागे कारण देखील तसंच आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा भारतीय संघाने इंग्लडचा दौरा केला होता, त्यावेळी गुडविन यांच्या पत्नी गंभीर आजाराने ग्रस्त होत्या. वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या खर्चाची उभारणी करण्यात नाकीनाऊ येत असल्याने गुडविन काळजीत होते. अशा वेळी सुरेश रैना त्यांच्या मदतीस धावून आला.

सुरेश रैनाने पैसे उभारण्यासाठी आपला शर्ट काढून तो लिलावासाठी उपलब्ध करून दिला. या घटनेपासूनच सुरेश रैना आणि भारतीय संघाशी भावनिकदृष्ट्या जोडले गेल्याची माहिती ते देतात.

gudween 2

गुडविन यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर विषयीची देखील एक आठवण सांगितलिये. जेफ सांगतात की काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाने देखील भारतीय संघासाठी ड्रायव्हिंग केली होती. त्यावेळी सचिन त्याच्या शेजारी बसला होता.

“तुझे वडील हे मोठे स्टार आहेत” असं सचिन तेंडूलकर गुडविन यांच्या मुलाला म्हणाला होता . सचिनची ही प्रतिक्रिया गुडविन यांच्या मुलासाठी निश्चितपणे अभिमानाने मिरविण्यासारखी गोष्ट होती. भारतीय संघाला ते देत असलेल्या सेवेबद्दल भारत सरकारकडून देखील त्यांच्या कामाचं कौतुक करणारं पत्र त्यांना आणि त्यांच्या मुलाला देण्यात आल्याची माहिती देखील ते देतात.

जेफ हे प्रोफेशनल ड्रायव्हर आहेत. त्यांनी अनेक संघांसाठी ड्रायव्हिंग केलेलं आहे. जगभरातील क्रिकेट संघांसोबत काम केल्यानंतरच्या आपल्या अनुभवावरून ते भारतीय संघाला जागतिक क्रिकेटमधील सर्वात शिस्तबद्ध आणि व्यावसायिक क्रिकेट संघ मानतात.

या खेळाडूंनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांकडून क्रिकेट खेळलंय!!!

विदेशी भूमीवर शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू!!!

चेतन शर्माला आजही लुझर सिक्ससाठी ओळखताय, आत्ता मत बदलेल..!!!

 

Leave A Reply

Your email address will not be published.