वडिलांकडून मिळालेला पक्ष काही पोरांनी पुढं नेला, तर काहींच्या पुढं अस्तित्वाची लढाई आहे

घराणेशाही काही भारतीय राजकारणात नवीन नाही. घराणेशाहीचं नाव आलं का पाहिलं नाव काँग्रेसचंच काढलं जातं.पंडित नेहरू मग  इंदिरा गांधी पुढे  राजीव गांधी आणि आता  राहुल गांधी अशी चालत आलेली काँग्रेसमधली घराणेशाही आपल्याला माहित आहे. पण काँग्रेस बदनाम झाली असली तरी बाकी अनेक पक्षात घराणेशाही असल्याचं आपल्याला कळून येतं.

नुकतीच हैद्राबाद मध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची मिटिंग पार पडली. या मिटिंग मध्ये देशातून घराणेशाहीचं राजकारण नष्ट करण्याचा प्रण भाजपने केलाय. त्यामुळे भाजपने घेतलेल्या या प्रणासमोर नेमके कोणकोणते घराणे आहेत याची चर्चा होतेय.

यात अनेक असे राजकीय पक्ष आहेत ज्यांची जबाबदारी संस्थापकाने आपल्यांनंतर आपल्याच मुलांना दिलेली आहे. असे घराणेशाहीने बापाचा पक्ष मुलांना मिळणारे पक्ष कोणते ते बघुयात.

१ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.. म्हणजेच काँग्रेस..

काँग्रेसची स्थापना नेहरू किंवा गांधी घराण्याने केली नाही. परंतु नेहरू आणि गांधी घराणे देशाच्या सत्तेतील सर्वात मोठे घराणे राहिले आहे.

मोतीलाल नेहरू दोनदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. मोतीलाल नेहरूंनंतर जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांनतर इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. इंदिरा गांधींनंतर राजीव गांधी पक्षप्रमुख झाले. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनी पंतप्रधानपद मिळवले होते.  आता सध्या काँग्रे

2004 मध्ये राहुल गांधींनी सक्रिय राजकारणात एंट्री घेतली आणि अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आले. 

2009 आणि 2014 मध्ये ते मतदारसंघातून पुन्हा विजयी झाले. 2013 मध्ये राहुल गांधींची काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून निवड झाली, त्यांनी यापूर्वी महासचिव म्हणून काम केले होते. 2014 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत गांधींनी काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व  राहुल गांधींकडे होते. मात्र त्या निवडणुकीत काँग्रेसला झपाटून मार खावा लागला.

2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जिंकलेल्या 206 जागांच्या तुलनेत केवळ 44 च जागा काँग्रेसला जिंकता आल्या.

2017 मध्ये मग राहुल गांधींनी सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले आणि 2019 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसचे नेतृत्व केले. मात्र तेव्हासुद्धा काँग्रेसने फक्त 52 जागा जिंकल्या. विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी आवश्यक असलेल्या 10% जागा मिळवण्यातसुद्धा काँग्रेसला अपयश आले. निवडणुकीतील या खराब कामगिरीनंतर गांधींनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.

काँग्रेसचे ऑफिशियल अध्यक्ष नसताना देखील काँग्रेस आजही राहुल गांधींनाच आपला चेहरा म्हणून पुढं करत असते. 

देशभरतील निवडणुका लढतानाही राहुल गांधी काँग्रेसचं नेतृत्व करत असतात मात्र त्यानंतर काँग्रेसची स्तिथी अजूनही सुधारलेली नाहीये. आज काँग्रेस इतिहासातील आजपर्यंतच्या सगळ्यात वाईट फेज मधून जात आहे. 

२ – शिवसेना..

बाळासाहेब ठाकरे यांनी यांनी २००३ मध्ये उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष केलं होतं. त्यानंतर उद्धध्व ठाकरे राजकारणात अजूनच ऍक्टिव्ह झाले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात २००४, २००९, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यात आल्या होत्या. त्यापैकी २०१४ मध्ये शिवसेना भाजपबरोबर सत्तेत बसली. मात्र ज्युनियर पार्टनर म्हणून. भाजप मित्रपक्ष असतानादेखील शिवसेनचं खच्चीकरण झालं आणि पक्षाचा जनाधार कमी होत गेला.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २० पैकी १८ आणि विधानसभा निवडणुकीत ६३ जागांवर विजय मिळवला होता.तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १८ पैकी १८ तर विधानसभा निवडणुकीत ५६ जागांवर विजय मिळवला. 

