शरद पवारांचा “तो” निर्णय ज्यामुळेच पिंपरी चिंचवड उद्योगनगरी म्हणून टिकू शकली.

पुणे शहर जसे शैक्षणिक आणि सांस्कृतिक नगरी आहे तसेच ते उद्योगाचे शहर देखील आहे. हिंजवडी येथील आय.टी.पार्क, पिंपरी-चिंचवड येथील असंख्य कारखाने यामुळे उद्योगाला चालना मिळाली आणि हजारो हातांना काम देखील मिळाले.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रोजगाराची निर्मिती करणारे शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख आहे. या पिंपरी चिंचवड आद्योगिक नगरीला नावारूपाला आणण्यात टाटा कंपनीचा सिंहाचा वाट आहे.

जेव्हा जेव्हा राज्यातील एखाद्या प्रदेशात अडचण आली तेव्हा तेव्हा तेथील लोक पुण्याकडे आले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव. या परिसरातील बेलगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला आणि त्यानंतर तालुक्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला. यावर तोडगा म्हणू अखेरीस स्वतःचे गाव सोडून अनेक कुटुंब पुण्यात स्थायिक झाली,

त्यातीलच काही पिंपरी चिंचवड मध्ये नोकरी करतात तर काही व्यवसाय. या उद्योग नगरीच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवारा यांचे मोठे योगदान आहे. ती जपण्यात, वाढवण्यात ते कायमच सक्रीय राहीले आहेत. त्याचाच एक किस्सा.

१९८८ ची हि गोष्ट.

तिकडे मुंबईत ‘बॉंबे हाऊस’ मद्ये खांदेपालट उंबरठ्यावर आले होते तर इकडे पिंपरी चिंचवड मध्ये टेल्को मध्ये एक नविन कामगार नेता उदयास येत होता. १९८८ च्या डिसेंबरमध्ये रतन टाटा “टाटा मोटर्स” चे अध्यक्ष बनले त्यातच कंपनीत ‘राजन नायर’ नावाचा एक कामगार नेता देखील तयार झाला.

पण हा राजन नायर कामगार नेता फक्त नावाला होता. वास्तविक दादागिरी करुन स्वत:च हित साधण्यात तो माहिर होता. एकदा या नायर आणि आकुर्डी कारखान्याच्या सुरक्षा रक्षकाचा वाद झाला व राजन ने सुरक्षा रक्षकला ठार मारण्याची धमकी दिली. प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर नायर दोषी आढळला व त्याला माफी मागण्यास सांगण्यात आले. पण त्याने माफीला नकार दिल्याने त्याला निलंबित करण्यात आले. अहंकार एकदा का मेंदूत गेला कि तो माणसाला संपवतो असे म्हणतात नायर च्या बाबतीत हेच झाले.

आपली अहंकारी बुद्धी काय विचार करते आहे हे कळण्याआधीच त्याने त्याचे निलंबन टाटा यांच्यामुळेच झाले असा निकाल आपल्याच मनात लावून टाकला  ‘मी टाटा ला धडा शिकविनच” असा निर्धार केला. 

त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात कामगारांचा वेतन पुर्नरचना करार करण्यात येणार होता. हीच वेळ साधत नायरने कामगारांना भुलवले व टाटांकडे आततायी मागण्या करायला लावल्या आणि कंपनीने आपल्याशीच बोलणे करावे असे धोरण देखील अवलंबिले. या सगळ्याच मागण्या कंपनीने धुडकावून लावल्या.

या सर्व पार्श्वभूमीवर रतन टाटा जानेवारीत टाटा मोटर्स ला भेट देणार होते. त्यावेळी तब्बल ८५०० कामगारांच्या रोजगाराचे साधन टाटा कंपनी होती. एवढ्या मोठ्या संख्येमुळे काहीतरी अघटीत घडू नये म्हणून पोलिसांनी नायरला स्थानबद्ध केले. त्यानंतर नायरला न्यायालयात हजर करणार असल्याची बातमी मिळताच कामगारांनी न्यायालयच्या परिसरात प्रचंड गर्दी केली.

