नामग्याल यांनी करुन दाखवलं. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर १९ गावात वीज पोहचली.

जामयांग तसेरिंग नामग्याल… नाम तो सुनाही होगा ?

अहो तेच ते भाजप चे युवा खासदार ज्यांनी संसदेत ६ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० वर दिलेल्या एका भाषणामुळे रातोरात सोशल मिडिया स्टार झाले होते.

त्यांच्या मतदार संघातून जितकी मतं मिळाली त्याच्या संख्येपेक्षा जास्त त्यांची एका रात्रीतून ट्विटर आणि फेसबुक फॉलोअर्स वाढले होते. लोकसभेतला एक बॅकबेंचर‎ खासदार देशाच्या समोर आला एक तरुण खासदार ज्याने विकासाची एक नवीन संकल्पना मांडली.

त्यानंतर नामग्याल आत्ता पुन्हा चर्चेत येण्याचं कारण असं कि, त्यांनी संसदेत जे भाषण केलं ते फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नव्हतं तर त्यांनी ते करून दाखवलं !

तर विषय असा आहे कि, आजही भारतात अशी गावे आहेत जी अजूनही वीजपुरवठ्यापासून वंचित आहेत. त्यातल्या त्यात लेह जिल्ह्यातील काही खेड्यात अगदी काल परवापर्यंत वीज नव्हती. फोटोस्कार  या नावाने ओळखले जाणारे हे गाव लडाखच्या दोन उंच-उंच भागांच्या मध्ये आहे. थोडक्यात देशाच्या स्वातंत्र्यानंतरही या गावाला वीज पोहचण्यास तब्बल सात दशके लागली आहेत हे खरं तर दुर्दैव च म्हणावं लागेल.

पण आता इथे वीज पोहचली आहे ते हि याच तरुण खासदारामुळे !

सध्याच्या अहवालानुसार फोटोस्कार गावातील एनएचपीसी पॉवर ग्रीड लाईनचे काम झाले असून त्याचे  उद्घाटनही लवकरच होणार आहे. चामशेन मायक्रो-हायडल प्रकल्प (एमएचपी) च्या पुरवठ्याने लेह जिल्ह्यातील वस्त्यांचे विद्युतीकरण करण्यात आले. आणि या प्रकल्पासाठी एलआरईआय) अंतर्गत चामशेन प्रकल्पाला अर्थसहाय्य दिले आहे.

फोटोस्कार लेहच्या विमानतळापासून १६५ कि.मी. अंतरावर आहे. या गावाच्या नंतर केंद्र सरकारआगामी काळात स्कायम्पटा, लिंगशेड, यूलचुंग, न्यरॅक्स आणि डिप्लींग यासारख्या भागातील बऱ्याच  गावांना वीजपुरवठा केला जाणार आहे, कारण शेवटी वीज आहे तर सर्व काही आहे.

त्यामुळे तेथील रहवासी फारच आनंदात आहेत, असणारच इतके वर्ष त्यांनी अंधारात घालवली होती आणि आता ते चांगल्या सोयीस्कर आयुष्याच्या प्रतीक्षेत आहेत. फक्त इतकंच नव्हे तर आता तेथील पर्यटन सुद्धा जोर धरणार यात काही शंकाच नाही.

ते लडाखच्या दुर्लक्षतेवर आवाज उठवत आले आहेत.

जम्मू काश्मीर राज्यातून निवडून आलेल्या भाजपकडून निवडून आलेल्या ३ सदस्यांपैकी ते एक आहेत. लडाखला भारतीय केंद्रशासित प्रदेश म्हणून नामनिर्देशित करण्याच्या समर्थनार्थ केलेल्या भाषणानंतर जमयांग यांचे कौतुक सर्वच स्तरातून झाले आहे.

२०१९ मध्ये संसदेत झालेल्या भाषणातही त्यांनी या मुद्द्यावर जोर दिला कि, स्वातंत्र्यापासून ते आजतागायत विकासासाठीच्या ज्या काही योजना आखल्या गेल्या त्या प्रामुख्याने श्रीनगर सारख्या भागापुरत्या मर्यादित राहिल्यात आणि लडाखकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. पायाभूत सुविधांचा विकास होऊ शकला नाही किंवा त्या भागातील तरुणांसाठी कोणतेही ठोस उपक्रम हाती घेण्यात आले नाहीत. म्हणूनच लडाखचे लोक अनेक वर्षांपासून केंद्रशासित प्रदेश होण्याची मागणी करत होते.

त्या भाषणात त्यांचा संपूर्ण रोख हा कॉंग्रेस वर होता,

लढाखचा आजवर जो विकास झाला नाही त्याला संपूर्णपणे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला हेही जबाबदार आहेत. यांना फक्त निवडणुकीत लडाखची आठवण येते. त्यांना वाटते की काश्मीर ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे परंतु परिस्थिती बदलली आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या विकासकामांना सुरुवात केली होते. त्यात ३४ वर्षाचा खासदार म्हणून ते नागरिकांना लवकर अपील होत होते.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.