परंतु भाजप आणि शिवसेना युती तोडत उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाले आणि मुख्यमंत्री झाले.

त्यानंतर शिवसेना पुन्हा आपलं प्रस्थ निर्माण करेल असं वाटत असतानाच पक्षात उभी फूट पडली आहे आणि ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरेंबरोबर ५५ आमदारांपैकी आज केवळ १६ आमदार राहिले आहेत.

३ – समाजवादी पार्टी..

मुलायमसिंग यादव १९९२ मध्ये जनता दलातून बाहेर पडले. त्यांनतर मुलायमसिंग यादव यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. समाजवादी पार्टीच्या स्थापनेनंतर मुलायमसिंग दोनदा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्याच कार्यकाळात त्यांचा अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.

मुलायमसिंग यादव यांच्यानंतर २०१७ मध्ये पक्षाची सूत्रे त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांच्या हाती आली. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात  २०१७ची विधानसभा निवडणूक, २०१९ ची लोकसभा निवडणूक आणि २०२२ ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्यात आली.

मात्र तीनही निवडणुकीत अखिलेश यादव यांना सत्ता मिळवता आलेली नाहीये.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला  ५ जागांवर विजय मिळवता आला. तर २०२२ च्या  विधानसभेच्या निवडणुकीत  ४७ जागांवरून सपाच्या १११ झाल्या. २०२२ मध्ये अखिलेश यांनी सत्ता  मिळवली नसली तरी पक्षाचा वोट शेअर ३२% टक्के इतका वाढला जो पक्षाच्या इतिहासातील सर्वाधिक आहे.

त्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाला अजूनही भविष्य असल्याचं जाणकार सांगतात.

४ – द्रविड मुन्नेत्र कडघम.. म्हणजेच डीएमके..

डीएमकेची स्थापना सी एन अण्णादुरई यांनी केली. त्यांच्या नंतर एम करुणानिधी डीएमकेचे प्रमुख झाले. डीएमकेचे प्रमुख झाल्यांनतर करुणानिधी चार वेळ तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले होते. 

करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा एम के स्टॅलिन पक्षप्रमुख झाला. एम के स्टॅलिन हे पक्षप्रमुख झाल्यांनतर त्यांच्या नेतृत्वात २०१९ ची लोकसभा आणि २०२१ ची विधानसभा निवडणूक लढवण्यात आलीय. 

२०१४ च्या निवडणुकीत एकही सीट मिळाली नव्हती मात्र २०१९ च्या लोक सभा निवडणुकीत डीएमकेने तब्बल ३८ जागांवर विजय मिळवला. 

तसेच २०२१ मध्ये झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत १५९ जागांवर विजय मिळवला आणि राज्यात एकहाती सत्ता स्थापन केली.

 तसेच सध्या प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकची अवस्था पाहता सध्या तरी स्टालिन यांच्या पुढे कोणते मोठे आव्हान नाहीये.  सध्या तमिळनाडू आणि पॉंडिचेरी या दोन विधासभेत डीएमकेचे १३९ आमदार, लोकसभेत २४ आणि राज्यसभेत १० खासदार आहेत.  

५ – जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स.. 

नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना शेख अब्दुल्ला यांनी केली होती. ते जम्मू कश्मीरचे पहिले निवडून आलेले पंतप्रधान आणि १९६५ नंतर चार वेळ राज्याचे मुख्यमंत्री होते. शेख अब्दुल्ला नंतर १९८१ मध्ये नॅशनल कॉन्फरन्सची सूत्रं त्यांचा मुलगा फारूक अब्दुल्ला यांच्या हातात आली. पक्षाची सूत्र हातात आल्यांनतर फारुख अब्दुल्ला हे तीन वेळ जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री झाले.

फारूख अब्दुल्ला नंतर त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात २००८ मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यात आली. यात पूर्वीप्रमाणे २८ जागा राखून ठेवत नॅशनल कॉन्फरन्सने सत्ता राखली.परंतु त्यांनतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सची बरीच पडझड झाली. आणि पक्षाला केवळ १५ जागा राखता आल्या. परिणामी मुफ्ती मोहम्मद सईद यांची पीडीपी सत्तेत आली. 

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने पूर्वीच्या तीनही जागा गमावल्या होत्या. 

