कायम ट्रेंडिंग मध्ये राहणाऱ्या ‘बॉयकॉट’ शब्दाचा जन्म असा झाला

सध्या बॉयकॉटचं वारं देशात पुन्हा फॉर्ममध्ये आलंय. पाकिस्तानात काश्मीर डेच्या निमित्तानं काश्मीरबाबत अकलेचे तारे जोडत या कंपन्यांनी पाकिस्तानच्या बाजूनं सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या. मग जगातल्या सगळ्यात मोठ्या मार्केट असणाऱ्या भारतीयांनी आवाज उठवल्यानंतर आता हुंदाई,किया, केएफसी, डॉमिनोज आता माफी मागत सुटले आहेत.

पण या आधीही अनेक कंपन्यांना लोकांच्या अशा रोषाला सामोरे जावे लागले आहे. तसेच आता ट्रेंडिंगच्या जमण्यात लोक अनेक वेळा लोकं थोड्याश्या गोष्टीने ऑफ़ेन्ड होतात आणि लागलीच #बॉयकॉटचा ट्रेंड सोशल मीडियावर चालू करतात.

तर म्हटलं हा बॉयकॉटचा शोध नक्की लावला कुणी.

तर मग थोडं रिसर्च केल्यावर माहित पडलं की बॉयकॉट हा शब्द एक माणसाचं आडनाव होतं. 

आता तुमच्यातले काही जण इंग्लंडचे फेमस बॅट्समन  सर जेफ्री बॉयकॉट यांचा नावाचा काहीतरी संबंध लावत असतील तर भावांनो त्या माणसाचा नाहीतर त्याचाच देशाच्या दुसऱ्या माणसाचा या नावाशी संबंध आहे.

१८०० च्या उत्तरार्धात आयरिश “लँड वॉर” दरम्यान, चार्ल्स बॉयकॉट नावाचा ब्रिटीश कॅप्टन आयर्लंडमधील मेयो या गावात येथे लॉर्ड एर्न नावाच्या जमीनदाराचा जमीन एजंट होता. 

१८८० मध्ये, एका वर्षाच्या खराब पिकानंतर, लॉर्ड एर्नने त्याच्या शेती वाट्याने करणाऱ्या शेतकऱ्यांना या जमिनीच्या शेतसाऱ्यात १०% कपात करण्याची ऑफर दिली. तथापि, त्याच्या भाडेकरूंना ही कपात पुरेशी वाटली नाही, म्हणून त्यांनी निषेध केला आणि २५% कपात करण्याची मागणी केली.

लॉर्ड एर्नने हे नाकारले आणि त्याचा विश्वासू जमीन एजंट कॅप्टन चार्ल्स बॉयकॉटला बंडखोर भाडेकरूंना बाहेर काढण्यासाठी पाठवले.

हे घडण्याच्या काही काळापूर्वी, चार्ल्स स्टीवर्ट पारनेल या नावाने ओळखल्या जाणार्‍या आयरिश लँड लीगच्या सदस्याने हिंसाचाराचा अवलंब करण्याऐवजी शांततापूर्ण सामाजिक बहिष्काराच्या माध्यमातून जमीनदार आणि जमीन एजंटांशी व्यवहार करण्याचा प्रस्ताव दिला होता. पारनेलने सांगितले होते की स्थानिक समुदायातील लोकांनी गुन्हेगाराकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि त्यांच्याशी कोणताही व्यवसाय करू नये. शेतकऱ्यांनी आता हीच टेक्नीक चार्ल्स बॉयकॉट या एजंटविरोधात राबवण्याचं ठरवलं.

चार्ल्स बॉयकॉटच्या आपल्याला शेतीतून हटवण्यासाठी येणार आहे ही बातमी पसरल्यानंतर लगेचच बॉयकॉटला तो स्थानिक लोकांनी एकटा पाडायचं ठरवलं.

त्याच्या कामगारांनी त्याच्या शेतात आणि तबेल्यात तसेच त्याच्या घरी काम करणे बंद केले.स्थानिक व्यावसायिकांनी त्याच्याशी व्यापार करणे बंद केले आणि स्थानिक पोस्टमननेही त्याचा मेल देण्यास नकार दिला. गावकऱ्यांनी त्याला पूर्णपणे वाळीत टाकला होता. बॉयकॉटवर केलेल्या या कारवाईमुळे त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता कारण कोणीही त्याचे पीक काढण्याचे काम करायलाही कोणी तयार होईना.

प्रेसने मग बहिष्कार उचलायला वेळ लावला नाही आणि अवघ्या काही आठवड्यांतच बॉयकॉटचे नाव सर्वत्र पसरले.
न्यूयॉर्क ट्रिब्यूनचे जेम्स रेडपाथ हे या घटनेनंतर लगेचच आंतरराष्ट्रीय प्रेसमध्ये हा शब्द वापरणारे पहिले व्यक्ती होते आणि टाइम्सने १८८० च्या नोव्हेंबरमध्ये संघटित वाळीत टाकण्याच्या प्रकारचे वर्णन करण्यासाठी बॉयकॉट हा शब्द वापरला. पुढे इंग्लिश लोकांच्या बोलीभाषेतही तुझी हालत बॉयकॉट सारखी करेन म्हणजेच तुझा बॉयकॉट करेन हा वाक्यप्रचार रूढ झाला आणि इंग्लिश भाषेच्या शब्दकोशात अजून एक नवीन शब्द ऍड झाला.

तुम्हालाही अशी काही इंटरेस्टिंग माहिती माहित असेल तर खाली कंमेंट करून जरूर सांगा.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.