हे शिलाजीत.. शिलाजीत म्हणून बोलत असतेत पण ते असतंय तरी काय..?

शिलाजित हे बरेच जणांना माहित नाही. त्याचा काय उपयोग होतो. तो कशासाठी वापरले जाते.   शिलाजित हे हिमालयात  मिळत असल्याच सांगितल जातय. ते एक आयुर्वेदिक औषध आहे. शिलाजितच्या सेवनांने व्यक्तीच आयुष्य वाढत असल्याच सांगतात. शिलाजितचा वापर फक्त भारतातच करतात असं नाही तर इतर देशातही याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पुरूषांची शारिरिक क्षमता यामुळं वाढते असे सांगतात.

शिलाजित काय आहे

शिलाजित हे गडद तपकिरी रंगाचे असते. हे सहजासहजा उपलब्ध होत नाही. ही एक दुर्मिळ वस्तू आहे. हे पर्वताच्या गुंहेतील धातू आणि वनस्पतीच्या घटकांपासून तयार होतेय. शिलाजित तयार होण्यासाठी अनेक वर्ष जावे लागतात. त्यामुळेच तर सहज उपलब्ध होत नाही म्हणून तर त्याची किंमत महाग असते.

शिलाजित मध्य अशियाच्या पर्वतात, त्याचबरोबर पाकिस्तानातील गिलगित आणि बलिस्तान पर्वतात सापडतय. हे येथील पर्वताच्या गुंहामध्ये असलेल्या धातूपासून आणि वनस्पतीच्या घटकापासूनही तयार होतय.

शिलाजित कस बनते

शिलाजित हे खडकाच्या आतल्या भागात असते. त्याला तेथून बाहेर काढल्यानंतर त्याची व्यवस्थित  साफसफाई केली जाते. त्यातून बाहेर काढल्यानंतर शिलाजितचे बारिक बारिक टुकडे केले जातात.    त्यानंतर त्याला काही दिवस पाण्यात भिजत ठेवतात. ते जोपर्यंत पाण्यात  चांगले  भिजत नाही तोपर्यंत त्याला काढत नाही. आणि त्यानंतर  शेवटी शिलाजितचे जो भाग हानिकारक असतो. तो बाजूला काढला जातो.

ह्या सगळ्या महिन्याभराच्या प्रोसेसनंतर मग ते  वापरण्याजोग तयार होतं. ओरिजनल शिलाजितमध्ये ८६ प्रकारचे खनिजे असतात.  त्यामुळं ते शरिरातील रक्तभिसरण प्रक्रिया वेगाने सुरू ठेवते. याबरोबर   नैराश्य, आळस, ह्या गोष्टी नाहीशा करण्यास त्यामुळं मदत होते.

सध्या मार्केटमध्ये शिलाजितच्या १० ग्रॅम प्रोडक्टची किंमत २०० ते ८०० रुपयापर्यंत आहे. शिलाजितची  किंमत प्रत्येक ठिकठिकाणी वेगळी असल्याच पाहायला मिळते. ती तेथील मालकांवर अवलंबून राहते.

शिलाजितचे फायदे

१. रक्त नियंत्रित ठेवते

शिलाजितच्या सेवनाने रक्तात लोह प्रमाण वाढते. जर एखाद्या माणसांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असले तर तो अनेक अजारांना बळी पडू शकते.पण शिलाजित व्यक्तीच्या शरीरात रक्त कमी होवून देत नाही. रक्त नियंत्रित ठेवते.

२. रोग प्रतिकारक शक्ती वाढते

शिलाजित मुळे व्यक्तीच्या शरिरात रोग प्रतिकारक शक्ती वाढते.  त्यामुळे तो व्यक्ती सहजासहजी  आजारी पडत नाही. त्याचबरोबर शरीरातील इम्युनिटी वाढते. आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

३. डायबिटीजवर उपाय

डायबिटीजवर शिलाजित हे रामबाण औषध ठरत असल्याच सांगितल जात. शिलाजितमुळे एंटी डायबिटी वाढते आणि  एंटी डायबिटीजमुळे डायबिटी कमी होण्यास मदत होत.

४. टेस्टोस्टेरोन आणि हार्मोनमध्ये सुधारणा

पुरूषांसाठी टेस्टोस्टेरोन आणि हार्मोनची गरज असते. शिलाजित पुरूषांमधील नपुंसकता नष्ठ करण्याचे काम करते.  टेस्टोस्टेरोन लक्षणे केस गळणे, चरबी सुटणे, शरीर तंदुरूस्त नसणे.  शिलाजितमुळे पुरूषांमुळे मर्दानगी वाढण्यास मदत होते.

५. मेंदूसाठी चांगले

शिलाजितच सेवन केल्यास मेंदू फास्ट चालतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीची स्मरणशक्ती वाढ होते.

शिलाजितचे तोटे

1. शरिरात उष्णतेचे प्रमाण वाढते

2. यांमुळ पायात जळजळ होते.

3. हात पायात गर्मी वाढत असल्याचं निदर्शनास येते.

खरे आणि खोटे शिलाजित ओळखणं

खरे शिलाजित दुकानदार त्याच्या वासावरून ओळखतात. पण काही वेळेस ते ओळखता येत नाही. असंही सांगतात.

शिलाजितची साइज वाढण्यासाठी त्यात पीठ वापरत असल्याचं सांगितल जातय. त्यात फक्त थोड्याशा प्रमाणात शिलाजितचा वापर केला जातो. ज्यामुळ त्याचा वास येतो. आणि ते खरे असल्याचं वाटतं.

शिलाजित बाबत असही म्हटलं जात की ते वायग्रासारख काम करत नाही पण तरीही शिलाजितचा त्याच्यासारखा काही प्रमाणात फायदा होतो.

ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी शिलाजितचा वापर करू नये. त्यांनी शिलाजितच सेवन केल्यामुळं ब्लड प्रेशर वाढतो आणि त्या आजारी व्यक्तीला त्याचा आणखी त्रास होयला  सुरवात होती.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.