वातावरणात तणाव वाढत होता आणि ही परिस्थिती जर कायम राहीली तर त्याचा परिणाम पुणे आणि परिसर तसेच संपूर्ण राज्याच्या गुंतवणूकीवर आणि सामाजिक परिस्थितीवर होणार होता. त्यामुळे नायरला सबुरीने घेण्याचा सल्ला वारंवार दिला जात होता पण तो कोणाचे हि ऐकण्यास तयार नव्हता.

नायरने २१ मार्च रोजी टाटा मोटर्स मधील तब्बल २२ मोठ्या अधिकाऱ्यावर हल्ले केले. आंदोलनास हिंसक वळण मिळाले. त्यानंतर टाटांनी विविध योजना आणून कामगार आपल्या बाजूने वळविण्यास सुरवात केली होती.

कामगार कामगार फुटणार अशी स्थिती दिसू लागल्याने स्वताच्या अस्तित्वालाच आव्हान मिळू लागल्याची जाणीव नायरला झाली आणि त्याने थेट शनिवारवाड्यापुढेच बेमुदत उपोषण सुरू केले.

तीन एक हजार कामगार येऊन त्याला मिळाले. पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतील अनेक कारखान्यातून नायरला पाठिंबा मिळू लागला या परिसरात एक दिवस औद्योगिक बंद पळाला गेला. नायर भलताच मोठा झाला होता. त्यात राजकिय वातावरण तापू लागलेले कारण लोकसभा निवडणूका दोनच महिन्यांवर आलेल्या होत्या. त्यामुळे राजकीय पक्षही नायरच्या खांद्यावर बंदुक ठेऊन बोलू लागले आणि आता जर हा संप चिघळला तर ते महाराष्ट्राला परवडणारे नव्हते त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी बोलणी सुरू करावी असा टाटा व नायर यांच्यावर दबाव वाढविण्यात आला.

त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुखमंत्री होते. रतन टाटा अमेरिकेत होते, पवारांनी टाटांशी संपर्क साधून ‘वर्षा’ वर २७ सप्टेंबर ला दुपारी बैठक ठरली. नायरनेही येण्याचे कबूल केले. ठरल्याप्रमाणे टाटा व पवार वर्षावर दुपारी चार वाजता हजर झाले. नायर मात्र तब्बल दीड तास वाट पाहायला लावून तिथे साडे पाचला पोहचला ते ही घुश्यातच. चर्चा सुरू झाली परंतु मी म्हणेन तीच पुर्व दिशा असाच नायरचा एकंदरीत स्वर होता. साहजिकच चर्चा फिसकटली.

असे होणे राज्याला परवडणारे नव्हते. याचा थेट परिणाम गुंतवणूकीवर व त्यातून रोजगार निर्मिती वर होणार होता. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांसाठी व राज्यासाठी हा विषय महत्वाचा बनला होता. त्यामुळे शरद पवारांसारख्या मुरब्बी राजकारण्याला हे लक्षात आले कि,

‘आता मलमपट्टी ची वेळ निघून गेलीये आता हवी ती शस्रक्रियाच!’ म्हणून त्यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली.

त्याच रात्री अडीच वाजता पोलिसांनी शनिवरवाड्यावरील उपोषणकर्त्यांना काही कळायच्या आत जेरबंद केले. मुंबई हुन पुण्याकडे येत असलेल्या नायरला मधेच अटक करून रत्नागिरी तुरुंगात हलविण्यात आले. पुण्यात बारा तास कार्यवाही सुरु होती. पोलीस खाक्या समोर दिसताच नायरच्या बोलण्याने आकर्षित झालेले कामगार मात्र नरमले.

बेकायदेशीर संप मोडून काढण्यात आला. वातावरण स्थिर झाले. महाराष्ट्राचा उद्योग मोठ्या संकटातून वाचला आणि नव्याने पिंपरी चिंचवड मध्ये उद्योग धंदा तेजीत आला असंख्य दिवस कामगार संपावर असलेले कामगारानी पुन्हा एकदा काम चालू केले.  

  • आकाश झांबरे पाटील. (9767813939)

हे ही वाचा. 

3 Comments
  1. Bapu Ambikar says

    …..सुंदर लेख.आवडला.

  2. Bapu Ambikar says

    ..सर लेख सुंदर.आवडला

Leave A Reply

Your email address will not be published.