म्हणून वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्यानंतर केनियाने अमेरिकेला १४ गायींची मदत देवू केली होती…

मागच्या २ दिवसांपासून भारतात सोशल मीडियावर आहे. याच कारण म्हणजे केनियाने भारताला, जवळपास १२ टन साहित्य मदत म्हणून पाठवलं आहे. हे साहित्य मेडिकलशी संबंधित नाही, तर खाण्याशी संबंधित आहे. यात चहा, कॉफी आणि शेंगदाणे अशा विविध साहित्यांचा समावेश आहे.

केनियाचे उच्‍चायुक्‍त विली बेट म्हणाले, ही मदत सर्व फ्रंटलाईन वर्कर्सच्या आणि त्यांच्या कामाच्या सन्मानार्थ त्यांच्यासाठी दिली जातं आहे.

यानंतर सोशल मिडीयावर केनिया बाबत २ ट्रेंड बघायला मिळतं आहेत. १ म्हणजे काही जण केनियाच्या या मदतीचे कौतुक करत आहेत, तर काही जण चेष्ठा देखील करत आहेत. यात मग अगदी केनियाला गरीब म्हणण्यापासून ते ज्या देशाला स्वतःचा कोरोना कंट्रोलमध्ये येत नाही असा देश भारताला मदत करत आहे, असं देखील म्हंटलं जातं आहे. 

याच सगळ्या पोस्टमध्ये अजून एक पोस्ट सगळीकडे प्रचंड प्रमाणात व्हायरल होतं आहे, ते म्हणजे केनियाने ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेला केलेली मदत. विशेष म्हणजे ती मदत आर्थिक वगैरे नव्हती, तर ती होती १४ गायींची.

पण या सगळ्या पोस्टमध्ये गायींची मदतचं का केली होती या बद्दल कुठेही कारण सांगितलेलं नाही. मात्र टेन्शन घेऊ नका कारण कमी तिथं ‘बोल भिडू’ हे तत्व आहे. तेच कारण आम्ही सांगणार आहोत.

तर केनिया आणि टांझानियाच्या सीमेवर केनियामधील एक स्थानिक समूह राहतो. त्यांचं नाव म्हणजे ‘मसाई’. जेव्हा वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर हल्ला झाल्याच्या साधारण ६ ते ७ महिन्यांनी म्हणजे मे २००२ हि गोष्ट केनियामधील मसाई समूहाला समजली. त्यानंतर त्यांनी या हल्ल्याप्रती दुःख व्यक्त करण्यासाठी गायी मदत म्हणून देण्याचं ठरवलं.

त्यासाठी त्यांनी केनियाची राजधानी नैरोबीमधील अमेरिकन दूतावासाचे उपप्रमुख विल्यम ब्रानकिक यांना एक पत्र पाठवलं, आणि त्यानुसार ते स्वतः या ३ जून २००२ मध्ये गायी मदत म्हणून स्वीकारण्यासाठी टांझानियाच्या सीमेवर पोहोच झाले.

त्यावेळी गावातील लोक म्हणाले,

अमेरिकेच्या लोकांसाठी आम्ही या गायी दान करत आहोत, कारण त्यातून तुमची मदत होऊ शकेल.

त्यावेळीच ब्रानकिक म्हणाले होते,

“मला माहित आहे कि, मसाई लोकांसाठी गाय ही सगळ्यात महत्वपूर्ण घटक आहे, आणि त्यांनी या गायी आम्हाला दान केल्यामुळे यातून अमेरिकेच्या प्रति सर्वोच्च सहानुभूती दिसून येत आहे”

अमेरिकेने देखील मसाई लोकांसाठी सर्वोच्च सन्मान देऊ केला, आणि हि मदत स्वीकारताना आपलं राष्ट्रगीत देखील म्हंटलं. 

