फक्त एका विद्यार्थ्यासाठी चालवली जाते ७६ वर्षे जुनी शाळा !

ही गोष्ट आहे तामिळनाडू मधील कोइम्बतुर जिल्ह्यातील एका छोट्याशा चिन्नाकल्लर या गावाची. १९४३ पासून म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासून तिथे एक शाळा चालवली जायची. तिथे आसपास चहाच्या मळ्यात काम करणऱ्या कामगारांच्या मुलांना शिकता यावे म्हणून ती शाळा सुरु करण्यात आली होती. पण गेल्या वर्षी ती शाळा बंद करावी लागली. कारण २०१७-१८ मध्ये त्या शाळेत एकुलती एक मुलगी शिकत होती. ती चालली गेल्यानंतर काही काळ शाळा बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता ती परत उघडण्यात आली आहे.

एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार द्रविड़र एंड ट्राइबल वेलफेयर डिपार्टमेंटने आपली हि एलिमेंटरी शाळा पुन्हा सुरु केली आहे.

चिन्नाकल्लर मध्ये राहणाऱ्या राजेश्वरी हिला आपला सहा वर्षाचा मुलगा शिवा याला शाळेत घालायचे होते. पण तिथली  शाळा तर गेल्या वर्षीच बंद झाली होती. आणि द्रविड़र एंड ट्राइबल वेलफेयर डिपार्टमेंटची दुसरी जी शाळा होती ती चार किलोमीटर दूर पेरीयाकल्लर गावात होती.

राजेश्वरी यांनी संस्थेच्या अधिकाऱ्यांना विनवणी केली की गावातील शाळा परत सुरु करावी. तिला अपेक्षा नव्हती की शाळा पुन्हा उघडेल पण ती शाळा पुन्हा उघडली. सध्या तिथे काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, जेव्हा ही शाळा उघडली होती तेव्हा इथे ३०० कर्मचारी राहायचे जे चहाच्या मळ्यात काम करायचे.

७० वर्षापर्यंत दरवर्षी ५० विद्यार्थी ह्या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडायचे. जसजसे चहाच्या मळ्यात काम करणारी लोक दुसऱ्या क्षेत्रात जायला लागली तसतशी ही शाळा ओस पडू लागली.

चिन्नाकल्लर हे गाव घनदाट जंगलात वसलेले आहे. मावसिंराम आणि चेरापुंजी नंतर भारतातला सर्वात जास्त पाऊस इथेच पडतो. इथला धबधबा देखील खूप प्रसिद्ध आहे. पण हेच सौंदर्य चिन्नाकल्लरचे शाप बनले आहे. इथे हत्ती आणि इतर जंगली प्राण्यांची नेहमीच भीती असते. आदि द्रविड़र एंड ट्राइबल वेलफेयर डिपार्टमेंट के उच्चाधिकारीनी सांगितले की,

“गेल्या वर्षापर्यंत फक्त एक शिक्षक व एक प्राध्यापक यांच्या जीवावर ही शाळा चालू होती. पण त्यानंतर एकही पालक आपल्या मुलाचे नाव या शाळेत घालण्यास तयार नव्हते. कारण शाळेच्या आसपास हत्ती फिरायाला लागले होते आणि शाळेची दारे-खिडक्या यांची तोडफोड करायला लागले होते. पण आतापर्यंत कधी कुणावर कसला हल्ला झालेला नाही. जी कुटुंब आहेत त्यांना हत्तीच्या गावात फिरण्याची सवय आहे, त्यांना त्याची कसली भीती नाही. पण तरी आमचा प्रयत्न आहे की, त्यांनी आपल्या मुलांना पेरीयाकल्लरच्या शाळेत स्थलांतरित करावे. असे केले तर ही शाळा बंद होऊन जाईल.”

सध्या चिन्नाकल्लर गावात अंदाजे १५-२० कुटुंब असल्याचे सांगितले जात आहे. या शाळेच्या देखभालीची जबाबदारी सध्या पेरीयाकल्लरच्या शाळेचे प्राध्यापक एम. शक्तिवेल यांच्यावर आहे. चिन्नाकल्लर शाळेचे जे शिक्षक व प्राध्यापक होते त्यांना दुसऱ्या शाळेवर पाठवून देण्यात आले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.