हा एम्प्लोयी खिश्यात राजीनामा घेऊन फिरणारा नव्हता तर टॉयलेटपेपरवर राजीनामा देणारा होता.

मान्य आहे आजकाल जॉब ची मारामार चालूये, कुठं नोकरी मिळत नाही अन कुणाला मिळाली तर ते त्या ठिकाणी टिकत नाहीत. कुठेही असंच चालूये….कोणी जॉब च्या पहिल्याच दिवशी फर्स्ट इम्प्रेशन मारतो तर कुणी जॉब सोडायच्या दिवशी राडा करून जातो. त्यातही काही वेळा काही लोकं अशा पद्धतीने नोकरी सोडतात, ज्याची चर्चा सगळीकडेच होत असते. 

तुम्ही तुमचा जॉब सोडतांना तुमचा राजीनामा कसा असेल..काहीसा असा ना कि, “मला तुम्ही दिलेल्या संधीमुळे मी इथंपर्यंत पोहचलो. आता यापेक्षा काही वेगळे आणि चांगल्या संधी शोधण्याच्या प्रयत्नात मी जॉब सोडतोय..वेगैरे वेगैरे….”

पण इंटरनेटवर आम्हाला एक असा नमुना सापडला ज्याने नोकरी सोडण्यासाठी जरा वेगळंच अन विचित्र डोकं लावलंय…

या नमुन्याने काय केलं तर जॉब सोडतांना बॉसला राजीनामा तर दिलाय पण तो साध्या सुध्या पेपरवर नाही तर टॉयलेट पेपरवर राजीनामा दिलाय….हो या एका एम्प्लोयीचे रजिस्ट्रेशन लेटर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

इंटरनेटवर जराशी चक्कर मारली कि, अनेकदा काही बातम्या अशा दिसतात, ज्या पाहून हसायला येतं. तशीच हि आगळ्यावेगळ्या राजीनाम्याची बातमी देखील व्हायरल होतेय. डेली स्टारने दिलेल्या बातमीनुसार, लुईस नावाच्या या व्यक्तीने आपल्या राजीनाम्याचे अनेक फोटो Reddit या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

तेंव्हापासून हा विषय लोकांच्या मिम्सचा अन टाईमपासचं कारण बनलं आहे…लोकं त्यावर प्रश्न करत आहेत कि, असं काय घडलं कि, या बिचाऱ्याला टॉयलेट पेपरवर राजीनामा द्यावा लागला? 

टॉयलेट पेपरवर लिहिलेल्या या चिठ्ठीत मी २५ तारखेला येथून निघणार असल्याचे लिहिले आहे. या लेटरवर त्या एम्प्लोयीने एक व्यंगचित्रही बनवले आहे, त्याने ते व्यंगचित्र स्वतःच्या रूपात सादर केले आहे. पत्रात त्यांनी पुढे लिहिले की, आज मी माझा राजीनामा सादर करत आहे. तसेच, लुईसने लोकांना सांगितले की त्याच्या बॉसला पण त्याचा राजीनामा हा आगळावेगळा राजीनामा आवडला, कारण त्याचा बॉस देखील कुल होता त्याने देखील हे मजेशीर राजीनामा मंजूर केला…

एक महत्वाची सूचना : तुम्ही मात्र या नमुन्यासारखं, आपल्या बॉसला असला काहीतरी राजीनामा अज्जिबात द्यायचं ट्राय करू नका नाही तर दुसरीकडे जॉब मिळायचे पण वांदे होतील.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.