मात्र २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या तीन जागा परत मिळवण्यात नॅशनल कॉन्फरन्सला यश आले. ऑक्टोबर २०१९ मध्ये केंद्र सरकारने जम्मू कश्मीरची विधानसभा भंग केली. त्यामुळे सध्या नॅशनल कॉन्फरन्सचे प्रतिनिधित्व राज्याच्या विधानसभेत नाहीत. 

६ – YSR काँग्रेस 

वाय एस आर काँग्रेसची स्थापना जरी जगनमोहन रेड्डीने केली असली तरी राजकीय वारसा मात्र त्याचे वडील वाय एस राजशेखर रेड्डी यांच्याकडून मिळालेला आहे. राजशेखर रेड्डी  हे काँग्रेसचे मोठे नेते होते परंतु २००९ मध्ये त्यांचे अकाली निधन झाले. 

राजशेखर रेड्डी यांच्या मृत्यूनंतर जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या वडिलांच्या नावाने वाय एस आर काँग्रेसची स्थापना केली. पक्षाच्या स्थापनेनंतर त्यांनी २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणूक लढवल्या मात्र सत्ता काय आणता आली नव्हती.

२०१४ च्या पहिल्याच विधानसभा वाय एस आर काँग्रेसने ७० जागा जिंकल्या तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १५१ जागा मिळवून जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री झाले. 

यासोबतच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ९ जागा मिळवून आपला ठसा उमटवला तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ जागा मिळवून दणदणीत विजय मिळवला होता. 

आज तेलगू देसमच्या पडझडीनंतर आणि राष्ट्रीय पक्षांची तेवढी ताकद नसल्याने आज वाय एस आर काँग्रेस आंध्रातील सर्वात शक्तिशाली पक्ष आहे अगदी त्यांचे वडील राजशेखर रेड्डी यांच्या काळात काँग्रेस पक्ष होता तसा.

७ – लोक जनशक्ती पार्टी..

जनता दलातून बाहेर पडल्यांनंतर रामविलास पासवान यांनी २०२० मध्ये लोक जनशक्ती पार्टीची स्थापना केली. पार्टी मोठी नसली तरी कायम केंद्रातील सत्ताधारी पक्षाबरोबर युती केल्यामुळे राम विलास पासवान सत्तेत राहिले.

२०२० मध्ये राम विलास पसवांनाच्या मृत्यूंनंतर त्यांचा मुलगा चिराग पासवान पक्षप्रमुख झाला. परंतु रामविलास पासवानांचा भाऊ पशुपती कुमार पारस आणि मुलगा चिराग पासवान यांच्यात पक्षाच्या दावेदारीवरून फूट पडली.

या फुटीमुळे पक्षाचे दोन तुकडे झाले. यात पशुपती कुमार पारस यांची राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी तर चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) हे दोन पक्ष तयार झाले. 

सध्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीकडे बिहार विधानपरिषदेत १ आमदार व लोकसभेत ४ खासदार आहेत तर लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) कडे केवळ चिराग पासवान हे एकमेव लोकसभा खासदार आहेत. 

८ – झारखंड मुक्ती मोर्चा..

झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी शिबू सोरेन यांनी १९७२ मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली. झारखंडच्या स्थापनेनंतर शिबू सोरेन तीन वेळ राज्याचे मुख्यमंत्री झाले. 

परंतु २०१३ मध्ये शिबू सोरेन यांनी पक्षाची सूत्रं मुलगा हेमंत सोरेनच्या हातात सोपवली. हेमंत सोरेन पक्षप्रमुख झाल्यांनतर २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यात आल्या. यात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मुक्ती मोर्चाने  ३ जागांवर विजय मिळवला तर २०१९ च्या लोकसभेत पक्षाचे २ उमदेवार निवडून गेले.

२०१९ च्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे राज्याच्या विधानसभेत ३० आमदार निवडून आले.आणि हेमंत सोरेन मुख्यमंत्री झाले.

सध्या  लोकसभेत १ आणि राज्यसभेत २ खासदार आहेत.

देशातील घराणेशाहीने वडिलांचा पक्ष मुलाला मिळणाऱ्या पक्षांची अशी स्थिती आहे. त्यातच  केसीआर यांची टीआरएस,  ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची या पक्षाचं नेतृत्व घरातीलच कोणाकडे जाईल. त्यामुळे घराणेशाही हा भारतीय राजकारणाचा भाग इथून पुढे राहील एवढं नक्की.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.