या हकीमने औषध तयार केललं पण लोकांनी सॉफ्ट ड्रिंक म्हणून फेमस केलं…..

१९०६ च्या सुमारास दिल्लीमध्ये भयानक उन्हाळा होता. गरमीने लोकं अस्वस्थ होत होते. अगदी लोकं दगावत सुद्धा होते. अशा या भयाण परिस्थितीत जुन्या दिल्लीतील एका हकीमने युनानी पद्धतीने एक औषध तयार केलं आणि त्या औषधामुळे लोकं बरे होऊ लागले आणि गरमी वर उपाय म्हणून त्या औषधाचं सेवन करू लागले.

या हकीमच्या एका साध्या आयडियाने पुढे जाऊन एका जबरदस्त ब्रॅण्डची निर्मिती केली. आजची यशोगाथा आहे हमदर्द कंपनीने बनवलेल्या रुहअफजा या सॉफ्ट ड्रिंकची. एका छोट्याश्या क्लिनिकमधून इतक्या मोठ्या ब्रॅण्डची निर्मिती झाली. आणि या ब्रॅण्डचं पाकिस्तानसोबत काय कनेक्शन आहे ते पण बघूया.

युनानी चिकित्सा हि एक अतिशय जुन्या काळापासून चालत आलेली एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. ४६६-३७७ ईसा पूर्व काळापासून हि पद्धत सुरु झाल्याचं मानलं जात. हि युनानी पद्धत सेम आपल्या आयुर्वेदिक पद्धतीशी मिळतीजुळती आहे.

आपल्याकडे पित्त खोकला, सर्दी अशा गोष्टींवर जे आपण साधे साधे उपाय करतो तसेच उपाय या युनानी पद्धतीत सांगितले आहेत.

एका शतकापूर्वीची आहे. १९०६ साली दिल्लीतल्या लाल कुआ बाजारात एका हकीमने आपलं दुकान उघडलं होतं. त्या हकिमचं  होतं हाफिज अब्दुल मजिद. त्यांनी आपल्या क्लिनिकचं  हमदर्द दवाखाना.  उन्हाळयात हाहाकार माजला होता, उष्माघाताने लोकं मरत  होते.

यावर उपाय म्हणून हकीम हाफिज अब्दुल मजीद यांनी युनानी पद्धत वापरून एक खुराक तयार केला.  कामी आला आणि लोकं त्या खुराकाने बरे होऊ लागले. खरंतर एक सिरप होतं, जे पाण्यात मिसळून घेतलं जात होतं. याला हकीम साहेबानी नाव दिलं रुहअफजा.

आता हे रुहअफजा पेय फक्त आजारी लोकांसाठीच न वापरता प्रत्येकजण हे पेय पिऊ लागला. कुठल्याही आजारावर ते प्यायल्याने लोकांना बरं वाटू लागलं होतं म्हणून त्याची विक्री जास्तचं होऊ लागली. लोकांना फायदा होऊ लागला तसं रुहअफजाचं मार्केटिंगही होऊ लागलं.

रुहअफजा फक्त रुग्णांसाठीच मर्यादित न राहता लोकांनी रोजा सोडण्यासाठी इफ्तारी मधेही ते वापरायला सुरवात केली. दिल्लीत या पेयाने धूम उडवली होती. सुरवातीला हे काय बाटलीत मिळत नसे तेव्हा लोकं घरून भांडी घेऊन जायचे आणि त्यात ते सरबत घेऊन यायचे.

हकीम हाफिज अब्दुल मजीद यांना दोन मुलं होती. अब्दुल हमीद आणि मोहम्मद सईद. हे दोघेही जण वडिलांना मदत करायचे. १९२० ला हमदर्द दवाखाना रजिस्टर हॉस्पिटल म्हणून नोंदवलं गेलं. दोन वर्षानंतर हकीम हाफिज अब्दुल मजीद यांचं निधन झालं.

वडिलांच्या निधनाने दोन्ही मुलांवर संपूर्ण जबाबदारी येऊन पडली. दोन्ही भावांनी उत्तम पद्धतीने हि जबाबदारी पेलली. १९४० साली त्यांनी दिल्लीमध्ये हमदर्द नावाने एक नवीन प्लांट उभा केला. इथून खऱ्या अर्थाने रुहअफजा पॅकिंग करून आणि विविध फ्लेवर्समध्ये विकलं जाऊ लागलं.

१९४७ साली भारत पाकिस्तान फाळणी झाली आणि हमदर्द ब्रॅण्डचं सुद्धा विभाजन झालं. अब्दुल हमीद हे त्यांच्या आईसोबत भारतातच थांबले तर मोहम्मद सईद हे पाकिस्तानात गेले. मोहम्मद सईद यांनी पाकिस्तानात जाऊन नव्याने हमदर्द ब्रॅण्डची सुरवात केली आणि भारतात अब्दुल हमीद यांनी हि कंपनी सांभाळली.

पुढे जाऊन अब्दुल हमीद हे या ब्रँडचे सर्वेसर्वा झाले. त्यांनी रुहअफजाचं प्रोडक्शन आणि मार्केटिंग इतक्या जबरदस्त पद्धतीने केलं कि त्यांचा व्यवसाय हा दुप्पट वेगाने चालू लागला. १९६२ साली त्यांनी युनानी पद्धतीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ हिस्ट्री ऑफ मेडिसिन अँड मेडिकल रिसर्च नावाने लॅबहि सुरु केली आणि हमदर्द कॉलेजही स्थापन केले.

पुढे गाजियाबादमध्ये हमदर्दने अजून एक प्लांट सुरु केला. १९९२ साली भारत सरकारकडून अब्दुल हमीद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

हमदर्दने अनेक प्रोडक्ट बाजारात उतरवले. साफी, गुलाब अर्क,सिंकारा अशा अनेक प्रोडक्टने हि कंपनी घराघरात पोहचली. आज घडीला हमदर्द या ब्रँडची उलाढाल हि १०००कोटीपेक्षा जास्त आहे. ६००हुन अधिक प्रोडक्ट आणि ५ लाख ब्रान्चेस आहेत. भारतातील अनेक लोकांना हमदर्दने रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. भारत पाकिस्तान दोन्ही देशात हि कंपनी फॉर्ममध्ये आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.