मात्र या गायी कायदेशीर अडचणींमुळे या गायी स्थानिक बाजारात विकण्यात आल्या आणि त्याऐवजी स्थानिक मसाई लोकांच्या हाताने बनवलेले दागिने खरेदी करण्यात आले. या दागिन्यांना न्यूयॉर्कमधील म्युझियममध्ये ठेवण्यात आलं. मात्र या दरम्यान अमेरिकेच्या लोकांपर्यंत या गायींच्या दान केल्याची बातमी पोहोचली तेव्हा त्यांनी देखील मसाईच्या लोकांचे आभार मानले.

काहींनी तर सरकारला मागणी केली कि या दागिन्यांऐवजी त्यांना गाईचं हव्या आहेत, कारण आपल्याला आता पर्यंत ज्या गोष्टी दान म्हणून मिळाल्या आहेत, त्यात गाय हा सगळ्यात अद्भुत घटक होता. तसही मसाईचे लोक जर दागिनेचं देणार होते तर ते देऊ शकले असते, पण त्यांनी आपल्याला खास ओळख म्हणून गाई भेट दिली.

त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, जॉर्ज डब्लू. बुश. 

म्हणून गायींची मदत केली होती…

मूळचे वाराणसीचे आणि सध्या टांझानियामध्ये कार्यरत असलेले भूगर्भ शास्त्रज्ञ रत्नेश पांडे यांनी एका हिंदी माध्यमाशी बोलताना या कारणाबद्दल बरंच सविस्तर सांगितलं आहे. ते म्हणतात,

आफ्रिकाच्या केनिया आणि टांझानियामध्ये असलेला मसाई समूह मागच्या ५ हजार वर्षांपासून इथं राहत आहे, आणि तो देखील आजही त्याच जुन्या संस्कृतीला त्यांनी आपलं म्हणून अभिमानाने सांभाळलं आहे. त्यामुळेच ते पर्यावरण आणि त्याच्याशी संलग्न माहोलमध्ये राहणं पसंत करतात.

या सगळ्या आदिम समूहाचा मुख्य व्यवसाय आहे गायींचं पालन करणं. याच व्यवसायाभोवती या सगळ्यांची अर्थव्यवस्था फिरत आहे. त्यामुळे ते गायीला सर्वोच्च स्थानी मानतात. अगदी जंगलात देखील ते वाघाला मारतात पण गाईचं रक्षण करतात.  

अगदी चलनातील व्यवहार देखील आजही तिथल्या ठिकाणी वस्तू विनिमय पद्धतीने होतं असतात. यात काही वस्तू खरेदी केल्यास त्या बदल्यात तेवढ्या किंमतीच्या गायी दिल्या जातात. त्यामुळेचं तिकडच्या भागात एका घराबाहेर २०-२५ गायी अगदी सहज स्वरूपात दिसून येतात. 

या मसाई समूहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत बहादूर म्हणून ओळखले जातात. इतके कि कोणत्याही हत्याराशिवाय वाघ, जिराफ, हत्ती या प्राण्यांची शिकार करतात. सोबत कोण्या प्राण्यांना जर शिकार केली असेल तर त्यांना पळवून लावत ती शिकार एकमेकांमध्ये वाटून खातात.

इकडे लग्नात देखील हुंडा म्हणून गायीचं द्यावा लागतात, आणि ते देखील पुरुष महिलांना देतात. या अटीनुसार जो मुलगा मुलीकडच्यांना ३० गायी देईल त्याच घरामध्ये मुलगी दिली जाते. 

या सगळ्या कारणामुळे मसाईच्या लोकांनी त्यांच्या लेखी सर्वोच्च स्थानी आणि सर्वोच्च किंमत असलेल्या गायी भेट स्वरूपात दिल्या होत्या. अमेरिकन दूतावासाचे उपप्रमुख विल्यम ब्रानकिक यांना देखील केनियामध्ये राहिल्यामुळे मसाई लोकांच्या दृष्टीने गायींचे महत्व माहित होते, त्यामुळेच त्यांनी अमेरिकेच्या प्रति सर्वोच्च सहानुभूती दिसून येत आहे असं म्हंटलं होतं.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.